फुलटू माज

टारझन's picture
टारझन in जनातलं, मनातलं
27 Nov 2008 - 11:03 am

कोणतीही गोष्ट कधीही कशीही आठवू शकते. .. आम्ही किती माजुरडे होतो, याची आठवण झाली.

असं म्हणतात, नुकत्याच तरूण वयात जर व्यायाम/कसरत केली की अंगात 'माज' येतो. हा 'माज' नकारात्मक दृष्टीने नव्हे, अंगात अशी एक प्रकारची रग शिरते की ती ताकद कुठे तरी कशी तरी दाखवलीच्च पाहिजे अशी माणसिकता होते. आणि मी अशा माणसिकतेतूनच गेलोय, थोडंस मोकळं करतोच ...यावरून फक्त मला 'जज' करू नका हीच विनंती. कारण काळा नुसार माणूस बदलतोच. परिपक्व होतो (अपवाद सोडता).

असो, तर लहाणपणापासून तोंडात लै जोर होता. शाळेत असताना देखिल मोठ्या पोरांना चिडवणे हा आवडता उद्योग होता. त्यांचे फटके खायचो, पण बकबक बंद होत नसे. आपण एखाद्याला एखादं नाव पाडलं की ऑटोमॅटिक पब्लिक त्याचं ओरिजिनल नाव विसरत आणि त्याला मी नामांकित केलेलं नाव पडे. लै मार खायचो. थोडा मोठा झालो. अकरावी-बारावी.भोसरीत (भोसरी एम.आय.डी.सी. आशियातला सर्वात मोठा इंडस्ट्रियल झोन आहे, म्हणजे आपल्याला माहित असायला हरकत नाही. ) रहायला आलेलोआमचा इलाका म्हणजे फुलटू भाईगिरी वाला इलाका. इकडे भाई, तिकडे भाई, भाईच भाई... निसत्या गँगवॉर मारामार्‍या. आणि आम्ही असे नविन.. तोंडात जोर.. हाईट सहा फूट आणि वजन साठ किलो.. फुल पाप्याचा पितर. तसे माझे चुलत भाऊ तिथं भाईच होते म्हणा. पण आम्ही आपले मारखाऊ.. मग एकदा पेटलो. कॉलेजला गेल्यावर जिम लावली (२३ फेब्रु २००२). आधी आपली कामचलाऊ नगरपालिकेच्या जिम मधे जायचो. चुलत भाऊ सकाळी उठवायचा.. त्याचा लै राग यायचा .. पण आपला मुग गिळून त्याच्याबरोबर जावं लागे. एक दिवस उठलोच नाय. त्याने मला खांद्यावर उचलून जिम ला नेला आणि घराखालच्या रोडवर ठेवला. सकाळच्या गारठ्यात लैच टोचत होतं म्हणून उठलो. ३ महिइन्यात जिमची नशा एवढी चढली की एखाद्या अट्टल बेवड्याला दारूची नसावी. ३-३ तास जिम मधे फुल्टू हेवीवेट याम करणे यात जो आणंद मिळे... तो अजुन कुठेच नाय मिळे. ६ महिन्यात बॉडी. झकास .. आणि मग आंगात 'माज' नावाची गोष्ट आली. दिसला कोणी आणि नडला ही हाण तिज्यायला. ...