दे दे लिंक दे !!

अत्रन्गि पाउस's picture
अत्रन्गि पाउस in जनातलं, मनातलं
21 Dec 2020 - 4:27 pm

कुणी काही माहिती सांगायला लागलं कि "लिंक दे"

कुणी काही मत मांडले रे मांडले कि "लिंक दे"

एखादा विचार मांडायला लागलं, कि (त्याच्या पुष्ट्यर्थ) "लिंक दे"

ह्यात ज्ञानोपासनेचा भाग असेलही बापडा !! पण मला पुष्कळ वेळा ऐकू येते ते असे

"तुला काही नवीन मुद्दा सापडलाय का , त्याला पुष्ट्यर्थ काही लिंक नसेल तर तू , तुझं बोलणं आणि तुझा मुद्दा व्यर्थ ..."

किंवा मग

"तु कुणाला काही उद्धृत करू पाहतोयस का ? मग तुझी वायफळ बडबड बंद कर आणि ज्याने कुणी ते मुळात काय म्हटलं आहे ते साल्या तू कुठून वाचलं ते आधी सांग. मी माझं स्वतंत्र बघून माझं मत मी बनवीन. मुळात त्या निमित्ताने तू कोणकोणत्या सोर्सेस कडून माहिती घेतोस त्यावर तुझी प्रतवारी ठरवीन. त्या नंतर त्या सोर्सेस मधल्या माहितीच्या दुर्बोधते वर त्याची अधिकृतता ठरविन ...जमलं तर त्या सोर्सेस कडून त्यांच्या माहितीच्या #लिंका मागवीन काहीही करिन."

किंवा मग

समजा ती लिंक नासा किंवा लॅन्सेट वगैरे शी संबंधित असेल तर "तुला लेका नासा वगैरे च्या लिंका काय समजणार, दे ती लिंक मला. मी ती लिंक रुपी भगवद्गीता वाचून तुला त्यावरचे माझे प्रतिपादन ज्ञानेश्वरी सारखे समजावून देईन.....आन ती लिंक"

किंवा मग

"छ्या दाराशा ला लेफ्ट हॅन्ड चा अड्वन्टेज आहे ...किंवा मग मिस मोहनींनी सर्व्हिस सुधारायला हवी टाईप..लखू गिरी करायला आपण मोकळे"

खरे सांगतो मंडळी मला ह्या ज्ञानोपासनेचा इतका धसका बसलाय कि बस ....अहो डॉक्टरांनी दिलेलं औषध दिवसात ३ वेळा घ्या म्हटलं कि निमूट घेणारी आमची सवय...पण हि लोक म्हणजे " हे काय? झिकतोमायसिन दिलंय ?? त्यापेक्षा फुकंटोमायसिन द्यायला हवे वगैरे उद्गार काढून तसे साक्षात त्या डॉक्टरांनाही सुचवतात. हल्ली शिल्लक नाहीत फारसे, पण त्या कम्पाउंडर्स इतकी सुद्धा माहिती नसते ह्यांना पण "जेहेंत्ते काळाचे ठायी .....द्या ठोकून तिज्यायला !!!"

*ह्याचाच अजून एक चुलत प्रकार म्हणजे "दे रेसिपी"*

अरे आज आमच्याकडे थालीपीठ मस्त झालं होतं म्हणायचं अवकाश "दे रेसिपी"

आमच्या इथल्या हॉटेलात फलाने कोफ्ते मस्त मिळतात असं कुणी सांगायला लागलं रे लागलं कि लगेच *"शोध रेसिपी"*

म्हणजे ह्यांचे म्हणणे चालले असते तर भीमसेन जोशींना भर मैफिलीत सांगितले असते "बुवा अहो तोडीत षड्ज ऋषभ मींड जिथून शिकलात ती जरा लिंक द्या बघू !!, आणि ते XXXX त्यात गंधाराचा कण जसे आणतात तसे अजून जमत नाही तुम्हाला" कदाचित ते नेमके कसे करायचे हे गाऊन सुद्धा दाखवले असते ....

