१. मिनी लॉकडाऊन : दिवस पहिला

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जनातलं, मनातलं
6 Apr 2021 - 1:05 am

काल उद्धव ठाकरेसाहेबांनी करोनाच्या केसेस चा वाढीव आकडा पहता कडक निर्बंध आणि वीकेंडला संपुर्ण लॉकडाऊन ची घोषणा केली . #मिनीलॉकडाऊन . आज संध्याकाळपासुन आठ वाजल्यापासुन त्याची अंमलबजावणी सुरु झाली , त्या अर्थाने आज लो़कडाऊनचा पहिला दिवस. मागच्या वर्षीच्या मिपावरील लॉकडाउन स्पेशल लेखमालिकेत लेख लिहिता न आल्याची खंत मनात होतीच , ती दुर करण्याची संधी सरकारने दिली ह्यबद्दल मी सरकारचा आभारी आहे ;)

________________________________________

खरंतर लिहिण्यासारखं खुप आहे पण सगळंच अघळपघळ ...

अगदी खरंच बोलायचं तर लॉकडाऊन आपल्याला काही झेपला नाही. आपली वृत्ती आधीही तशीच "विरक्त" अन बोली भाषेत बोलायचे तर आळशी होती, लॉकडाऊन मध्ये गेले ज्वळपास १ वर्ष हाच प्रश्न मनात घोळत राहिला , अजुनही घोळतोय , कि का आपण उगाच इतका उपद्व्याप करतोय ? काय गरज काय आहे इतकं सगळं करण्याची . सकाळी जेवल्यापासुन रात्री झोपेपर्यंत कोडींग चालु आहे का तर हजारो मैल दुरवर असलेलेल्या कोणत्या तरी बँकेचा नफा वाढावा म्हणुन . बरं कितिहि हुच्च काम केलं तरी आपल्याला काय मिळनार आहे तर केळंच . ती सुध्दा रुपायातील, डॉलर मधली नाहीच ! मुळातच येवढं सगळं करायची गरजच काय ? आणि करायचंच असेल तर स्वत:साठी का बरे करु नये इतके कष्ट ? प्रश्ण डोक्यात फिरत रहातात , उत्तर काही सापडत नाही. अगदीच खुपच निराश वाटतं , वाटतं की सगळं सोडुन द्यावं अन गडावर जाऊन रहावं समर्थांच्याजवळ , किंव्वा तेही नको अगदीच जंगलात जाऊन राहावं एकांतात. तेव्हा महाराजांनी व्यंकोजी राजेंना लिहिलेलं पत्र काढुन वाचतो , अन परत रुटिन चालु ठेवतो-

"रिकामे बैसुन लोकांहांती नाचीज खाववुन काल व्यर्थ न गमावणे. हे कार्य करावयाचे दिवस हायेती . वैराग्य तो उत्तरवयी कराल ते थोडे आज उद्योग करुन आम्हांसही तमासे दाखवणे "

ऑफिस होतं तेव्हा काहीनाकाही विरंगुळा होता मनाला , दोन मिटींग मध्ये ब्रेक असायचा, अगदी ओफिसला जाताना अन घरी येताना मनाचे गेयर शिफ्ट करता यायचे, आता अखंड काँप्युटर समोर असल्याने लॅपटॉप अन वाचन अन चिंतन सोडुन काहीच होत नाही. काही काही मित्र म्हणाले की "जरा अतिच होत नाहीये का ?" पण अभ्यास कधीच अति होत नसतो असं माझं ठाम मत आहे ! काय काय वाचलं नाही गेल्या वर्षात ! फायन्नास , पायथॉन, मशीन लर्निंग , आर्टिफिशियल इन्टेलिजन्स , अ‍ॅल्गोरिदमिक ट्रेडिंग, माकियावेली चं प्रिन्स, फ्रेडरिक निचा चं बियाँड गूड अ‍ॅन्ड इव्हिल आणि दज स्पोक झरत्रुष्ट्रा वाचायला घेतलं पण हे जरा वाढीव काम आहे , ह्याला निवांत वेळ पाहिजे . बाकी अमृतानुभव सतत ऐकणे होतेच त्यातील दोन अध्याय तर पाठही झालेत ! अफलातुन पुस्तक आहे , त्यावर लिहायला घेतलं होतं , ४ - ५ लेख लिहिलेही , पण आता कशाचीच गरज वाटत नाही , कोणाला सांगुन कळणारं नाहीये , आणि कोणाला कळायची गरजही नाहीये , हेसगळं स्वांतःसुखाय आहे : "तुका म्हणे होय मनाशी संवाद | आपुलाचि वाद आपणासी|| "

