{मुंबईत झालेल्या कालच्या बोम्ब स्फोटात अतेरेक्यांशी लढताना शहीद झालेल्या त्या सा-या लोंकाना अन पोलिस कर्मचा-याना ही आदरांजलि ...
)
रोजच्या सारखे आई बाबा गेले कामाला
पुन्हा येतील घरी परत वाटे आम्हाला ..
रात्र झाली कुणाची आई आली बाबा आले
पण माझे बाबा रात्री उशिरा येतील हेच वाटले
रात्र झाली इतक्यात कुठून तरी आवाज आले
बाबा धावत तिकडे गेले ...
काही लोक ज्यांच्या हातात मोठी बन्दूक लोकांवर गोल्या झाडी
शुर माझे बाबा अन त्यांचे मित्र हाती लहान क्षस्रे तरी त्यांचा पीछा न सोडी..
ह्या आधी बाबा माझे असेच शुरा सारखे लढले होते
न जानो कितिक अपराधी त्यांच्या पायाशी येउन निपचित पडले होते
पण काळ राक्षस अन भिमासारखे युद्ध घडले होते ..
लोक सांग तात बाबा अभिमन्यु सारखे लढले होते
तिकडे हात बोम्ब एके ४६ अन बाबांकडे तेच जून पुराने पिसतोल होते ,
नाहीतर आजही बाबा सुखरूप घरी असते ..
ते नाही आले आल्या त्या त्यांच्या शहीद झाल्याच्या बातम्या
आईच्या काळजाला यातना
आता ती बोलत नाही बघत असते दाराकड़..
आई बाबा कुठे ग गेले विचारता बोट करते नभाकड़..
आज शा ले लाही होती सुट्टी
बाबानी माझ्याशी केलि का अशी कट्टी?
सगळे घेतात जवळ मला फिरवतात हात तोंडा वरुण
मला कलेना का गेले बाबा सोडून अर्ध्यावरून..
ताई च्या लग्नाची बाबाना होती चिंता
मी आहे असा लहान कोण सोदवेल हां गुंता?
आज सकाळी सा-या पेपरात फ़क्त बाबांचे गुणगान होत
तुम्ही काही ही बोलणार बोलायला तुमच काय जात ?
आजी आजोबा बनले जसे दगडांची मूर्ति !
बाबा इतके शुर की देवबप्पाला कळाली कीर्ति?
काल बाबांकडे मी खाऊ मागितला होता
नाही दिला म्हणुन कोपा-यात रुसून बसलो
याना बाबा नको आता खाऊ
सांगा मी रोज सकाळी अन रात्रि कुणाला पापी देऊ ?
आई च्या डोळ्यातल रडून रडून संपलय आता पाणी...
उठालाय कर्फु लोक जाऊ लागले पुन्हा कामाला
आतातरी येतालना बाबा घरी तुम्ही झोपल्यावर
दिवसा मी लावणार नाही जोरात गाणी
बाबा नका असे रुसू नाका लपून बसु
आजी बाबा अन आईच्या गालावरच रुसले हसू
...............
बाबा सांगा कुठवर मी तुमची वाट पाहत बसु ?
kavi grishm gunjal
प्रतिक्रिया
28 Nov 2008 - 12:07 am | कपिल काळे
हो, हे शूर वीर काही अंदाज नसताना मृत्युच्या जबड्यात चालत गेले असेच म्हणावे लागेल.
त्यांना ना अतिरेक्यांची , त्यांच्या तयारीची महिती होती, ना त्यांच्याकडे अतिरेक्यांच्या शस्त्रांशी जवळपास तुलना करता येइल अशे शस्त्रे होती.
http://kalekapil.blogspot.com/
28 Nov 2008 - 5:33 am | llपुण्याचे पेशवेll
या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांची खालील माहीती नेटावर मिळाली.
Mr. Date is an officer of Indian Police Service and deputy inspector general of police in the Central Bureau of Investigation (CBI). He holds a Doctorate from Pune University, a master�s degree in commerce, and is a qualified cost and management accountant. In his 14-year policing career, Mr. Date has held several important posts in state and national police organizations. During his Humphrey fellowship year, Mr. Date will study the theoretical and practical aspects of controlling white-collar and organized crime in the United States.
पुण्याचे पेशवे
28 Nov 2008 - 8:37 pm | विनायक पाचलग
मित्रा
या कवितेने खरेच गहिवरुन आले .
याला काय म्हणायचे दैव निष्काळ्जीपणा की आलेला काळ
भावपुर्ण आदरान्जली