बापाला कौतुकच भारी.... ऐपतीप्रमाणे खुराक .. रोज अर्धाकिलो चिकनची उक्कड मिळायची. चिकन नसेल त्या दिवसी १० अंडी उकडलेली(पिवळा भाग काढून) आणि तेही नसलं तर " चहा चपाती" आता चपात्या अंमळ ६च्या वर निघुन जायच्या .. पण आईने कधी कंटाळा नाय केला बॉ .. आता हेवडं सगळं मिळत आसल्याव आंगात 'माज' यणारच की... आपला एक मित्र होता.. विशाल.. (इशल्या)... ५ फुट २ इंच .. जिम मधे पार्टनर.
दोघं मिळून पार कुथून कुथून याम करायचो. स्कॉटला तर लैच मज्जा यायची. कोण जास्त वेट मारतो याची शर्यत अघोषित पणे लागायची. जिम मधली नवी पोरं मस्त आमच्या भोवती राउंड करून उभी रहायची. काही पब्लिक हेव्याने आमच्या एवढी वजनं मारायला जायचं आणि क्रँप करून घ्यायचं .. तर 'माजा'चा मुद्दा असा... इशल्याच्या घरापाशी हे युपीबिहारी बॅचलर पोरं रहायची... एका सिंगल रूम मधी ७ जणं च्यायला झुरळांचेच वंशज.. कशे मावायचे माहित नाय. त्या बिहार्‍यांपैकी एकाने इशल्याच्या भैनीला काही तरी कमेंट पास केली. आम्ही जिम वरूनच येत होतो.. जसा मॅटर कळाला ( आम्हा सगळे लोचे, भानगडी कींवा काय असंल त्याला "मॅटर"च म्हणायचो) .. तसा इशल्या बोंबलला.. चल आपल्याला एकाला कुथवायला जायचंय.. मला हर्षवायू झाला.. घामाचे कपडे न बदलता तसाच बिहार्‍यांच्या रूमवर... इशल्यानी दरवाज्याला 'जंजीर' स्टाईल लाथ टाकली. ७ पैकी ५ बिहारी लोळत पडलेले.
त्यात मुख्य आरोपी पण होता.. इशल्याच्या डोळ्यार रगात उतरलेलं.. आणि मी आपला नेहमी प्रमाणी हिहिहि करत मागं हुबा होतो... इशल्यानं डायलॉग टाकला ज्याला तंगड्या शाबुत ठिवायच्यात त्यानी पळा.. ह्ये आज मार खाणार.. एक बिहारी पळतच होता.. त्याच्या पार्श्वभागावर लाथ टाकायची इच्छा काय आवरली नाय. ते उंबरठ्यात पडलं.. उरले ४ बिहारी.. इशल्याची हाईट कमी.. ते मोरीवर चढलं अन हाणायला लागलं.. १ जण बोलायला तोंड उघडणार तशी सान्न कन त्याच्या तोंडात पडली.. त्याच्या मानेला एक हिसका दिला आणि त्याला बाहेर ढकलला.. ते ढकलंन एवढं हळूवार होतं की त्याला पडावंच लागलं.. मुख्य आरोपीला इशल्यानी तिंबवला.. त्यानी तोंड झाकायचा प्रयत्न केला की पोटात लाथा अनं पोट दाबलं की तोंड चेपने.. १० त्याला हाणून झाल्यावर निघावं ना ? बाकी दोघं कोपर्‍यात गप बसलेली .. त्यांच्या बी पेकाटात लाथा बसल्या. त्यादिवशी आत्मशांती मिळाली... फुलटू माज