___________________________________

बाकी ऑफिसात एक "महत्वाची गोष्ट " मात्र राहुन गेली.

"खरं सांगु का , तुला पाहुन मला माझ्या लहानपणीच्या क्रशची आठवण होते . "
"येस, आय नो दॅट ! तु मला आधीही सांगितलं आहेस, बट व्हॉट डु यु एक्झॅक्टली वॉन्ट टू से ? "
" आपण असं कधीतरी निवांत डिनर ला भेटुयात का ?"
" आर यु अस्किन्ग मी फॉर अ डेट ?"
" अ डेट ? , रोमॅन्टिक डेट ? नो...... आय मीन मे बी....... आयमीन काईंड ऑफ ..... आयमीन येस ....... ऑफकोर्स. लेट्स गो फॉर अ डेट !"
" (स्माईल) येस , वी विल गो फॉर अ डेट . आधी तु तुझी ट्रिप करुन ये , मलाही घरी जाऊन यायचं आहे , आल्यावर निवांत भेटु ;) "

त्यानंतर अस्मादिकांची बहुचर्चित बॅकपॅकिंग ट्रिप झाली, तीही घरी जाउन आली , अन त्यानंतर लॉकडाउनच लागला . त्यात भेटणे शक्यच नव्हतं . शेवटी शेवटी भेटता आलंही असतं पण घरी काय कारण सांगणार ? ती तरी काय कारण सांगणार ? भेटणार तरी कुठं ! भें*&* ह्या करोनाने सगळंच अवघड करुन टाकलं ...
हे प्रकरण म्हणजे मिपावर एखादी लेखमालिका वाचायला घ्यावी , त्यात अगदी मन गुंतावं अन लेखकाने क्रमशः लिहुन काहीच न सांगता कथा अर्धवट सोडावी असं काहीसं झाली =))))

हे असं पुर्णविराम, स्वल्पविराम , अल्पविराम असली काहीच विरामचिन्हे न देता अर्धवट सोडलेली वाक्य मला आवडत नाहीत त्या पेक्षा खाडाखोड आणि गिरगोटा झाला असता तरीदेखील परवडला असता.... पण हे असं .... अपुर्ण .... फार वाईट !

__________________________________________

गेला आठवडा लोंग वीकेन्ड केला , टोट्ल ९ दिवस मिळाले एकदम रिलॅक्स . त्यात एक गोष्ट मात्र अनुभवली : सुट्टीच्या पहिल्या दिवशी झटकन एकदम सगळी टेन्शन्स आणि ओफिसची कामे मनातुन जात नाहीत , हळु हळु विस्मरण होत जाते ! आणि शेवटी शेवटी तर आठवतही नाही कि काय काम चालु होते , कोणती स्प्रिन्ट चालु होती अन कोणत्या कोड मध्ये कोठे बग्स होते , संपुर्ण विस्मरण होते !
ही गोष्ट , हा अनुभव मला फार आशादायी वाटतो - आपण ह्या प्रापंचिक व्यापात अडकलो आहोत, कळत न कळत ह्यातील अनुभवांचे मनावर , विचारसरणीवर परिणाम होत आहेत , आयुष्यभराच्या सवयींचे गुलाम झालेल्या अनेक लोकांची उदाहरणे अगदी जवळुन पहायला मिळाली ( ही देखील लॉकडाऊनचीच कृपा ! ) , आपणही असेच आदत से मजबूर तर होणार नाही ना असा , काहीसा निराशाजनक, विचार मानात डोकावुन गेला होता मागच्या वर्षी. त्याचं उत्तर सापडलं -
नाही ! नक्कीच नाही !!
ज्या दिवशी आपण सुत्टी घेऊ , ह्यातु बाहेर पडु , तसे हळु हळु विस्मरण होत जाईल ह्या व्यापांचे ! आणि आपण निवांतपणे अमृतानुभव जगु शकु !

