माझा मुलगा ईशान (वय वर्षे १०)आणि भाची जुईली(वय वर्षे १२) यांनी कुंभार्ली घाट सायकलवरून सर केला . त्याचे वर्णन ईशानने लिहले आहे, तेच येथे देत आहे
कुंभार्ली टॉप - एक मस्त धमाल प्रवास
एक दिवस एकदम सुरवातीला मी आणि बाबाने ठरवलं कि कुंभार्ली घाट आहे त्याच्या एकदम टोकापर्यंत जाऊन यायचं. त्याच्यासाठी मी, बाबा आणि माझी आई आम्ही ठरवत होतो कि आज जायचं, उद्या जायचं पण ते नाही जमलं. शेवटी तो एक दिवसआला. दिनांक ४/४/२०२१ रोजी मात्र करायचा ठरवलं. मग सकाळी ५.३०/६.००च्या दरम्यान उठलो व तयारीला लागलो. तयारी म्हणजेदूध प्यायलं, सायकलिंगचे कपडे घातले, २भांडी पाणी प्यायलो,चहा बिस्कीट खाल्ले, पाण्याच्या बाटल्या घेतल्या व ६.३०/६.४५ला हेल्मेट घालून सायकल चालवायला सुरुवात केली. माझ्याबरोबर घरातनं निघताना माझी आई, बाबा, मी आणि माझी बहीण जुईली होती. जुईलीपण पहिल्यांदाच एवढ्या लांब जाणार होती. तिला प्रॅक्टिस पण नव्हती. मग आम्ही निघालो . शिरगाव,पोफळी मार्गे आम्ही कुंभार्ली घाटात निघालो. खडपोली हुन निघाल्यावर शिरगावच्या एका बसस्टोप वर पाणी पिण्यासाठी थांबलो. पाणी पिऊन झाल्यावर आम्ही राईडला परत सुरवात केली. आता शिरगाव क्रॉसकेल्यावर एक हॉटेल लागणार होत. त्या हॉटेलच नाव जय मल्हार अस होत तिथून सूर्योदय छान दिसतो म्हणून आम्ही तिथं सूर्याचा एक फोटो काढला व पुढे निघालो. आता पोफळी गाव लागणार होत आणि मग कुम्भार्लीची कमान लागणार होती. पोफळी लागल व एक छोटा चढ होता तो चढवला व पाणी प्यायला थांबलो. पाणी पिऊन झाल्यावर पोफळीचा चौक लागला. चौक संपला व आली कुंभार्लीची कमान. आता कुंभार्लीला जायला पण दोन रस्ते होते. एक रस्ता म्हणजे जिकडंन गाड्या जातात तिकडंन व दुसरा रस्ता आहे जिकडं एसटीच्या बस जातात तिकडं. आम्ही एसटी जिकडं जाते त्या रस्त्याने निघालो. आता पहिल्यांदा लागणार होतं एक देऊळ. ज्या देवळाच नाव कोयनेश्वर . मग तिथे दम खाल्ला व पुढे निघालो. मग मोठा चढ लागला. पहिल्यांदा जुईली सायकलने चढवत होती नंतर मग ती थकली व हातातून सायकल घेऊन येत होती तर मध्ये चालवायचा प्रयत्न करता होती पण ते तिला जमलं नाही. माझ पण तेच झाल कसाबसा तो चढ मी व जुईलीने चढवला. आता परत दम लागला म्हणून मग आम्ही थांबलो व पाणी प्यायलो. हा रस्ता येऊन कुंभार्ली घाटाच्या मेन रस्त्याला येऊन मिळतो. आता कुंभार्ली घाटातला एक देऊळ लागणार होत. त्या देवळाच नाव सोनपात्रा असं होत. आम्ही त्या देवळाच्या जवळ आलो तेव्हा आम्हाला बाबाचे दोन मित्र दिसले. एका काकाचा नाव शुभम होत व दुसऱ्या काकाचा नाव मनोज अस होत. ते त्या देवळापर्यंत जाऊन आले होते. तेव्हा बाबाने त्यांना विचारल कि येताय का कुंभार्ली टॉपला? शुभम काका म्हणाला नको. मला काम आहे मी नाही येत. मनोज काका म्हणाला चला मग मी येतो तुमच्या बरोबर. मग आल कुम्भार्लीच सोनपात्रा. मग पाणी संपल होता ते एका घरातनं भरून घेतल व त्यांचे आभार मानले. जरा दम खाल्ला. बाबाने त्याच्याकडे असलेले दोन प्रोटीन बार दिले. ते खाऊन झाल्यावर मग आम्ही पुढे निघालो.
बरीच वळणे चढून झाल्यावर आम्हाला कुम्भार्लीच्या टॉप वरचे हॉटेल दिसले. मग मी बाबाला थोड्यावेळात विचारले कि कुंभार्ली टॉप आता किती किलोमीटर राहिलाय? तेव्हा बाबा म्हणाला फक्त २/३ किलोमीटर राहिला आहे . तेव्हा तर मी ओरडायला लागलो “ये! ये! ये! आता आपण जाणार. आता आपण कुंभार्ली टॉपला पोहचणार. ये!” पण जेव्हा कुंभार्ली टॉप ०.५ किलोमीटर राहिला होता तेव्हा मला खूप दम लागला होता. मात्र मी ठरवलं, आता काहीही झाल तरी आता थांबायचं ते फक्त टॉपला आणि मी चालवत राहिलो आणि तेवढ्यात कुंभार्ली टॉप आला. मला आणि जुईलीला तर भरपूरच आनंद झाला. आता पोटात कावळे ओरडायला लागले होते. ६.३० पासून काहीही खाल्ल नव्हत भूक लागली होती. तिथे एक टपरी होती. मग आम्ही तिथे गेलो. हात धुतले व ३/४ प्लेट भजी मागवली व ३/४ वडापाव मागवले. मी तर भजी भरपूर खाल्ली. मग तेथे ५/६ फोटो काढले.
आता आम्ही कुंभार्ली उतरायला सुरवात केली मला तर वाटलं कि १५ मिनिटात उतरलो पण खरंतर ३० मिनिट लागली. मग आम्ही परत कोयनेश्वर देवळात आलो. तिथे मोठं वडाच झाड दिसले . म्हणून झोके घेतले पंधरा मिनिट झाल्यावर आम्ही घराच्या दिशेने निघालो.
--- ईशान श्री गोखले
प्रतिक्रिया
5 May 2021 - 4:17 pm | मुक्त विहारि
अभिनंदन....
5 May 2021 - 5:52 pm | सिरुसेरि
मस्त धाडसी प्रवास .
7 May 2021 - 12:01 pm | चौथा कोनाडा
व्वा, भारीच !
छोटी सायकलस्वार मंडळींचं मनापासून अभिनंदन !
6 Jan 2022 - 1:43 pm | Nitin Palkar
रायडिंग आणि लेखन दोन्ही छान. दोन्हींचा कसून सराव ठेव. खूप खूप शुभेच्छा.