अभ्यास केला पण भोकात गेला
शिकून काय झाले
मोठ्या मोठ्या पदव्या मिळूनही
ओझे तसेच राहिले
लहानपणी मी खिडकीतून
मुले खेळताना बघितली
हाती पुस्तक धरूनही
वीतभर फाटत राहिली
साहेब साहेब करूनहि माझे
कल्याण नाही झाले
पुस्तक माथी मारूनही
माझे बालपण हरवले
आज छकुला निरागसपणे
अहोरात्र खेळत राहतो
मी मात्र इथं कामावरती
दिवसभर चोळत राहतो
चोळण्यासाठी जन्म नव्हे हा
हे कळतेय मजला आज
स्वच्छंदी आयुष्य जगण्यासाठी
अंगी असावा लागतो माज
=============================
सिद्धेश्वर विलास पाटणकर