उठिला तरंगु बैसे । पुढें आनुही नुमसे ।
ऐसा ठाईं जैसे । पाणी होय ॥ ७-१८६ ॥
पाण्यावर उठलेला तरंग शांत झाला , त्याचा अंशही उरला नाही की पाणी कसे शांत होते तसे काहीसे ! म्हणजे पाणी आधीपासुनच पाणीच होतं , त्यावरील तरंगाचा केवळ आभास होता , आणि आता तर तोहि संपला !!
हे जे काही प्रापंचिक व्याप आहेत , कौटुंबिक जबाबदार्‍या आहेत , स्वतःच्यच महत्वाकांक्षेने पायात घायलेल्या आशा बेड्या आहेत , हे सगळं सगळं केवळ तरंग आहेत , एकदा "सुट्टी" मिळाली की हे सगळे तरंग आपोआप हळु हळु शांत होत जातील . नक्कीच !

_______________________

असंच सगळं अघळपघळ आहे . हे असंच रहाणार ! काय माहीत ऑफिस कधी सुरु होईल , तुर्तास तरी " वर्क फ्रॉम होम " आहे , आणि जोवर सर्वांना वॅक्सिन मिळत नाही तोवर ओफिस सुरु होणार नाही ह्याची खात्री आहे ! त्यामुळे हा लॉकडाऊन किमान सातार्‍यात रहायला मिळाणार हा आनंद आहे !

सर्व मिपाकरांना नवीन मिनी लॉकडाऊन च्या हार्दिक शुभेच्छा !

घरी रहा सुरक्षित रहा !

जीवनमानविचार

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

6 Apr 2021 - 3:06 am | मुक्त विहारि

हाच उत्तम उपाय आहे ....

खेडूत's picture

6 Apr 2021 - 9:44 am | खेडूत

मिनिगत आवडलं.
बाकी सज्जन गडावर घाई न करता एखादी सकाळ शांत बसणं अतीव आनंद देऊन जाते!

बाकी अनेक वर्षे नोकरी केली असेल तर तेच काम स्वतः साठी करणं जिकिरीचं काम आहे. आधी सुरू करायला अडचणी अन् बाहेर सहज पडता येत नाही हा स्वानुभव. मात्र चाळिशीच्या आत आणि एकतरी तयार ग्राहक असेल तर स्वतः साठी तेच काम करायला हरकत नसावी.

Bhakti's picture

6 Apr 2021 - 10:46 am | Bhakti

कोणाला सांगुन कळणारं नाहीये , आणि कोणाला कळायची गरजही नाहीये , हेसगळं स्वांतःसुखाय आहे : "तुका म्हणे होय मनाशी संवाद | आपुलाचि वाद आपणासी||
छान!

लई भारी's picture

6 Apr 2021 - 12:43 pm | लई भारी

लॉकडाऊन चा फायदा करून घेता आला नाही आहे ही सल आहेच(म्हणजे नवीन वाचन, काही शिकणे वगैरे) पण बऱ्यापैकी गोष्टींशी relate होता आले :-)

मुक्त विहारि's picture

6 Apr 2021 - 5:04 pm | मुक्त विहारि

कठीण आहे...

दोनचार जण, घरातून काम करतात, त्यांना आता मानदुखीचा त्रास व्हायला लागला आहे...