एक दिवस पिंपरीच्या एच.ए. ग्राऊंड बसस्टॉप ला उभा होतो. कॉलेजातून घरी येत होतो. डि.वाय.चं पब्लिक असतं.. एकंदरीत पक्षी असलेला बस स्टॉप. त्यादिवशी सबमिशन ने वैतागलेलो. आणि थोडा रागातच होतो. पाऊण तास झाले बस नाही. अजुनच चिडचिड झाली. एक बस आली.. ती जाम भरलेली. आणि दोन झोपडपट्टीवीर मागच्या दरवाज्याला लटकलेले.तोंडात गुटखा,पुर्ण झोपडपट्टी वेश.बस थांबली.. पोरी चढायला लागल्या तर भौंनी एका हाताने बस ला लोंबकळून एक तंगडं हवेत अशी त्यांना जागा करून दिली.त्या चढल्या नाहीत. मी चढेपर्यंत बस सुटलीच.. चढणार तर ह्यांनी जागा दिली नाही.. अन् बस सुटली.गप होतो.. पण बस निघली आणि त्यांच्यातली **मस्ती जागी झाली.. माझ्या उद्देशाने .. "ए .. **द ... चल्ल्ल्ल्ल्ल निइइइइइइघ .. भा*** " अरेच्च्या ,, ब्रेन टेंप्रेचर काही मिलीसेकंदात १०००डेग्रीच्या वर गेलं.. आता बस स्टॉप संपला की पुढे एक चौक होता, मासुळकर कॉलनीच्या बाजूने एक बस आली आणि ही बस थांबली.. आपसूकच पळत गेलो.. मघाच्या विराला पोटरीला धरून खाली ओढला...तो आपटलाच .. त्याचा आवाज आणि हात एकदम माझ्या रोखाने आले.. मी सावधच होतो.. पण आमचे कानुन से लंबे हाथ खान्न कन कानाखाली बसले दुसरी लाथ गुढग्यावर बसली.. (गुडघे फोडणे हा एक राक्षसी आणंद होता) .. पोरगं केकलंत खाली बसलं ते झोपलंच .. नविन शुज होते.. दुसरी,तिसरी,चौथी लाथ पोटात .. थोड्यावेळाने जमीन ओली झाली .. मला किव आली.. त्याला उचलायला हात दिला .. तर भाऊ पळूनच गेले. .. फुलटू माज

कॉलेजला जाताना कासारवाडी ते अकुर्डी हा नियमित प्रवास होता. ९.२० ची लोकल, दुसरी बोगी, तिसरा दरवाजा, ही आपली हक्काची जागा ठरलेली असायची. कोणी असलाच तर त्याला आपसूक दाबून टाकले जाई .. नाही तर चावर्‍या कुत्र्यासारख्या नजरेनेच हलवलं जाई.. तर असाच एक दिवस. कोणीतरी सिगारेट फुंकत होता. आता सगळा स्मोक माझ्या नाकात जात होता. एकदाच समजावलं भौ चलती ट्रेने मे सिगरेट पिना तो हानिकारक है ही .. पण मेरे सामने पिणा पण हाणिकारक है .. सांगितलं .. नाय ऐकलं .. नेक्श्ट टैम तोंडातली सिगरेट काढली अन फेकली .. तोंडातून आवाज चढणार इतक्यात डोकं आणि लोखंड वाजल्याचा टन्न कन आवाज झाला, चिंचवड स्टेशन ला भौसाहेब उतरून गेले .. फुलटू माज

एकदा पुण्यातल्या कोणत्याश्या कॉलेजात काही राडा झाला होता, तेंव्हापासून आमच्या कॉलेजात सिक्युरीटी वाला गेटपाशी आयकार्ड मागायचा... माझ्याकडं आयकार्ड असायचं पण मुद्दाम काढायचो नाय.. शिक्युरीटीनी आयकार्ड इचारला.. तोंडावर रेड्याची गुर्मी. "आयकार्ड नाय भो .. " , "आयकार्ड शिवाय यंट्री नाय " -शिक्युरीटी..
काय करणार बे ? आणि निघायला लागलो , गार्डचा हात आडवणार तोच असा दाबला की भौ गपगार बसले. त्यानी हेड गार्डला तक्रार केली असावी. हेड गार्डने मला पाहिल्यावर 'दादा' 'दादा' चा पाढाच लावला राव... कँपस मधे जिथं दिसेल तिथं 'काय दादा काय चाल्लय' 'नमस्कार''चमत्कार' च्यायला आपली हवाच... फुलटू माज ..

