...परवा कोणीतरी म्हणाले की बंगालमधे १९४६ जशा दंगली झाल्या तशाच आत्ता बंगालमधे सुरू आहेत. पण त्यावेळेस दंगली कशा झाल्या आणि का झाल्या हे आजच्या पिढीला कदाचित माहीत नसावे म्हणून या लेखमालिकेचा प्रपंच...
बंगाल १९४६
जूनच्या २९ तारखेला ब्रिटिश पार्लमेंटच्या सदस्यांची समिती ब्रिटनला परत गेली आणि ते एका महिन्यात ब्रिटिश कॅबिनेटला आपला अहवाल सादर करतील असे सांगण्यात आले. जिनांनी आता अशा एका हत्याराचा शोध घेण्यास सुरुवात केली ज्याने ते सूड घेऊ शकतील आणि त्यांची वैयक्तिक महात्त्वाकांक्षा पूर्ण करू शकतील. त्याने मार्चमधेच जाहीर करून टाकले होते की मुस्लिम लीगचा दृष्टिकोन आता बदललेला आहे आणि मुस्लिम लीग आणि मुसलमानांना आता कायद्याचा विश्र्वास उरलेला नाही. मुस्लिम लीगच्या आमदारांच्या सभेत पाकिस्तानची मागणी आधीच जाहीर केली गेली होती. या बैठकीत मुस्लीम नेत्यांनी हिंदूंविरुद्ध अत्यंत जहाल आणि बेताल गरळ ओकली.
१९४३ साला पासूनच धडक कृतीच्या योजनेची चर्चा मुस्लिमांच्या पुढाऱ्यांमधे चालली होती. जुलै १८ या तारखेला भारताच्या सेक्रेटरीने (श्री कप्स) बोलणी जिन्हांच्या आडमुठ्या स्वभावामुळे फिसकटली आहेत हे जाहीर केले आणि वातावरण अजूनच तापले. जिनांनी मुंबईमधे मुस्लिम लीग कौन्सीलची बैठक बोलवली व काही ठराव पारीत केले. पहिल्याच ठरावात राज्यघटनेच्या स्थापनेच्या प्रक्रियेवर विश्र्वास न उरल्यामुळे मुस्लिम लीगने त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे असे सांगण्यात आले. दुसऱ्या ठरावात ‘‘धडक कृती’’ (Direct Action Plan) बद्दल खालील मुद्दे मांडण्यात आले -
ब्रिटिश कॅबिनेट आणि मे १६ १९४६ व्हाईसरॉयचे निवेदन मुस्लिमलीगने फेटाळते आहे. ब्रिटिशांनी मुसलमानांचा विश्र्वासघात केला आहे असे आम्ही मानतो
पाकिस्तानची निर्मिती झाल्याशिवाय मुसलमान जनतेचं समाधान होणार नाहे हे आता स्पष्ट आहे. दुसऱ्या कुठल्याही राज्य घटनेला आम्ही कधीच मान्यता देणार नाही. यासाठी मुस्लिम लीग आता डायरेक्ट ॲक्शन अमलात आणेल. ब्रिटीश सत्ता व भविष्यातील हिंदू राजवट झुगारून देण्याशिवाय मुसलमानांना गत्यंतर नाही...
मुस्लिम लीग पाकिस्तानसाठी सर्व मुसलमानांना मुस्लिम लीगच्या झेंड्याखाली एकत्र यावे असे आवाहन करत आहे. इ. इ.