ज्ञानोबाचे पैजार's picture

6 Apr 2021 - 3:16 pm | ज्ञानोबाचे पैजार

पैल्या लॉकडाउनची मज्जा या लॉकडाउनला येणार नाही
पैजारबुवा,

प्रसाद_१९८२'s picture

6 Apr 2021 - 4:28 pm | प्रसाद_१९८२

जो पर्यंत श्री. मोदी रात्री आठ वाजता टिव्हीवर येऊन,

"मित्रों आज रात १२ बजेसे पुरे देश में २१ दिन का लॉकडाऊन लगाया गया है, ये ईक्कीस दिन हमने लॉकडाऊन का पालन नही किया तो देश एक्कीसो साल पिछे चला जायेगा"


असे काही म्हणत नाहीत तोपर्यंत लॉकडाऊन झाल्यासारखे वाटत नाही.

चौथा कोनाडा's picture

6 Apr 2021 - 5:12 pm | चौथा कोनाडा

खरंय, या लॉकडाऊन, मिनीलॉकडाऊन मध्ये ती मजा नाही !

राजेंद्र मेहेंदळे's picture

7 Apr 2021 - 11:46 am | राजेंद्र मेहेंदळे

सगळ्या आय टी वाल्यांची थोड्याफार फरकाने हिच परिस्थिती आहे. घरी बसुन एक वर्ष होउन गेले, नोकरी आहे आणि पगार चालु आहे ह्याचे समाधान मानावे की घरी बसुन कंटाळा येतोय आणि मानदुखी पाठदुखीची तक्रार करावी समजेना. घर आणि ऑफिसात काही फरकच नाही. रात्री २ वाजता फोन वाजला तरी लॅपटॉप उघडला नी कामाला सुरुवात. हे सर्व कधी मूळपदावर येणार तेही समजेना.

घरात बसून जॉब असला ,पगार चालू असला तरी त्याच्या भावनिक,मानसिक गरजा पूर्ण होत नाहीत.जास्त दिवस घरात बसून मानसिक संतुलन बिघडले जाण्याची शक्यता जास्त आहे
शारीरिक. व्याधी सुद्धा लागू शकतात.

कोणाला सांगुन कळणारं नाहीये , आणि कोणाला कळायची गरजही नाहीये , हेसगळं स्वांतःसुखाय आहे : "तुका म्हणे होय मनाशी संवाद | आपुलाचि वाद आपणासी|>> खरंय

चौथा कोनाडा's picture

7 Apr 2021 - 12:36 pm | चौथा कोनाडा
चौथा कोनाडा's picture

7 Apr 2021 - 12:37 pm | चौथा कोनाडा
चौथा कोनाडा's picture

7 Apr 2021 - 12:39 pm | चौथा कोनाडा
राजेंद्र मेहेंदळे's picture

7 Apr 2021 - 2:23 pm | राजेंद्र मेहेंदळे

एकच प्रतिसाद ३वेळा चोप्य पस्ते केलाय म्हणजे किती कंटाळा आला असेल त्याची कल्पना आली.

चौथा कोनाडा's picture

7 Apr 2021 - 6:07 pm | चौथा कोनाडा

😂

हे काही तरी सिस्टीम प्रॉब्लेम मुळं झालंय !

चौथा कोनाडा's picture

7 Apr 2021 - 6:08 pm | चौथा कोनाडा

आज तर इतका कंटाळा आला की ,दाराशी आलेल्या भाजीवाल्याला सांगितले, 'भावा,बैस माझ्या घरात. टी.व्ही.बघ " मी तुझी हातगाडी घेऊन एक राउंड मारुन येतो. "
तर तो म्हणाला, भाऊ मी बी. विंगमध्ये राहतो. खरा भाजीवाला माझ्या घरी बसून वेबसिरिज बघतोय !

साभारः कायप्प ढकल

गणेशा's picture

7 Apr 2021 - 10:52 pm | गणेशा

हा हा हा

कुमार१'s picture

7 Apr 2021 - 6:42 pm | कुमार१

मनोगत आवडलं.
.....................
छान स्मरण.
ठीक आहे. यंदा मी काय करतोय ?

चार आघाड्यांवर थोडक्यात सांगतो.
अभ्यास : नाईलाजाने मागच्या वर्षीचाच म्हणजे चालू महासाथीचा विषय. वाचन, लेखन आणि प्रश्नोत्तरे. यामुळे अन्य अनेक आरोग्य विषय वाचायचे डोक्यात आहे ते मात्र जमत नाही. त्याची खंत.