एकदा बॉडीशो ला गेलेलो.. बाहेरून आलेल्या जिमची पोरं होती .. काही तरी राडा झाला आणि शो च्या जागीच मारामार्‍या सूरू झाल्या .. फुल बेंच.. टेबलं उचलू उचलू मारामार्‍या... तिथं मिटली .. बाहेर जाउन परत मारामार्‍या. पण घाबरू नका.. मी नव्हतो त्या मारामारीत ... मी स्टेज वर होतो ना :)
एकदा बस मधून येत होतो . एक १०-१२ वर्षाचं पिटूकलं लैच गरीब .. बिचारं खिडकी उघडी ठेऊन बाहेरची गंमत पहात होतं .. रात्री आठवी वेळ होती .. घरी परतंत होतो. त्या पिटूकल्याला मागे बसलेल्या एकाने अजानक डोक्यात जोरात हानली... कळलंच नाही काय झालं .. त्याने मागं पाहिलं आणि मारणार्‍याला का मारलं विचारलं तर दुसरा फटका .. अरे ? डोक्यातच गेला ... तिसरा मोठा आवाज झाला यावेळी त्या मारणार्‍याच्या डोक्यात बसली होती. मी आपला गप उभा होतो जसं मला माहितच नाही कोणी आवाज काढला तो.त्याने माझ्याकडे पाहिलं अन् गुमान गप्प बसला, :) बाकी पब्लिक येड्यागत नक्की काय झालं तेच पहात होतं .. फुलटू माज

कॉलेजचा काळ होता, त्यामुळे 'माज' होताच .. कामाला लागलो .. आणि 'माज' गायप झाला. आता मारामारी जवळ जवळ नाहीच :) आता आम्ही फॉर्मल फॉर्मल वागणारे , गोड गोड बोलणारे पांढरपेशी झालेलो आहोत.

-----------------------------------------------------------------------------(माजलेला रेडा) टार्‍या

मौजमजाप्रकटन

प्रतिक्रिया

मृगनयनी's picture

27 Nov 2008 - 11:27 am | मृगनयनी

टार्या........ तू खरचं माजोरा आहेस...... :)

पण तुझ्या माजातही मला एक निरागसता जाणवते. (काय माहिती का? ) :-?
पण अन्यायाला विरोध करण्यासाठी तू या माजाचा, तुझ्या बिल्ड अप बॉडीचा वापर करतो, हे वाचून खरंच शिवकालीन मावळ्यांची आठवण आली.

तुझे बसमधले, कॉलेजातले, गल्लीतले "माजोरे" प्रसंग खरोखरच मस्त आहेत...
काही लोक आपल्या कल्पनाशक्तीला पार फाडुन अकल्पित प्रसंग वाचकांसमोर , स्वत:ची क्षमता सिद्ध करण्यासाठी लिहितात.... अर्थात त्याची सत्यता, १ % असते, हे वाचकांना ही माहित असते. पण तुझे तसे नाहीये. (कारण तुझ्या माजा'ची आणि "पावर" ची समस्त मिपाकरांना पुरेपूर कल्पना आहे.) वर उल्लेखलेले प्रसंग "लाईव्ह" पाहताना खरंच खूप मज्जा आली असती आम्हाला!

त्यामुळे जस्ट कीप इट अप... सध्या आफ्रिकेत असलेला तुझा सुप्त माज, भारतात आल्यावर उफाळून येवू दे, ही सदीच्छा! :)

-> शिवरायांच्या मावळ्यांचा आदर करणारी,
मृगनयनी.