निर्णय झाला होता आणि ॲक्शन प्लॅन आता आमलात आणायचा होता. ॲक्शन प्लॅन म्हणजे काय याबद्दल मुसलमानांच्या मनात कसलाही संदेह नव्हता. कायद्याला रामराम करून आता शस्त्रे हातात घ्यायची आहेत हा संदेश जेथे पोहोचायचा होता तेथे बरोबर पोहोचला. कॉग्रेसने कितीही म्हटले की त्यांचा अहिंसात्मक मार्गाने लढा सुरू ठेवण्याचा निर्धार आहे तरीपण एक गोष्ट स्पष्ट होती की मुसलमानांना त्यांची सत्ता हस्तगत करण्याची घाई झाली होती आणि त्यासाठी ते काहीही करण्यास तयार होते. थोडक्यात लोकशाही पद्धतीने मुसलमानांना सत्ता मिळणार नव्हती हे स्पष्ट झाले होते. मला तर वाटते जिना जहाल मुसलमानांच्या मनातलेच बोलत होते. कैसरबाग येथे झालेल्या भाषणात त्यांनी डायरेक्ट ॲक्शन प्लॅनचा ऐलान केला तो यासाठीच.जेव्हा जिनांना विचारण्यात आले की हा जो प्लॅन आहे तो अहिंसात्मक मार्गाने जाणार आहे का? यावर जिनांनी उत्तर दिले, ‘‘मी येथे नैतिकतेवर चर्चा करणार नाही.’’ याचाच अर्थ असा होतो की जे वाटेत येतील त्यांना कापून काढून आम्ही आम्हाला पाहिजे ते मिळवणार.
लियाकत अलि खान यांनी असोसिएटेड प्रेस ऑफ अमेरिका या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले, ‘‘डायरेक्ट ॲक्षन प्लॅन म्हणजे अघटनात्मक मार्गाचा स्वीकार. या मार्गाचे स्वरूप कुठेही केव्हाही कसेही बदलू शकते. ते त्यावेळीच्या परिस्थितीवर अवलंबून असेल. डायरेक्ट ॲक्शन म्हणजे कायद्याविरुद्ध लढा.’’
सरदार अब्दुल रब निश्तार म्हणाला, ‘‘ पाकिस्तानची निर्मिती ही फक्त रक्त सांडूनच होऊ शकते आणि आम्ही संधी मिळाल्यास हिंदूंचे रक्त सांडू. कारण मुसलमानांचा अहिंसेवर विश्र्वास नाही.’’ हे वाक्य मला जनरल पॅटनच्या वाक्याची आठवण करून देते. ख्वाजा नज़िमुद्दीनने जाहेर केले, ‘‘ मुसलमानांनी अहिंसेची शपथ घेतलेली नाही हे लक्षात घ्या.’’
ॲक्शन प्लॅनमधे मुसलमानांकडून काय कृती करणे अपेक्षित आहे हे आता सामान्य मुसलमानांपर्यत चांगले पोहोचले होते. उन्मादाने मुसलमानांच्या मनाचा पगडा हळूहळू घेण्यास सुरुवात केली होती.
या धडक कृतीच्या मोहिमेची आता आखणी सुरू झाली. याबद्दल मुंबईच्या सभेनंतर जिनांना आणि ख्वाजा नझिमुद्दीन यांना छेडण्यात आले तेव्हा त्यांनी सफाईदारपणे खोटे सांगितले की, ‘‘अजून काही ठरले नसल्यामुळे काही बोलणे योग्य होणार नाही.’’ पण लगेचच एक कृती समिती स्थापन करण्यात आली जी हा ॲक्शन प्लॅन अमलात आणण्याची संपूर्ण योजना आखणार होती. या समितीच्या बैठकी अर्थातच गुप्तपणे दरवाजाआड भरत. पण यात काय ठरेल होते हे काही दिवसांनंतर घडलेल्या घटनांनी स्पष्ट झाले .या समितींच्या बैठकीला मुसलमानांचे राजकीय पुढारी येत असत त्यांची नावे आणि कर्तृत्व येथे सांगितले तर आपण बंगाल मधील दंगलीपर्यंत कधीच पोहोचणार नाही. यात बंगालचे मुख्यमंत्री सुऱ्हावर्दी होते हे सांगितले म्हणजे खूप झाले.
