कोरोना आणि चीन - निकोलस वेड यांचा लेख

केदार भिडे's picture
केदार भिडे in जनातलं, मनातलं
21 May 2021 - 9:38 pm

कोरोना विषाणू चीन मधून मुद्दाम पसरवला गेला का यावर चर्चा सुरु आहे. मुद्दाम नाही पण अपघाताने तरी तो प्रयोगशाळेतून आला असावा याकडे निर्देश करणारा निकोलस वेड यांनी लिहिलेला मोठा लेख बुलेटिन नावाच्या १९४५ पासून अस्तित्वात असलेल्या मासिकात प्रसिद्ध झाला. शेखर गुप्तांनीही या लेखाची दखल घेतली आहे.
-------------------------
निकोलस वेड यांचा बुलेटिन मधील लेख
-------------------------
३० मिनिटे किमान लागतील वाचायला. शक्य होईल त्यांनी जरूर वाचावा.

मला समजल्या प्रमाणे त्याचा थोडक्यात गोषवारा देत आहे.

आपण विषाणूचे फोटो पेपरात बघितले आहेत , त्याच्या पृष्ठभागावर दिसणारे जे फोड आहेत त्यांना स्पाईक प्रोटीन म्हणतात. विषाणू स्वतः आपली वाढ करू शकत नाही. त्याला वृध्दीसाठी सजीव पेशींची आवश्यकता असते. अशी पेशी मिळत नाही तोपर्यंत तो आरामात पडून राहील किंवा मरून जाईल. विषाणू पेशीत प्रवेश करण्याकरता या स्पाईक प्रोटिन्सचा वापर करतो. एखादा विषाणू समजा वटवाघुळात पसरतो कारण त्याचे स्पाईक प्रोटिन वटवाघुळाच्या पेशीत प्रवेश करायला मदत करतात. तेच स्पाईक प्रोटीन माणसाच्या पेशीत प्रवेश करायला मदत करतील असे नाही. समजा विषाणूला असे स्पाईक प्रोटीन मिळालेच तर तो माणसाच्या पेशीत प्रवेश करणार (मध्ये आणखी निराळे प्राणी पक्षी असू शकतात ), स्वतःची वृद्धी करणार आणि माणसाला आजारी पाडणार. विषाणू असे स्पाईक प्रोटीन विकसित करण्याकरता प्रयत्नशील असतात.

योगायोगाने असे प्रोटीन तयार झाले आणि मग वटवाघळातून तो विषाणू वूहान येथील प्राणी विकणाऱ्या बाजारातुन सर्वत्र पसरला अशी सध्याची थिअरी आहे.
मात्र वूहान इथे वूहान विषाणू संस्था हि विषाणूंवर संशोधन करणारी प्रयोगशाळा आहे. प्रयोगांकरता लागणारे फंडिंग अमेरिकेतून एका मध्यस्थ संस्थेद्वारे होत होते.
सर्वच काम अमेरिका पुरस्कृत आहे असे नव्हे. या विषयाशी निगडित संशोधन अमेरिकेकडून पुरस्कृत केले असल्याचे वाटते आहे.