:)

टारझन's picture

27 Nov 2008 - 12:11 pm | टारझन

स्वत:ची क्षमता सिद्ध करण्यासाठी लिहितात.... अर्थात त्याची सत्यता, १ % असते, हे वाचकांना ही माहित असते.
सहमत. पण त्यांचा किती मोठा पोपट होतो .. हे त्यांना कळत नाय ना .. मला काय क्षमता सिद्ध करायची गरज ;) आहे तो असा आहे. एकदा केनियात पण संध्याकाळी चालताना एक कल्लू पाकिट मारत होता. स्वाभाविकच त्याच्या तोडावर एक बसलेली. हे सगळं सेकंदांत होतं ग.. त्याला फिल्मी डायलॉग वगैरे नाही लागत. माझा छोटा भाऊ माझ्यापुढे गेला निघुन .. खि खि खि
९५% वेळा मारामारीची वेळ नाही येत. बॉडी लँग्वेजनेच कामं होतात. असा अणूभव

शोलेतल्या बिरू स्टाईल : जिस जिस को शक हो वो सामने आ जाय :)

अवांतर : मृगनयनीजी, आपण लेख वाचला आपल्याला आवडला , धन्यवाद.
आपल्या प्रामाणिक प्रतिक्रियेबद्दल आभार.
(लवकरच १०० लेख पुर्ण करतो. :) )

- टारझन

स्वप्निल..'s picture

27 Nov 2008 - 12:22 pm | स्वप्निल..

काही जणांना मार पडल्याशिवाय समजतच नाही...

>>हे आपल्या सरकारला केव्हा समजणार... :(

(लवकरच १०० लेख पुर्ण करतो. )

कर कर ..लवकर कर..मी वाचतोय.. :)

स्वप्निल

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 Nov 2008 - 12:30 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

९५% वेळा मारामारीची वेळ नाही येत. बॉडी लँग्वेजनेच कामं होतात. असा अणूभव
बर्‍याचदा फाटका इसमाचाही फक्त हिमतीच्या जोरावर निभाव लागतो, स्वानुभव आहे.
टार्‍या चांगलं लिहिलं आहेस रे!

टारझन's picture

6 Dec 2008 - 12:51 pm | टारझन

बर्‍याचदा फाटका इसमाचाही फक्त हिमतीच्या जोरावर निभाव लागतो,
सहमत ... पण कोण्या पावशेराने उगाच छाती फुगवली तर लै टोले पडण्याचा संभव असतो , स्वानुभव दिलेत :)

स्वानुभव आहे.

अबब .. तो नक्की ऍग्रेशन ने घाबरला असावा की एक महिलेशी नकी वाद घालायला म्हणून ?

- टारझन

बिपिन कार्यकर्ते's picture

27 Nov 2008 - 12:43 pm | बिपिन कार्यकर्ते

टार्‍या, तू मस्तच लिहितोस. एकदम मनमोकळं. मजा आली. अरे पण आता दुसरा भाग पण लिही. हा माज कसा कमी झाला (झाला असेल तर ;) ते पण लिही. :)

अवांतरः शहीद भगतसिंह, सुखदेव, राजगुरू यांची एक गोष्ट आठवली. हे लोक लाहोर मधे असताना, खूप व्यायाम वगैरे करत. साहजिकच 'बॉडी' तयार झालेली. तू म्हणतोस तसा 'माज' अंगात सुरसुरत होता. एकदा ही मंडळी रस्त्यावरून चालले असता सुखदेव (का राजगुरू?) यांनी अचानक समोर येणार्‍या एका माणसाच्या कानाखाली लगावून दिली. बहुतेक कारण काहीच नव्हते. त्या नंतर भगतसिंहानी त्यांची जी शाळा घेतली, खूप झाडले. ते म्हणाले की ही रग जी अंगात आहे ती देशाच्या कामी लाव. क्रांतिकारी विचार तर त्यांच्यात होतेच, या प्रसंगानंतर मात्र ते (सुखदेव / राजगुरू) अजून जोमाने सामिल झाले. (चु.भू.दे.घे. डीटेल्स वेगळे असतील पण गोष्ट खरी आहे. खूप पूर्वी एका प्रसिद्ध इतिहासाच्या पुस्तकात वाचले होते.)

बिपिन कार्यकर्ते

पांथस्थ's picture

27 Nov 2008 - 3:10 pm | पांथस्थ

साली आमची सगळि रग तोंडात. हात हलतच न्हाय :(

मस्तरे मित्रा!