अनेक चर्चांनंतर प्लॅनची सुरवात कलकत्त्यामधे करायची अशी योजना तयार झाली. या सुऱ्हावर्दीने नंतर बंगालमधे झालेल्या दंगलीत झालेल्या हिंदूंच्या नरसंहारास भरपूर हातभार लावला आणि तो जिनाचा वारसदार म्हणून ओळखला जाऊ लागला. कलकत्त्यातील दंगलीचे त्याला बक्षिसही मिळाले. तो मला वाटते नंतर बंगालचा गव्हर्नर झाला. (निश्चित माहिती नाही) या ॲक्शन प्लॅनमधे संप, हरताळ, मोर्चे, बंद इत्यादिंचा समावेश होता पण आतून काहीतरी वेगळेच शिजत होते. या चळवळीची पत्रके वाटण्यात आली होती पण जी खरी पत्रके वाटण्यात आली होती त्यात काय लिहिले होते हे आपण पुढे पाहणार आहोत. या हरताळासाठी ऑक्टरलोनी स्मारकाजवळील होणाऱ्या एका जाहीर सभेत सुऱ्हावर्दी स्वतः भाषण देणार होते. यात नेहमीप्रमाणे मुसलमानांना चिथवणारी भाषणे देण्यात आली. याच योजनेचा एक भाग म्हणून प्रत्येक मशिदीत खालील पत्रक चिटकवण्यात आले. -
जिहादसाठी मुनाजात - म्हणजे प्रार्थना.
(जुम्मेच्या प्रत्येक नमाज़ानंतर म्हणण्यात यावी.)
रमज़ानच्या याच महिन्यात पवित्र कुराण सांगितले गेले. याच महिन्यात ३१३ मुसलमान योद्ध्यांनी बद्र्च्या लढाईत खाफिरांवर विजय मिळवला आणि मुसलमानांच्या जिहादास सुरुवात झाली. याच महिन्यात हजारो मुसलमानांनी मक्केवर स्वारी केली आणि विजय मिळवला आणि इस्लामचे राज्य स्थापन केले.
अल्लाच्या कृपेने आज इंडियामधे आपली संख्या दहा कोटी आहे पण दुर्दैवाने आपण हिंदूंचे आणि ब्रिटिशांचे गुलाम झालो आहोत. आम्ही याच महिन्यात याविरुद्ध जिहाद पुकारला आहे. काफिरांवर विजय मिळविण्यात आमची मदत कर! भारतात इस्लामचे राज्य स्थापन करण्यासाठी आम्हाला मदत करा. इ.इ. इ.
हातात तलवार असलेले जिनांचे चित्रही सगळीकडे लावण्यात आले. त्यावर लिहिले होते, ‘‘इस्लामची तलवार तळपत आहे..आम्ही हिंदुस्थानवर राज्य केले आहे. हे तख्त आमचे आहे. हे मुसलमानांनो धीर सोडू नका. विचार करा. काफिरांवर प्रेम करणे चांगले नाही. काफिरांनो तुमचा अंतःकाळ जवळ आला आहे आणि लवकरच तुमची कत्तल होणार आहे. हातात तलवार घेऊन आम्ही परत राज्य करू...
अजून एका पत्रकात लिहिले होते, ‘‘तलवारी हातात घेऊन रस्त्यावर या...मग रक्ताचे पाट वाहात असताना कोण आमच्यासमोर उभे राहते ते पाहू. उद्या आमच्या हातात तलवारी असतील आणि ओठावर तकबीर असेल... उद्या काफिरांचा शेवटचा दिवस असेल...’’ या प्रकारची अनेक पत्रके बंगालमधे वाटण्यात आली होती.
मी वर ज्या पत्रकाचा उल्लेख केला आहे ते पत्रक गुपचूपपणे वाटण्यात आले... हे पत्रक छापण्यात आले होते आणि सायक्लोस्टाईलही केले गेले होते... प्रत्येक मुसलमानाच्या हातात हे पडेल याची व्यवस्था केली गेली... काय लिहिले होते या पत्रकात?
१ भारतातील सर्व मुसलमानांनी पाकिस्तानसाठी प्राण पणास लावले पाहिजे
२ एकदा का पाकिस्तान मिळाला की सबंध भारत काबीज करायचा आहे.
३ भारतातील सर्व जनतेला इस्लाम धर्म स्विकारण्यास भाग पाडायचे आहे
४ सर्व मुस्लिम राष्ट्रांची एकजूट ही काळाची गरज आहे.
५ एका मुसलमानाने पाच हिंदूंची कत्तल केली पाहिजे.