च्यामारी रोज आमटीभात आणि भाजीपोळी खाणारी लोक आपण ...उगीच त्या चिकन कोकोवीं (असला उच्चार असणाऱ्या ) पदार्थाच्या रेसिपीज जाणून काय करतो ?? रेसिपी सोडा त्यातील घटक पदार्थ आपण ऐकलेले सुद्धा नसतात, वापरणं तर दूर ...पण नाही ...दे रेसिपी

एक साधी पुरण पोळी...आईची चव वेगळी, हिच्या हातची चव वेगळी माझी काकू करते त्या लुसलुशीत त्याची चव वेगळी....च्यायला ती चव घेऊन तृप्त व्हायचं का त्याच्या "दे दे लिंक दे , रेसिपी दे प्रूफ दे रे " म्हंणत गायला लागायचं ??

मी किती ऑर्गनाईझ्ड , मी किती सव्यसाची , मी किती ज्ञानार्थी , मी किती कलासक्त, मी किती सिस्टिमॅटिक मी किती सायंटिफिक अप्रोच वाला, मी कसा तत्वनिष्ठ , मी कसा सर्वंकष समृद्ध जीवनाचा पांथस्थ ह्या अभिनिवेशा पुढे सहज सोपं वागायचं बंद झालंय का

इंटरनेट आणि गुगल शपथ खरे सांगतो, मी भेदरून गेलोय हो ह्या लोकांमुळे

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Dec 2020 - 4:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लिंंक प्लीज....!

-दिलीप बिरुटे

टवाळ कार्टा's picture

21 Dec 2020 - 4:47 pm | टवाळ कार्टा

"दे रेसिपी"चाच अजून एक दूरचा नातेवाइक म्हणजे "या जेवायला" :)

तुमच्या म्हणण्याला काही आधार?
झालेच तर पुरावा?
कुठे कुठे होताना पाहिलेत हे?
लिंका द्या.

मूकवाचक's picture

21 Dec 2020 - 5:27 pm | मूकवाचक

मी किती ऑर्गनाईझ्ड , मी किती सव्यसाची , मी किती ज्ञानार्थी , मी किती कलासक्त, मी किती सिस्टिमॅटिक मी किती सायंटिफिक अप्रोच वाला, मी कसा तत्वनिष्ठ , मी कसा सर्वंकष समृद्ध जीवनाचा पांथस्थ ह्या अभिनिवेशा पुढे सहज सोपं वागायचं बंद झालंय का?

अंगी कित्येक सद्गुण आणि कला कौशल्ये असूनही निव्वळ याच अभिनिवेशापोटी उतार वयात एकाकी पडलेले, कुढत आणि चडफडत जगणारे लोक दिसतात तेव्हा हळहळ वाटते. पण स्वभावाला औषध नसते तसेच या अभिनेविशावरही काही औषध नसावे. असो.

काहीवेळा जेव्हा तरुण वयात माणसे जोडायची वेळ असते तेव्हा या *माजामुळे* समोरच्याला भाव दिला जात नाही.

उतारवयात मुले आपली विश्वात जातात, मित्रर, भाऊबहीण टाळायला लागतात तेव्हा जाग येते.. पण उपाय नसतो.

Bhakti's picture

21 Dec 2020 - 9:35 pm | Bhakti

मी कसा सर्वंकष समृद्ध जीवनाचा पांथस्थ ह्या अभिनिवेशा पुढे सहज सोपं वागायचं बंद झालंय का?

राजेंद्र मेहेंदळे's picture

22 Dec 2020 - 1:04 pm | राजेंद्र मेहेंदळे

बरोबर बोल्लात

उपयोजक's picture

25 Dec 2020 - 9:19 am | उपयोजक

आणि कितीही नुकसान झालं तरी हे लोक सुधरत नाहीत बरं का! :) सुधरायचं ते इतरांनी!

चौथा कोनाडा's picture

21 Dec 2020 - 5:31 pm | चौथा कोनाडा

मस्त लेख !

हे जन्मांतरीचे लिंकचे देणे आपल्याला द्यावेच लागते !