(अवांतरः मी डी.वाय. पाटिल ला डिप्लोमा केला आहे. तु पण डि.वाय. ला होतास का?)

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...

टारझन's picture

27 Nov 2008 - 3:18 pm | टारझन

डी.वाय. पाटिल कॉलेज ऑफ इंजिनियरींग , अकुर्डी रेल्वेस्टेशनच्या मागे.
मी इंजिनियरींग ला होतो मित्रा
२००६ पास आउट ! डिप्लोमा पण आला होता नंतर नंतर तिकडे.

पुन्हा बिपिनजी, संहिताजी आणि पांतस्थजी,
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार

- टार्कृष्ण

शिंगाड्या's picture

27 Nov 2008 - 6:33 pm | शिंगाड्या

गाववाल्या :-) (आमचे पण पुण्याचेच पाणी), एकदम मस्त लिहिल आहेस..
तो झुरळांचेच वंशजांना मारलेला स्प्रे अन बसमधला प्रसंग तर सहीच आहे..
ताकदीचा योग्य वापर केलास!!

ऋचा's picture

27 Nov 2008 - 6:58 pm | ऋचा

टार्स
लै म्हणजे लै भारी लिहिलस
तु असाच पुढचा भाग लिहि
तुझा माज कसा कमी झाला वैगेरे....

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

कपिल काळे's picture

27 Nov 2008 - 8:55 pm | कपिल काळे

टार्स

मी जितके पैलवान, बॉडी- बिल्डर बघितले आहेत, किंवा ज्यांच्या संपर्कात आलो आहे, ते मनाने खूपच भाबडे असतात. त्यांच्या मनात कपट कधीच येत नाही. तुझे लेखन वाचून पण तुझा भाबडेपणा जाणवल्याशिवाय रहात नाही.

हा गुण सगळ्यांच्यात कसा काय येतो हे तो एक मारुतीरायाच जाणे.
तुझे सद्ररक्षणाय, खलनिर्दालनाय असे कार्य सुरु ठेव.

http://kalekapil.blogspot.com/

चतुरंग's picture

27 Nov 2008 - 9:58 pm | चतुरंग

आपल्या शरीराविषयी एकप्रकारचा वेगळाच आत्मविश्वास निर्माण होतो. भीती कमी होते. जिथे भीती असते तिथे कपट येते!
सामर्थ्याचा योग्य वापर करण्याचे वळण मनाला असेल तर चांगल्या गोष्टी घडतात अन्यथा गुंडागर्दीकडेही मन ओढले जाऊ शकते पण सर्वसाधारणपणे तुमचे निरीक्षण बरोबर आहे.
मीही काही सौष्ठवपटूंना ओळखतो तेही स्वभावाने मृदु आहेत.
समर्थांनी म्हणूनच बलोपासना सांगितली आहे! अकरा मारुतींची स्थापना काय उगीचच केली काय त्यांनी?
जय हनुमान!! :)

चतुरंग

शितल's picture

28 Nov 2008 - 12:08 am | शितल

टार्‍या,
आता ऐवढा आहेस, तर कॉलेज मध्ये असताना किती असशील :) (ह.घे.)
लेख आवडला. :)

प्राजु's picture

28 Nov 2008 - 6:36 am | प्राजु

माज म्हणजे माजोरी.. आपण चुकतो आहोत हे समजूनही तसंच वागत रहाणे म्हणजे माज.
तू जे काही केलंस म्हणजे मारामारी.. हाणामारी.. वगैरे.... ते दुसरा कोणी माज करत असेल तर त्याचा माज उतरवण्यासाठीच.
लेख मात्र आवडला. प्रांजळपणे आणि मोकळे पणाने लिहिलेला लेख आवडला.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