६ पाकिस्तान व इस्लामचे साम्राज्य उभे राहात नाही तोपर्यंत प्रत्येक मुसलमानाने खालील गोष्टींचे पालन केले पाहिजे -
१ हिंदूंच्या मालकीचे दुकाने, कारखाने जाळून टाका आणि मिळालेली लूट लीगच्या कार्यालयात जमा करा.
२ मुस्लिम लीगच्या सर्व सदस्यांनी हत्यार बाळगले पाहिजे
३ राष्ट्र्वादी मुसलमान जर मुस्लिम लीगमधे सामील झाले नाहीत तर त्यांना ठार मारा.
४ हिंदूंची हळूहळू कत्तल करून त्यांची लोकसंख्या कमी केली पाहिजे.
५ सर्व मंदिरे जमीनदोस्त करा
६ प्रत्येक गावात मुस्लीम लीगचा एक तरी हेर असावा
७ एका महिन्यास एक याप्रमाणे सर्व कॉग्रेस पुढाऱ्यांची हत्या करा..
८ कॉग्रेसची कार्यालये लीगच्या सिक्रेट गेस्टापोंनी जाळून टाकावीत.
९ कराची, बाँबे, कलकत्ता, मद्रास गोवा, विशाखापट्टण ही शहरे डिसेंबर १९४६ पर्यंत बंद पाडा. (मुस्लीम लीगच्या कार्यकर्त्यांनी हे काम करावे)
१० आर्मी, नेव्ही आणि इतर सरकारी कार्यालयात मुसलमानांनी हिंदूंच्या हाताखाली काम करण्यास नकार द्यावा.
११ मुस्लिम समाजाने साऱ्या भारतात दंगेधोपे माजवून व्यवस्था खिळखिळी करावी आणि इस्लामच्या भारतावरील शेवटच्या आक्रमणास मदत करावी
१२ यासाठी जी आर्थिक मदत लागेल ती मुस्लिम लीग देईल. शस्त्रे मुस्लिम लीग पुरवेल.
१३ सर्व शहरातून मुस्लिम लीग शस्त्रांचे वाटप करेल.
१४ प्रत्येक मुसलमानाने एक तरी शस्त्र जवळ बाळगावे. कमीतकमी एक चाकू तरी. आणि संधी मिळेल तेव्हा त्याने एकातरी हिंदूचा मुडदा पाडावा.
१५ वाहतुकीची सर्व साधने या लढाईत वापरण्यात यावीत.(म्हणजे सर्व वाहने मुस्लिम लीगच्या स्वाधीन करावीत)
१६ १८ ऑक्टोबर पासून हिंदू स्त्रिया आणि मुलींवर बलात्कार करा, त्यांना पळवून न्या आणि त्यांना मुसलमान करा
१७ हिंदू संस्कृती नष्ट करा
१८ सर्व मुसलमानांनी निष्ठूरपणे हिंदूंवर बहिष्कार टाकावा.
१९ कुठल्याही मुसलमाने हिंदूच्या दुकानातून खरेदी करू नये. हिंदूंनी तयार केलेल्या सर्व वस्तूंवर बहिष्कार टाकावा. सर्व मुस्लिम लीगच्या सदस्यांनी या सूचनांचे पालन करावे व इतर मुसलमानांनाही त्यासाठी परावृत्त करावे.
हे पत्रक भूतपूर्व न्यायाधिश खोसला यांच्या पुस्तकातून घेतले आहे. हे ‘‘स्टर्न रेकनिंग’’ नावाचे पुस्तक इनटरनेट अर्काईव्हजवर फुकट उपलब्ध आहे. ते वाचकांनी जरूर वाचावे. हे पुस्तक वाचल्यावर मुस्लिम उम्मा कशी काम करते हे आपल्याला कळेल. तसेच काफिरांची हत्त्या करण्याचा त्यांचा हक्क अबाधित राहिला तर काय होणार आहे याची ही झलक आपल्याला या पुस्तकातून दिसेल... हा हक्क कसा काढून घेता येईल हा एक संशोधनाचा विषय आहे...