चामुंडराय's picture

22 Dec 2020 - 4:34 am | चामुंडराय

व्वा, चौ को,

>>> जन्मांतरीचे लिंकचे देणे आपल्याला द्यावेच लागते ! >>>

कर्मविपाकी सिद्धांतच मांडला कि !! 👌

सुबोध खरे's picture

21 Dec 2020 - 7:26 pm | सुबोध खरे

मस्त लेख !

जयन्त बा शिम्पि's picture

21 Dec 2020 - 7:41 pm | जयन्त बा शिम्पि

छान लेख

असा लेख तुम्ही ठोकू म्हणाल तर पहिल्या वाक्यालाच "अत्रन्गि पाउस यांनी जनातलं, मनातलं, मिसळपावडॉटकॉममध्ये
21 Dec 2020 - 4:27 pm यावेळी म्हटलं आहे असं लिहावं लागतं. "आमची चौकडी कोपऱ्यावर गप्पांसाठी जमली की पक्क्या आणि टण्या सारखे लिंका मागतात, बऱ्याच जणांना अशी सवय असते" असं लिहिल्यास ती ओळ विकिरखवालदार ^एडिट^(=डिलिट) करतात.

कुण्या टॉम बर्ननला उडती तबकडी backyardमध्ये दिसणे आणि आपल्याला दिसणे यात फरक असतो.

(लिंक आणि संदर्भ न मागताच द्यावे असे वाटते.)

सौंदाळा's picture

21 Dec 2020 - 9:01 pm | सौंदाळा

झक्कास लेख

Bhakti's picture

21 Dec 2020 - 9:35 pm | Bhakti

त्यापेक्षा फुकंटोमायसिन द्यायला हवे वगैरे उद्गार काढून तसे साक्षात त्या डॉक्टरांनाही सुचवतात....मी अशीच स्वयंघोषित
डॉक्टर होते.:)

चौकटराजा's picture

22 Dec 2020 - 9:41 am | चौकटराजा

लिंक मागणे हे वाईट आहे असे का वाटावे आजच्या जमान्यात ? ते आपले म्हणणे पक्के बिंबविण्याचा एक रास्त मार्ग आहे ! आज लिंका उपलब्ध असण्याच्या शक्यतेमुळे ही त्या मागितल्या जात असाव्यात की नाही ? ती देण्याचा कंटाळा असेल तर एक गोष्ट करावी " मला राहून राहून असे वाटते की.... पृथ्वी गोल आहे " असे वाक्यानेच सुरूवात करावी म्हणजे ती गोल आहे हे सिद्ध करण्यासाठी युरी गागारीन व्हावे लागत नाही !

अत्रन्गि पाउस's picture

22 Dec 2020 - 12:27 pm | अत्रन्गि पाउस

तथापि समोरच्यावर अविश्वास व / वा स्वतः चा (अनावश्यक) आत्मविश्वास दाखवण्याचा सोस ... हे जास्त अधोरेखित होतं

सिरुसेरि's picture

22 Dec 2020 - 1:54 pm | सिरुसेरि

मजेशीर लेख . लखुगिरी करणे हा शब्दप्रयोग वाचुन रत्नांग्रीच्या त्या मधल्या आळीतील लोकोत्तर अंतुशेटनी मराठी भाषेला वाहिलेला "अण्णु गोगट्या होणे" हा तेजस्वी शब्दप्रयोग आठवला .

तुषार काळभोर's picture

22 Dec 2020 - 3:12 pm | तुषार काळभोर

लिंक दे चा थोरला भाऊ म्हणजे ' विदा आहे का ?'
पण हा विदा दादा जास्त उपयोगी वाटतो मला.
मिपावरील २२.७ (+/- ३.१४)% लोकांना विदा महत्वाचा वाटतो.

मी कसा सर्वंकष समृद्ध जीवनाचा पांथस्थ

हे वाचून एका मिपा वरील भूतपूर्व आय डी ची आठवण झाली.

"कोण" ते सुज्ञ लोक समजून घेतीलच

उन्मेष दिक्षीत's picture

25 Dec 2020 - 1:52 am | उन्मेष दिक्षीत

आठवण येते तुम्हाला? छान!

तो आयडी लिंका द्यायचा नाही , स्वतःचे म्हणणे आरामात मांडायचा. लिंका तुम्ही द्यायचात.
मिपाचे न भरुन येणारे नुकसान कुणी कुणी केले हे सूज्ञांना सांगायची गरज नाही, ऑल द बेस्ट!