टारझन's picture

28 Nov 2008 - 10:06 am | टारझन

अग्गं प्राजु तै ... मी असा गुढग्यात असल्यासारखा तु म्हणतेस तो 'माज' नाही केला कधीच. आणि ते पटतही नाही. पण सांगणे का तात्पर्य की, कोण पण .. मीच नाही... याम केला ना .. की अंगात रग येतेच. कुठे तरी ताकद दाखवावीशी वाटते. कधी कधी आपलं बॉक्सिंग किंट बडवणे, थोडं काही झालं की ऍग्रेसिव्ह भुमिका घेणे,इ.इ.
येप्स मी कधीच दादागिरी नाही केली, ना कधी आपण भारी, हाण कोणा मरतुकड्याला असं केलं.
ते जिम ला जायचो तिथलं पब्लिक अशा खुमखुमीला 'माज' असणे म्हणायचं. बाकी समाजकार्याचं फॅड जबरदस्त होतं, कोणा मित्रासाठी पण मारामारीला पुढे.
बरं आमचे मित्र आघाडीवर, नेहमी आपले शेळी सारखे असणारे, मी बरोबर असलो की तेच्च वाघ व्हायचे, अरेच्चा :)
त्यांचाच आवाज वर.

सालाबाद प्रमाणे, सर्व मायबाप वाचकांचे आभार..
आणि स्वतःला १०० लेख पुर्ण करण्यासाठी शुभेच्छा ! आणि अजुन लेख येउन द्या म्हणनार्‍यांनो .. जेवढं होतं तेवढंच लिवलं भो, उगाच माणसिक मनोरे कसे उभे करू ? माज उतरला तो काळाच्या ओघात. ऑटोमॅटीक .. जॉबला लागल्यावर मला "रूड बिहेवियर" ची नोटीस मिळालेली.. असो तो वेगळाच्च मॅटर होता म्हणा. पण आवाजाचा टोन कसा राखावा, राग दाबून वर दात कसे विचकावे इत्यादी, ते जॉब मधेच शिकलो. फक्त बॉडीलँग्वेजने डॉमिनेट केल्याची आणि मारामारी न करण्याची लैच्च उदाहरणं आहेत.
असो वर एक लिहायचं राहिलेलं, जे बस मधलं पोरगं होतं ना, त्याला खिडकीतून गार हवा लागत होती, त्याने त्या पुढच्या गरिब मुलाला (खेकसून) सांगितलेलं खिडकी बंद कर, त्याने नकार दिला असावा.

बास ..

(आजवर कद्धीच हाटकून माज न केलेला)
- टारझन

अनिल हटेला's picture

28 Nov 2008 - 7:42 am | अनिल हटेला

टारूबाळाचा विजय असो.................

(अजुन एक माजलेला)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

चतुरंग's picture

28 Nov 2008 - 11:04 am | चतुरंग

एकदम टकाटक लिवलं आहेस की! तू केलेली 'समाजसेवा' जाम आवडली अन पटली!
अरे, त्या वयात असं वाटतंच की कुणा संडूला जाम बुकलून काढावे फुरफुरणारे स्नायू जरा गप होतात! तुझ्या लिहिण्यातला निखळपणा आवडला.