आजही बंगालमधे याच सुऱ्हावर्दी मुसलमानांची पिल्लावळ नांदते आहे. मला एक आश्चर्य वाटते माओवादी कम्युनिस्टांवर बंदी घातली गेली पण इंडियन युनियन मुस्लिम लीगवर (जी त्याच मुस्लिम लीगची भारतीय शाखा आहे) अजून बंदी घातली गेली नाही आणि आज त्याचीच फळे आपण भोगत आहोत. आज बंगालमधे जो काही दंगा चालला आहे तो वरील पत्रकाप्रमाणेच चाललेला आहे असे मला वाटतंय.
बंगाली मुसलमानांचे धाडस या प्रकरणामुळे अजून वाढणार आहे कारण त्यांनी या सरकारचे पाणी जोखले आहे. त्या काळात त्यांनी कॉग्रेसचे पाणी जोखले होते आणि भारताची पद्धतशीरपणे फाळणी करण्यात आली. आज बंगाली हिंदूंच्या जिवनमरणाचा प्रश्र्न आहे. आपले घरदार का प्राण हा प्रश्र्न त्यांच्यापुढे उभा राहिला आहे. त्याचे उत्तर कोण देणार? हे सरकार देणार, का याचे उत्तर हिंदूनाच शोधावे लागणार? हे काळच ठरवेल..मला हिंदुस्थानात हे काय चालले आहे हे समजत नाही. काश्मिरमधून हिंदूंची हकालपट्टी, आता बंगालमधून हिंदूंची आसाममधे हकालपट्टी... उद्या केरळमधेही असे झाले तर आश्चर्य वाटायला नको.. मलबारमधून हिंदूंना हाकलण्यात आलेच होते. मुसलमान जे पूर्वी हिंदूच होते त्यांच्या मेंदूवर असा काय परिणाम झाला आहे की ते इतर धर्मियांसोबत असे द्वेषपूर्ण वागत आहेत? त्यावर मी एक लेख लिहिणार आहे पण पुढे कधीतरी...
कधी कधी वाटते बाबासाहेबांनी केलेली संपूर्ण लोकसंख्येची आदलाबदल करावी ही सूचना अमलात आणली असती तर बरे झाले असते...त्यावेळेस ते सहज शक्य होते पण नेहरूंनी आणि कॉग्रेसने ते होऊन दिले नसते. तसे झाले असते तर कॉग्रेसची भारतातील सत्ता लवकर संपुष्टात आली असती आणि बऱ्याच प्रश्र्नांचा निकालही वेळच्या वेळीस लागला असता..असो.
आता त्यांना काय वाटेल, हा विचार सोडून आपली मते आग्रहीपणे, कडवेपणाने, न घाबरता मांडली पाहिजेत आणि त्यागाचीही तयारी केली पाहिजे... जे खरे आहे, जो इतिहास आहे (जो आपल्याला समाजवाद्यांच्या सोयीने बदलून सांगण्यात आलाय) तो सर्वांनाच मान्य असायला हरकत नसावी... जेथे हिंदू अल्पसंख्यांक आहेत तेथे हिंदूची संख्या वाढवली पाहिजे आणि तोपर्यंत आपणच ‘‘तकिया’’चा वापर केला पाहिजे. (wwwटिंबyoutubeटिंबcom/watch?v=6F4wBeshTsw)
या प्रसंगी मला मार्टिन लुथर किंग यांची दोन प्रसिद्ध वाक्ये आठवतात
‘‘चांगल्या वाईटाच्या संघर्षात जे तटस्थ राहतात त्यांच्यासाठी नरकातील ज्वाळांची सगळ्यात खोल खाई परमेश्र्वराने राखून ठेवलेली आहे. आणि दुसरे -
‘‘जी संस्कृती किंवा राष्ट्र मनाने घाबरट स्वभावाची माणसे जन्माला घालते ती संस्कृती/राष्ट्र स्वतःचा सांस्कृतिक मृत्यु हप्त्यांवर विकत घेत असते...
या ॲक्शन प्लॅनसाठी कलकत्त्याची निवड का करण्यात आली त्याची कारणे पुढच्या लेखात...