स्वयंपाक : घरामध्ये तीन पिढ्यांपासून उपमा केला जातो तो भाजलेल्या रव्याचा असायचा. मध्यंतरी ऐकले की दक्षिण भारतात कच्च्या रव्याचा करतात आणि छान असतो. काल कच्चा रव्याचा उपमा केला आणि हा बदल नक्कीच आवडला.

संगणक : अधून-मधून मिपावर थोडाफार एचटीएमएलचा सराव करतो. आता वर्डचे जेपेग करणे स्वतःलाच जमू लागले व गती आली आहे. पूर्वी अन्य कोणाची मदत घेत होतो.
करमणूक : यावर्षी मात्र ओटीटी वरील चित्रपट मनापासून बघावेसे वाटत नाहीत. कंटाळा आलाय, मागच्या वर्षी फारच पाहिल्यामुळे. त्यामुळे अगदीच नाईलाज झाला तर पाहतो.

पण बदल म्हणून आता दक्षिण भारतीय दोन पाहिले. दृश्यम 2 (मल्याळम) आणि आमी (तेलगू). दोन्ही आवडले

आर्थिक, मानसिक आणि शारिरीक....

आर्थिक ताण नसेल तर, इतर गोष्टींकडे लक्ष देता येते ...

मानसिक ताण येऊ नये म्हणून मी कुत्री पाळतो... पाळीव प्राणी हे माझ्या साठी, उत्तम मानसिक औषध आहे...

शारिरीक ताण येऊ नये म्हणून मी, रोज किमान 5-6 किमी फिरतो...

कंटाळा, हा प्रकार मला कधीच येत नाही... वाचन आणि चित्रपट बघणे, हे असतेच आणि मनोरंजन करायला, परमपूज्य राहुल गांधी यांचे व्हिडीयो बघायचे किंवा प्रियांका गांधी यांचे भाषण ऐकायचे...

झोप येत नसेल तर, माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकायचे.. मी तरी अद्याप त्यांचे संपूर्ण भाषण सलग ऐकू शकलो नाही...

गणेशा's picture

7 Apr 2021 - 11:06 pm | गणेशा

भारी लिहिले आहे...
एकदम आवडले...
जुना एक लॅपटॉप द्यायला सोमवारी ब्ल्यू रिच ला गेलेलो, उगाच इकडे तिकडे फिरणाऱ्या साऱ्या आठवणी पुन्हा समोर आल्या..
चहा.. कँटीन.. गप्पा सगळे..
___________________

गेला lockdown मला वयक्तिक भारी गेला..
Positive :
बराच अभ्यास, spark learning and project, new team, काम कमी तसे..
फायनान्स हा माझा नसलेला भाग पण थोडा वाचला accounting, insurance, माझी company यांचे पुढच्या आठ वर्षा नंतरचे प्लॅनिंग..
Saving.. Investment फलाना..

Negative : ट्रेक नाही, gym नाही, सायकलिंग नाही..
रनिंग केली पण वजना मुळे जास्त नको म्हणालोय..

२०१९ ला ११ ट्रेक केलेले.. खास करुन स्वप्नातले वासोटा, हरिश्चंद्र, कर्जत -भीमाशंकर, हरिहर, सायकल ची अवघड pune पुन्हाळा आणि पुणे लिंगाणा ट्रिप किती किती मस्त

२०२० मात्र boar..
तोरणा, कलावंतीणआणि लेह लद्दाख plan होते आता२०२१ ला नक्की करणार.. बस झाली नाटके..

आता मात्र gym करायतोय, नशिबाने बंद नाही अजून, गेल्या lockdown च्या चुका सुधरावत आहे..
वजन कमी म्हणजे १५kg कमी करणार, आज केले वजन ३ किलो कमी झालेय.. वा..
सायकल धुवून ठेवलीये, सुरुवात करेल लवकरच..

---

मला वाटते माझे भटकंतीचे जुने धाग्यात आता पुन्हा लिहायला सुरुवात करावी.. बघू पुढे..