सावली

Primary tabs

सरीवर सरी's picture
सरीवर सरी in जे न देखे रवी...
30 Mar 2021 - 2:06 pm

असं कधी झालंय का?

आपली सावली ..राहिलय उभी
किती तरी वर्षांची पानं उडून गेली
काळाची काजळमाया सरून गेली..
तरी अवचित ही सामोरी राहिलय उभी..

मी तिला पाहते,मनभरून न्याहाळते
समोरूनी ती पुढली वाट चालू लागते
सांगाव वाटे तिला ही वाट अशी कठीण असते
कशाला धावते आत तरी हात हाती घेते?

ती चालत राहते ...कधी माझ्याकडे पाहत हसते..
मी बघत राहते.. हळूच हसते

कवितामुक्तक

प्रतिक्रिया

कल्पना चांगली, पण थोडी तुटक आणि कमी शब्दांत आटोपली असे वाटले. आणिक फुलवता येऊ शकेल.

अवांतरः यावरून मला माझी सावली आठवली. :-)

मोगरा's picture

1 Apr 2021 - 11:32 pm | मोगरा

छान.,

सरीवर सरी's picture

2 Apr 2021 - 12:20 pm | सरीवर सरी

राघव,मोगरा धन्यवाद!
राघव,
कवितेचा अर्थ शक्यतो सांगू नये.. प्रत्येक वाचक स्वत: नुसार त्याचा आस्वाद घेतो,
पण सांगते थोडं..
ज्याप्रमाणे रुपक कथा असते, त्याप्रमाणे ही एक रूपक कविता लिहीण्याचा प्रयत्न..यात सावली म्हणजे एक आपल्यासारखीच व्यक्ती जी आपल्याला जून्या काळात घेऊन जाते.