- जयंत कुलकर्णी
प्रतिक्रिया
7 May 2021 - 5:17 pm | रात्रीचे चांदणे
डोळे उघडवणारा लेख, इतिहासात शिकवलं गेलं की स्वातंत्र्यावेळी हिंदू मुस्लीम एकत्र लढले. पण प्रतक्ष्यात एकमेकांविरुद्ध लढत होते. हिंदूना एकाच वेळी ब्रिटिशांविरुद्ध आणि मुस्लिमांविरुद्ध लढावे लागले.
7 May 2021 - 7:33 pm | गॉडजिला
पिढी जी भिती अथवा लोभापायी शांतताप्रिय झाली तीची नाळ नाही म्हटले तरी पुर्वधर्माशी बांधलेली असे... परीणामी भाईचारा न्हवता असे म्हणने जरा अवघड आहे...अगदी महाराजांनीही जे मनातुन शांतताप्रिय धर्माला आपलेसे करु शकले न्हवते त्यांची व्यवस्थित घरवापसी केली होती...
पण नंतर आलेल्या... पिढ्या न पिढ्या त्यांना दिली गेलेली शिकवण... व आता आपल्याच पुर्वजांबद्दल फारसे गम्य उरलेले नसणे यातुनच खरे प्रश्न निर्माण होउ लागले ?
त्यातही तिकडचे
काही टक्के लोक
बालपणीच धर्मपुस्तकांचे वाचन करतात ते दाखवुन इकडेकाही टक्के लोक
इथल्यांना खुणावतात बघा ते कसे त्यांच्या धर्माचा लहानपणापासुन अभ्यास करत आहेत... अन तुम्हाला आपल्याच देवांबद्दल श्रध्दा नाही, ते सोडा वाट्सपवर आपल्याची सणांची थट्टा करणारे विनोद फिदिफिदि हसत फॉरवड करता... लाज वाटत नाही ? झालं इकडचे विचारात पडले....की लगेच तिकडचे सुरु... नुस्तं वाचन काय कामाचं, आपण खतर्यात आहोत. बघा जरा डोळे उघडुन बघा... आपण तर इथले राज्यकर्ते होतो
(तेंव्हा लोकशाहीवाला बलशाली भारत अस्तित्वात न्हवता ही बाब सोयीस्कर दुर्लक्षित)
आणि आत्ता आपली काय परीस्थीती आहे ? त्यात आता हे लोकं सुध्दा धर्माबाबत जागरुक होत आहेत ते त्यांच्या दुखावल्या जाणार्या भावना आता दुर्लक्षित करणार नाहीत, हे असचं चालु राहीलं तर आपली काय गत होइल, स्वर्ग कसा मिळेल ? आपण आता यंव केलं पाहीजे त्यंव केलं पाहीजे... हम सब धोकेमे हय... झालं हे चक्र चालुच राहतं...तर असे हे काही टक्के लोक(हिकडचे अन तिकडचे) पध्दतशीर आख्खा देश यातुन वेठीला धरत आहेत म्हटले तर चुक न ठरावे ? खरं तर पहिला दगड कोणी माराला यातुन तुर्त काहीच उत्पन्न नाही, शेवटचा दगड कोण मारेल हे ही कोणाला सांगता येत नाही
लोकसंख्येची आदलाबदल काय प्रकरण आहे माहीत नाही पण आता असे वाटु लागले आहे भारतातुन इतर धर्म जर हद्दपार झाले तर आपोआप भारतात कोणी हिंदुही उरणार नाही. तसेही हिंदु ही फार अलिकडील संज्ञा आहे, व विषेशतः वैदीकता म्हण्जेच हिंदुत्व असाही समज बराच आहे याचे उत्तम उदाहरण म्हणजे शिकवण नसुनही अनेक संतांची वैदीक पध्दतीने होणारी नियमीत पुजाअर्चा. असो.. विषय इश्वराचा अन धर्म युध्दाचा काडीचा संबंध नसतो हे समजणे हा आहे.इश्वर कधीच कोणत्याही युध्दात कोणाचीच बाजु घेत नसतो म्हणून कोणतेच युध्द कधीही धर्मयुध्द ठरु शकत नाही परीणामी धर्मस्थापनेसाठी त्याचा अवतार येणे तर अजुन लांबची बाब. कारण तो वरचा जो बाप आहे त्याला हे चांगलं माहीत आहे की एका मुद्यावर जरी त्याने युध्द यशस्वीपणे टाळले... तर माणुस दुसरे कारणं हुडकेल पण टाळकी अवश्य फोडेल. म्हणूनच युध्द करायला, त्यासाठी उद्युक्त करायला, थांबवायला वा त्यासंबंधी कसलीही गोष्ट करायला कोणताही इश्वर कधीच सहाय्य करत नाही कारण मग तो इश्वर न्हवे असुर ठरेल. म्हणूनच युध्दजन्य गोष्टी या फक्त आणी फक्त माणसाने करायच्या असतात, निस्तरायच्या असतात. त्यासाठीच तर विवीध गुप्तचर यंत्रणा कामात असतात व युनो सारख्या संस्थाही.
