एक विचार

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जनातलं, मनातलं
18 Mar 2021 - 7:29 am

आमचे एक निसर्ग प्रेमी मीत्र, यांनी ट्विटर वर गुलबक्षीच्या फुलांबद्दल माहिती दिली.
वाचता वाचता सहज एक विचार डोक्यात आला आणी मन पन्नास वर्षे मागे गेल.विचार आला की नाती कशी असावीत, गुलबक्षीच्या वेणीसारखी, सहजपणे एकमेकात गुंफलेली .

लहानपणी आमच्या परसदारी गुलबक्षीची रोपे होती. झुडूपवर्गीय, नाजुकशी ,हिरवीगार पाने, नाजुक , रंगबिरंगी फुलांनी बहरलेली. फुलांचे रूपांतर हलक्याफुलक्या काळ्या छोट्या बियां मधे व्हायचे. ती छोटीशी बि बंद ओठांवर ठेवून फुकंरीने जास्तीत जास्तं वर उडवायची आसा आम्हां मुलांचा खेळ.

फुले फुलण्याची वेळ साधारण संध्याकाळी चार साडेचार वाजता. नेहमीच संध्याकाळी आजी, काकू, मावशी बहिणी यानां या फुलांची वेणी बनवून केसात माळताना बघीतले.

बाकी फुलांची वेणी बनवताना
सुई टोचते , दुखापत होते तर दोरा फुलांना बाधूंन ठेवतो म्हणजे जबरदस्तीने एकत्र आणतो. तसच काहीस नात्यांत, थोपलेल्या नात्याची गुंफण घट्ट जरी असली तरीही ती क्लेशदायक तशीच त्याची उकल सुद्धा अवघड.

गुलबक्षीची वेणी बनवताना ना दोरा ना सुई याचा वापर होतो.गुलबक्षीची फुलं एकमेकात गुंफली जातात जणू दोन जिवलग मैत्रीणी हातात हात गुंफलेल्या.जशी वेणी विणायला सोपी तशीच उकलायला पण. अवघडपणा नाही तर नुसतीच गुंतागुंत. फुले एकदम नाजूक , नात्यांसारखीच, जास्त हाताळली तर कोमेजतात. यानां कुठल्याही प्रकारचे बंधन लागत नाही. दिवसभर डोक्यात माळली तरी गुंफण काही सुटत नाही. नाते कसं आणी कीती घट्ट आसाव याचं सुंदर उदाहरण.

मुक्तकविचार

प्रतिक्रिया

सोत्रि's picture

18 Mar 2021 - 5:53 pm | सोत्रि

- (वेणी/हार बनवायची पद्धत आवडलेला) सोकाजी

मुक्त विहारि's picture

18 Mar 2021 - 6:05 pm | मुक्त विहारि

गुलबक्षीच्या वेणीसारखी, सहजपणे एकमेकात गुंफलेली.......

मस्तच ....

सौन्दर्य's picture

18 Mar 2021 - 6:25 pm | सौन्दर्य

गुलबक्षीला इंग्रजीत 'इव्हनिंग ग्लोरी' असं नाव आहे. नावाप्रमाणेच ती संध्याकाळीच फुलते. आमच्याकडे गुलबक्षीच्या झाडावर गुलाबी, पिवळ्या, पांढऱ्या रंगांची फुले तर यायचीच तसेच गुलाबी फुलांवर पिवळ्या रेषा, पांढऱ्यावर नाजुकशी गुलाबी रेष, असे विविध प्रकार असायचे. मी ह्युस्टनला असतो, इथे देखील गुलबक्षीची रोपे आहेत.

गुलबक्षीच्या गुंफलेल्या वेणीची नात्यांच्या विणीशी केलेली तुलना आवडली.