हल्ल्याच्या नंतरचा दिवस काही नव्या दिशा घेवुन आला आहे.
या दोन बातम्या पहा -
यावेळच्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत ६०% मतदान झाले आहे. जी आतापर्यंतची मतदानची सर्वोत्तम आकडेवारी आहे.
यात प्रथमच मतदान करणार्यांचा समावेश होता.
मतदारांच्या प्रतिक्रिया पुरेशा बोलक्या आहेत.
http://timesofindia.indiatimes.com/Cities/Delhi_polls_Terror_draws_GenX_...
दहशतावादाचा सामना करण्याची प्राथमिक जबाबदारी असणार्या केंद्रिय पातळीवर राजकीय नेतॄत्व कमकुवत आहे याची जाणिव
भारतातच नव्हे तर बाहेरही झाली आहे. सध्या कोणीही राजिनाम्याची वगैरे मागणी अजुन(ही!) केलेली नाही.
कदाचित सध्याच्या परिस्थितीचा राजकीय फायदा मिळवण्याचे पितळ उघडे पडेल म्हणून राजकीय पक्षानी आणि
अपेक्षा करणंच चुक म्हणून जनतेने ..
तरीही केंद्रिय गृहमंत्री आपला राजिनामा देतील अशी ही बातमी -
http://timesofindia.indiatimes.com/Shivraj_Patil_may_quit_before_all-par...
मतदानाचा निकाल मतपेटीतून जो लागेल तो (सत्ताधारी पक्षाच्या बाजुने अथवा विरोधी) लागेल पण राजकीय नेतृत्वाबद्दल
भ्रमनिरास झाला तरीही मतदान प्रक्रियेवरचा वाढलेला विश्वास एक आश्वासक घटना आहे असे मला वाटते.
तसेच, गृहमंत्र्यांनी राजिनामा अजून दिलेला नाही .. पण जरी राजकीय-प्रशासकीय अपरिहार्यता म्हणून दिला तरीही
पदासाठी 'जबाबदारी' ची 'जोखिम' तरी कळेल. यासाठी या बातमीचं महत्व ..
यातून ज्या राजकीय बदलाच्या दिशा जाणवत आहेत आत्ता खूपच धुसर आहेत, प्रतिकात्मक आहेत.
पण त्या पुढच्या वाटचाली साठी आश्वासक ठरु शकतात असे वाटते.
प्रतिक्रिया
30 Nov 2008 - 1:40 pm | विनायक पाचलग
आपल्या मताशी मी पुर्णपणे सहमत आहे.मात्र आता आप्ले वागणे फार महत्वाचे ठरणार आहे.यापुढे मतदान करताना विचार करुन करावे लाग्णार आहे .असे म्हणतात की काही ठिकाणी पैशन्वर मते विकत घेतली जातात .मात्र आपण सुशिक्शित असे कर्णार नाही .त्यामुळे आपल्या मतावर देशचे भविश्य आहे.आणि हो आपणा सर्वान्कडे एक मोठे शस्त्र आहे आन्तर्जाल.
आणि हो हे सिद्ध झलेय अमेरिकेत .अशे अनेक उपक्रम आहेत जे आपण राबवु शकतो आणि आता फक्त टाइमपास साठी नेट वापरणे बन्द करुन अशे उप्क्रम राबविले पाहिजेत .
तुम्ही साद द्या मी स्वतह तरी तयार आहे