7 May 2021 - 5:19 pm | भीमराव
ज्याला कोणाला वर लिहिल्याले पटत नाही त्याने वाद न घालता कुराण वाचावे. पुरोगामी विचार, सर्वधर्मसमभाव, शांतताप्रिय धर्म हे सगळे भ्रमाचे भोपळे लगेच फुटतील.
7 May 2021 - 5:29 pm | मुक्त विहारि
कुराण वाचले की उदारमत विरघळून जातो ...
7 May 2021 - 6:37 pm | कॉमी
सगळे भोपळे फुटले. आता पुढे काय करायचं ?
7 May 2021 - 5:27 pm | यश राज
लेखाबद्दल धन्यवाद.
थोडी फार कल्पना होती पण त्याबरोबर हे सगळे इतके भयंकर असेल हे आता कळले.
यासंधर्भात चारुदत्त आफळे यांचे कीर्तन थोडेफार ऐकले होते त्यात याचा संदर्भ आला होता.
7 May 2021 - 5:31 pm | मुक्त विहारि
वाचत आहे ...
7 May 2021 - 6:40 pm | कॉमी
हा निष्कर्ष कसा काढला ?
9 May 2021 - 9:05 pm | कॉमी
लेख आवडला नाही. सध्याच्या बंगालमधील हिंसेला धार्मिक ट्विस्ट देण्यासाठी निराधार मत मांडले आहे.
7 May 2021 - 6:54 pm | कॉमी
"तकीया" चा वापर म्हणजे काय ? समजले नाही.
7 May 2021 - 9:30 pm | मोहन
डोळ्यात अंजन घालणारा लेख लिहील्या बद्दल धन्यवाद.
बंगालच्या हिंसाचारची ही पार्श्वभूमी असू शकेल असे कधीही वाटले नव्हते. मार्क्सवाद्यांचा हिंसाचाराचा व दहशतीचा सत्ता काबीज करण्याकरता (व ती टीकवून ठेवण्याकरता) केलेला उपयोग हेच कारण समजत होतो.
7 May 2021 - 10:55 pm | NiluMP
VoteBank Democracy will ruin India now or Later.
8 May 2021 - 1:18 pm | स्वलिखित
ममता ने नमाज वाचून वोट बँक खुश करणे , यात ममता स्वतःचा स्वार्थ पाहत असली तरी , मुस्लिम समाज त्याहून मोठा स्वार्थ यामध्ये पाहतोय हे निश्चित ,
8 May 2021 - 6:09 pm | मुक्त विहारि
मी आधीही म्हटले होते की, बंदूक MIM च्या हातात आहे.. खांदे बदलत आहेत ...
8 May 2021 - 2:34 pm | वामन देशमुख
हा लेख वाचून डॉ सच्चिदानंद शेवडे यांच्या रक्तलांच्छन या कादंबरीची आठवण झाली.
8 May 2021 - 2:34 pm | वामन देशमुख
https://www.bookganga.com/eBooks/Books/details/4944649644793899685
8 May 2021 - 3:17 pm | प्रसाद_१९८२
बंगाल मधील हिंदूना त्यांच्या स्वत:च्या भविष्याची काळजी नाही, तिथे इतर काय करणार.
8 May 2021 - 6:10 pm | मुक्त विहारि
मग ते कुठल्याही राज्यातील का असेना...
