दोसतार - पुस्तक

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
6 Jul 2021 - 11:13 pm

Dosataar

मित्रानो कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपली आवडती दोसतार ही लेखमाला आता लवकरच पुस्तक रुपात येत आहे.
http://www.misalpav.com/node/47099
या लेखमालेच्या वाटचालीत तुमचा सर्वांचा मोठा मोलाचा सहभाग आहे.

दोसतार
किशोरवय.. वयाने मोठ्या झालेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनातला हळवा कोपरा. बालपणातल्या, किशोर वयातल्या आठवणी अजूनही प्रत्येक प्रौढ मनात दंगा मस्ती करत असतात, हळूच चिमटे काढत असतात आणि सहज आपल्याला गत काळची सैर करून आणतात. आपण थेट शाळेत जाऊन पोहोचतो. शाळेत असताना आपण केलेली दंगा-मस्ती, शाळेची सहल, शिक्षक दिन असे अनेक क्षण आणि अजाणतेपणी जी जगण्याची कौशल्ये शिकलो त्यांची पुन्हा उजळणी होते. तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच आयुष्यातले हे महत्वाचे क्षण.
दोसतार ची गोष्ट आहे आपल्यातल्याच एका विन्या, टंप्या आणि एल्प्याची. आपल्याला पुन्हा जुन्या आठवणीत नेणारी. साधी, निरागस गोष्ट, पण मुलांच्या आयुष्यातल्या महत्वाच्या विषयाला हात घालणारी. शिक्षणाचा मूळ हेतू बाजूला ठेवून नुसत्या मार्कांच्या मागे धावणाऱ्या आजच्या शिक्षणपद्धतीवर, कोणालाही दोष न देता अचूक इलाज करणारी. शिक्षण हे आनंदी शिक्षण असावे ही रवींद्रनाथ टागोरांची संकल्पना जेव्हा सत्यात उतरते तेव्हा काय होते हे तुम्हाला दोसतार वाचूनच कळेल. चला तर मग या मुलांच्या भावविश्वात डोकवायला. आपले बालपण पुन्हा जगायला.

दोसतार (कादंबरी)
लेखक - चकोर शाह
पुस्तकाची मूळ किंमत -320
प्रकाशन पूर्व नोंदणी किंमत - 256
Payment Details
Gpay- 9920884065
पैसे भरल्यानंतर कृपया 9920884065 या क्रमांकावर आपले संपूर्ण नाव, पत्ता आणि फोन नंबर पाठवावा.
For GPay use UPI id shahvictor-1@okicici

वावरविरंगुळा