मी कधीच एवढा बलदंड नव्हतो. पण मी ही थोड्याफार मारामार्‍या केलेल्या आहेत! ;) एक चांगलीच आठवते.
सातवी-आठवीतली गोष्ट. वर्गातल्या एकाचे आई-वडील आमच्या शाळेतच शिकवायला. फुल माज करायचा तो. दमदाटी, गरीब पोरांना मारणे. बाहेरची मुले आणून दमबाजी, मारामारी असले प्रकार.
माझी त्याची दोन तीन वेळा झनापनी झालेली. त्याने बाहेरची मुले आणून मला दोनेकदा चोपलेले होते. त्यामुळे तसा दबून असायचो पण माझ्या मनात अपमान ठुसठुसत होता!
शाळेच्या ग्राउंडवर लांब उडीसाठी रेती भरलेले खड्डे होते. त्यात साठलेल्या पावसाच्या पाण्यात उड्या मारणे हा आमचा नेहेमीचा आवडता खेळ.
एके दिवशी तो आला आमच्यातल्या एकदोघांना दमदाटी करुन ढकलले. मला ढकलून पाण्यात पाडले आणी माझे दप्तरही भिरकावून दिले. मग मात्र मी सटकलो.
त्याच्यावर धावून जाऊन त्याला लोळवले, अचानक हल्ल्याने तो गांगरुन गेला. पाय धरुन फरपटत त्याला ओढत खड्ड्यात ढकलले. वर उडी मारुन त्याचे तोंड पाण्यात दाबून धरले. त्वेषाने हल्ला केल्याने माझ्या अंगात फारच जोर आला होता. ५-१० सेकंद पाण्यात बुडाल्याने नाकातोंडात रेतीचे पाणी जाऊन, गुदमरुन, वेडावाकडा होत उसळून तो बाहेर आला. त्यानंतर तो जाम टरकला होता! पुन्हा म्हणून कधी माझ्या वाटेला गेला नाही! ;)

चतुरंग

घाशीराम कोतवाल १.२'s picture

28 Nov 2008 - 11:27 am | घाशीराम कोतवाल १.२

टार्‍या माज चांगला हाय खास करुन ईशल्या बरुबर केलेलि तुम्बा तुम्बी कारन त्याची भन ती तुझी भन चोपलास ना त्या झुरळांना
जबर्या हाण्लास ना
मागोवा - आमच्या काही उचापत्याचा...

स्वानन्द's picture

5 Dec 2008 - 8:50 pm | स्वानन्द

मस्तच लिहिलंय रे.

पण एक गोष्ट मात्र खरी... दुसरयासाठी लढताना वेगळाच आत्मविश्वास जागा होतो.

शाळेत असतानची घटना आठवली. एक 'वांड' क्याट्यागरीतल्या मुलाने माझ्या एकदम खास दोस्ताला खाली पाडला आणि दोन तीन लाथा घातल्या. अस्मादीक सहसा शरीर बळापेक्षा वाक् बळ जास्त वापरण्यावर भर देणारे असल्यामुळे सुररवातीला समजावण्याचा प्रयत्न केला पण पोरगं ऐकत नाही म्हटल्यावर दे दणादण चोपला. आणि वर्गाच्या भिंतिवर डोकं आपटलं. दोन मिनिटं त्याला काही सुधरेचना! आणि मग थोड्या वेळाने सीन असा होता कि ते पोरगं सुन्नपणे भिन्तीजवळ बसलेलं आणि मी डोळ्यात पाणी आणून त्याला सांगतोय्.."बघ सान्गत होतो ना तुला; कशाला उगाच मारलास त्याला....."

असो. जाता जाता ..... मी ही 'डी वाय' चाच रे. फक्त पिम्परी डी वाय चा :)

टारझन's picture

6 Dec 2008 - 12:47 pm | टारझन

."बघ सान्गत होतो ना तुला; कशाला उगाच मारलास त्याला....."

=)) =)) =))
बेष्ट ... सेम टू सेम .. मी माझ्या छोट्या भावाला मारला होता, कारण तो आमच्याबरोबर विहीरीवर पोहायला येत होता म्हणून.. तो रडायला लागल्यावर आईच्या माराची जाणीव झाली .. मी पण सेम म्हणालेलो .. "."बघ सान्गत होतो ना तुला; कशाला आलास माझ्या मागे ?....."

जाता जाता ..... मी ही 'डी वाय' चाच रे. फक्त पिम्परी डी वाय चा

जाता जाता विप्र चावले काय बे तुला ? अर्रे वा .. डि वाय वाला का तू .. उत्तम ..

- टारझन