काय आहे ते संशोधन ?
विषाणूंना मानवी पेशीत पसरायला मदत करणारे स्पाईक प्रोटिन्स विकसित करण्यास मदत करणे असे थोडक्यात त्याचे वर्णन करता येईल. याचा किमान सांगितलं जाणारा उद्देश तरी असा आहे कि यामुळे तसे विषाणू नैसर्गिक पद्धतीने अस्तित्वात येण्याआधी आपण त्यावर लस , औषधे इ तयार करून ठेवू . अशा गंभीर विषयावरील संशोधन आपल्या पैशांनी दुसऱ्या देशात , तेही चीन मध्ये करण्याच्या प्रकारावरही वेड यांनी टीका केली आहे.
काही शास्त्रज्ञांचे म्हणणे होते कि अशा प्रकारे साहाय्य लाभलेला विषाणू नंतर ओळखु येईल पण वेड यांनी सांगितले आहे कि अशा पद्धती अस्तित्वात आहेत कि ज्यामुळे अस साहाय्य मिळालेला विषाणू ओळखणे शक्य नसेल.
या पूर्वी आलेल्या साथींमध्ये (SARS आणि MERS) विषाणूंची वटवाघूळ ते मानव अशी प्रसाराची साखळी काही महिन्यात शोधली गेली मात्र सध्याच्या विषाणूबद्दल तसा शोध अजून लागलेला नाही.
सध्याच्या विषाणूच्या साधर्म्य असणारा विषाणू त्या प्रयोगशाळेत यापूर्वी यशस्वीरित्या तयार झालेला आहे. अशा प्रकारे संशोधन करणाऱ्या प्रयोगशाळांतून यापूर्वी विषाणू बाहेर जगात अपघाताने पसरले आहेत. वूहान येथील प्रयोगशाळा BSL २ (सुरक्षेची श्रेणी) असलेल्या प्रयोगशाळेत करत होते, असे काम खरेतर BSL ३ किंवा BSL ४ मध्ये करणे अपेक्षित आहे.
याच प्रयोगशाळेतून प्रयोग करताना हा विषाणू बाहेर पसरला (मुद्दामहून नाही. ते सिद्ध करायला फार काम करावे लागेल, चीन सारख्या बंदिस्त व्यवस्थेत अशक्य वाटते.) आणि मग त्याने धुमाकूळ घातला. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने प्रसिद्ध केलेल्या एका उताऱ्यात वूहान येथील संशोधक कोवीड सदृश्य आजाराने साथ यायच्या आधीच आजारी पडले असल्याची माहिती अमेरिकेकडे असल्याचे म्हटले आहे.
विषाणू वटवाघुळातून एकदम माणसात आला असे म्हणावे तर या विषाणूचा जवळचा नातलग बाळगणारी वटवाघळे वूहान येथून १५०० किमी लांब आहेत, तसेच हिवाळा (डिसेम्बर) आला कि ती शांत बसून असतात असे वेड यांनी लिहिलं आहे. तसेच सध्याचा विषाणू प्रयोगात वटवाघळांत चांगल्या प्रकारे पसरू शकत नसल्याचे दिसते आहे. अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणेतील काही लोकांनी वूहान प्रयोगशाळेवर पूर्वीच ठपका ठेवला होता आणि त्याकडे सर्व वृत्तपत्र इत्यादींनी राजकीय भूमिकांमुळे डोळेझाक केल्याची टीकाही वेड यांनी केली आहे.
विषाणू कसाही आला असला तरी सध्या त्याचा सर्वतोपरी प्रतिकार करणे गरजेचे आहे. मात्र आणखी १-२ वर्षांनी चीनवर विषाणू आणि वूहान प्रयोगशाळेतील पारदर्शकतेबद्दल आंतरराष्ट्रीय पातळीवर दबाव टाकण्याची वेळ आलीच तर जनमत तयार करण्यासाठी अशा गोष्टींची माहिती असलेली बरी.

विज्ञानबातमी

प्रतिक्रिया

दिगोचि's picture

23 May 2021 - 12:27 pm | दिगोचि

आजच कोरोनाची आकदेवारी वाचली त्यात भारतात एकूण कोरोनाबाधितान्ची सन्ख्या २.५ कोटी व म्रुत्यु पावलेल्यान्ची सन्ख्या २७०००० दाखवली आहे. तर चीनमध्ये हे आकडे ९१००० व ४६४० असे आहेत. यावर विश्वास ठेवणे अशक्य आहे. अमेरिका, इन्ग्लन्ड, फ्रान्स, जर्मनी ऑस्ट्रेलिया येथे म्रुत्यु मुखी पडलेल्यान्ची सन्ख्या प्रत्येकी ५८५०००, १२८०००, १०८०००, ८६०००, ९१० अशी आहे. मला असे वाटत नाही की या देशापेक्षा चीनची मेडिकल सिस्टीम चान्गली आहे. यवरून प्रत्येकाने चीनविशयी आपले मत ठरवावे.