8 May 2021 - 10:10 pm | वामन देशमुख
हा प्रतिसाद बंगालबद्धल नाही काश्मीरबद्धल आहे. पण बंगालात पुढच्या दहा वर्षांत (आणि हळूहळू नाही तर वेगाने, संपुर्ण भारतीय उपखंडात) काय होऊ घातलेय याची चुणूक दाखविणाऱ्या, काश्मिरातील हिंदूंवर झालेल्या अत्याचारांच्या अगणित घटनांपैकी ही एक -
ब्लॉगची लिंक: https://mandarvichar.blogspot.com/2016/07/blog-post.html
या विषयावरील इतर पोस्ट्स: https://mandarvichar.blogspot.com/search/label/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%...
9 May 2021 - 9:14 am | मुक्त विहारि
पु. भा. भावे, यांनी "प्रथम पुरषी, एक वचनी" ह्या आत्मचरित्रात फाळणीच्या घटनांचा उल्लेख केला आहे ....
आचार्य अत्रे यांनी देखील, कर्हेचे पाणी, ह्या आत्मचरित्रांच्या खंडात, हे उल्लेख केलेले आहेत ....
9 May 2021 - 11:46 am | सुखीमाणूस
मुळात या लोकाना मुस्लीम पेक्शा साडेतीन टक्के जास्त धोकादायक आहेत असे वाटते त्याना काय काही सान्गुन उपयोग.
याना कामावर आधारीत जाती व्यवस्था निर्माण झाली ती चुकिची वाटते पण सध्याच्या राजकारणात जी घराणेशाहीची प्रथा पडली आहे ती मात्र योग्य वाटते.. घरात राजकारण समोर दिसते म्हणुन त्यान्चे वारस लगेच मोठ्या पदान्वर आले तर अन्यायी व्यवस्था निर्माण होत नाही का? सन्धीचे असमान वाटप नाही का होत? हे एक प्रकारचे आरक्शण नाही का?
जर असा प्रचार केला जातो की शेटजी आणि भटजी अन्यायी आहेत म्हणुन त्याना(भाजपा च्या रुपाने) सत्तेत येउ देउ नका कारण ते अन्यायी व्यवस्था निर्माण करतील आणि इतिहास तसेच सान्गतो तर तोच इतिहास जे काही मुस्लीम राज्यकर्त्यान्बद्दल सान्गतो ते मात्र दुर्लक्शित करायचे. तिथे मात्र मुस्लिमान्विरुध लिहिलेला इतिहास चुकिचा आहे असे म्हणायचे.
काश्मिर मध्ये जे पन्डितान्विरुध्द झाले त्याची फारशी चर्चा करायची नाही कारण ते उच्चवर्णिय हिन्दु होते. आणि अशी कौन्ग्रेस सर्वाना समान वागवते असे पण म्हणायचे.
9 May 2021 - 5:09 pm | मुक्त विहारि
पाकिस्तान आणि बांगलादेश मध्ये हिंदूंचे शिरकाण झाले, आपण गप्पच
काश्मिरी पंडितांच्या बद्दल झाले तरी, आपण गप्पच
आता बंगाल मध्ये झाले तरी, आपण गप्पच
साधू हत्याकांड झाले, तरी आपण गप्पच
हिंदू हितवाद मांडला की आपलेच उदारमतवादी हिंदू, मांडणार्याला विरोध करतात...
कृपया खालचा व्हिडियो ऐका ...
https://m.youtube.com/watch?v=krdym7gFVvA
10 May 2021 - 3:17 am | हस्तर
बंगाल मध्ये हरल्यावर पण सामना मध्ये अग्रलेख नाही आला ? अजब आहे
10 May 2021 - 5:39 pm | मुक्त विहारि
पुढच्या लेखाची वाट बघत आहे ...
7 Oct 2023 - 12:11 pm | diggi12
पुढचा भाग कधी
7 Oct 2023 - 1:58 pm | अमरेंद्र बाहुबली
पुढचा भाग टाका.
25 Sep 2024 - 12:29 am | diggi12
पुढील भागाच्या प्रतिक्षेत