सुट्टी..!

संदीप चित्रे's picture
संदीप चित्रे in जे न देखे रवी...
1 Dec 2008 - 8:28 am

सुट्टीला गावी जायचं ठरतं
आणि शीळेला गाणं मिळतं

रजेचं कसं, काम आहे किती?
पैशांची सोय आहे का पुरेशी?
पाहून प्रश्न जरा दडपते छाती
मिळताच रजा गणित जुळतं
आणि शीळेला गाणं मिळतं....१

जाताना पूर्वी त्यांच्या गावी
तान घ्यायचे वडील छानशी
पोहचायचे ते मनाने आधी
कळतं त्यांना काय व्हायचं
आणि शीळेला गाणं मिळतं....२

गणपती नाही, दिवाळी तरी
लग्नकार्य वा नुसती भेट जरी
वाढत असते खरेदीची यादी
घरचं अंगण अनमोल वाटतं
आणि शीळेला गाणं मिळतं....३

कुठली जिलबी, कुठली भाजी
सुरमई, बांगडे,पापलेटं ताजी
बिघडलं पोट चालेल तरीही
भेळ, मिसळ, वडाही खायचं
आणि शीळेला गाणं मिळतं....४

दाराशीच वाट बघते आई
कौतुक करतील सासूबाई
भाऊबहिणीची उडते घाई
त्यांना तर काय करू वाटतं
आणि शीळेला गाणं मिळतं....५

सरींनी ओल्या चिंब भिजूनी
मोगऱ्याला सुगंध देते माती
मग फुले सुगंधित रातराणी
आता सरींना भेटायचं ठरतं
आणि शीळेला गाणं मिळतं....६

कटिंग चहा, पानाची टपरी
थोडी कट्ट्यावर भंकसगिरी
एखादी येते आठवण हळवी
थबकतं तिथेच पाऊल नेमकं
आणि शीळेला गाणं मिळतं....७

इन मीन पंधरा दिवसांची
जाते पाखराचे पंख लावूनी
सुट्टीत असते दमछाक तरी
नंतर आराम करायचं ठरतं
आणि शीळेला गाणं मिळतं....८

कविताअनुभव

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

1 Dec 2008 - 8:35 am | विसोबा खेचर

मस्त रे..! :)

तात्या.

सहज's picture

1 Dec 2008 - 8:37 am | सहज

मस्त

:-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Dec 2008 - 9:41 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

:) आवडली कविता

अनिरुध्द's picture

1 Dec 2008 - 9:57 am | अनिरुध्द

प्रत्येकाच्या मनात हेच असतं
पण प्रत्येकाला थोडंच हे जगायला मिळतं
कविता वाचून मन सुखावतं
आणि मग खरोखरच शीळेला गाणं मिळतं...

फारच सुंदर. आवडली.

संदीप चित्रे's picture

1 Dec 2008 - 7:21 pm | संदीप चित्रे

तात्या, सहज, बिरूटे सर आणि अनिरूद्ध....
अभिप्रायासाठी धन्यवाद.... नुकत्याच झालेल्या भारत भेटीतू अजून बाहेर यायचो आहे :)

प्राजु's picture

1 Dec 2008 - 8:46 pm | प्राजु

कळतं त्यांना काय व्हायचं
आणि शीळेला गाणं मिळतं....२
इथे
त्यांना काय व्हायचं, हे आता कळतं..
आणि शीळेला गाणं मिळतं....२

आणि

थबकतं तिथेच पाऊल नेमकं
आणि शीळेला गाणं मिळतं....७
इथे
पाऊलही नेमकं तिथेच थबकतं
आणि शीळेला गाणं मिळतं....७

हे कसं वाटेल??
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

शितल's picture

1 Dec 2008 - 10:49 pm | शितल

संदिप ,
तु़झी भारत भेटीची कविता आवडली रे. :)

चतुरंग's picture

1 Dec 2008 - 11:03 pm | चतुरंग

(पुढच्या वर्षीच्या भारतभेटीकडे डोळे लागलेला)
चतुरंग

राघव's picture

2 Dec 2008 - 10:54 am | राघव

झक्कास कविता!

मुमुक्षु :)

संदीप चित्रे's picture

2 Dec 2008 - 11:15 pm | संदीप चित्रे

प्राजु, शितल, रंग्या, मुमुक्षु... धन्यवाद :)
-----
प्राजु-- सूचनांचा विचार करतोय.
------
रंग्या: मित्रा भारत भेट फार लांबवू नकोस. मी मागे एकदा सलग ६ वर्षे जाऊ शकलो नव्हतो... पार डोकं गेलं होतं कामातून.

मनीषा's picture

3 Dec 2008 - 7:16 am | मनीषा

खूप छान कविता...