आनन्दा's picture

25 Dec 2020 - 9:09 am | आनन्दा

खरे आहे.
लिंक देऊन तोंडघशी पडले की धागा वाचनमात्र व्हायचा याची पण आठवण आहे का तुम्हाला?

संगणकनंद's picture

25 Dec 2020 - 7:57 pm | संगणकनंद

"तो" आयडी म्हणजे कोणता आयडी हो? तुमच्या एखाद्या डुआयडीबद्दल बोलत आहात का? आणि स्वतःचे म्हणणे आरामात मांडायचा म्हणजे? हल्ली स्वतःचे म्हणणे आरामात मांडत नाही का "तो" आयडी?

मिपाचे न भरुन येणारे नुकसान कुणी कुणी केले हे सूज्ञांना सांगायची गरज नाही, ऑल द बेस्ट!

हे काही कळले नाही. मिपाचे कसले न भरुन येणारे नुकसान झाले आहे? आणि कशामुळे झालं हे नुकसान? असं काही नुकसान झाल्याचं मिपावर वाचण्यात नाही आलं.

उपयोजक's picture

25 Dec 2020 - 9:41 am | उपयोजक

हाती बराचसा रिकामा वेळ आणि दणकट लॅपटॉप असणारे काही लोक क्रोमच्या किमान ४० टॅब उघडून ठेवतात आणि मग सावज शोधतात. आता सावज म्हणजे काय? तर ग्रुपात सहज म्हणून कोणी काही लिहिले की ती माहिती ४० पैकी एखाद्या टॅबवर गुगलवर टाकून सर्च करतात.जी माहिती येईल त्यातला बरोबर जुळणार्‍या भागाचं कौतुक करणार नाहीत किंवा शांतपणे/नम्रपणे चुकीचा भाग दर्शवून ज्ञान वाढवणे/सुधारणे हे करणार नाहीत. कारण मुळात तो उद्देशच नसतो.मग उद्देश काय असतो? तर त्या कोणीतरीने दिलेल्या एकूण माहितीतल्या चुकीच्या माहितीवरुन तो अज्ञानी आहे; तो फेकतो आहे, तो अज्ञान पसरवून अखिल विश्वाचं नुकसान करतो आहे, त्याने लोकांना दिशाभूल करण्याची सुपारी घेतली आहे असा शोध लावून "फेकता हे मान्य करा ना! फेकता हे मान्य करा ना! सगळीकडे असेच फेकता का?" हे रेकॉर्ड अडकल्यासारखे रिपीट मोडवर आळवत ठेवणे हा मुख्य उद्देश असतो.बरं हे कधीतरी करुन अशा लोकांचं समाधान होत नाही. ते परत परत करुन "मी आंजावर एखाद्याला कसा छळलं? कसा धडा शिकवला!" याचा परत परत विकृत आनंद घेत बसतात.
आता याचा परिणाम काय होतो? तर समोरचा दुखावला जातो, कारण सहज केलेल्या विधानाची दरवेळी कोणीतरी अशी चिरफाड करणार ; करुनच्या करुन वर चुकीची माहिती पसरवण्याची सुपारी घेतल्याचे आरोप लावणार, वैयक्तिक जीवनाचा उद्धार करणार हे कोण सहन करत बसेल? म्हणजे स्वत:च्या स्वभावदोषामुळे मैत्री वगैरे लांबच पण आंजावर साधे सलोख्याचे संबंधही राहत नाहीत हे या लिंकपिसाटांच्या कधी लक्षातच येत नाही. उन्मादावस्थेत आपण काय गोंधळ घातलाय याची जाणीवच नसते.जाणीवच नसल्याने ना खेद ना खंत!

शा वि कु's picture

25 Dec 2020 - 11:04 am | शा वि कु

हाती बराचसा रिकामा वेळ आणि दणकट अँड्रॉइड फोन असणारे काही लोक व्हाट्सअपच्या किमान ४० ग्रुपमध्ये मेम्बरशीप ठेवतात आणि मग सावज शोधतात. आता सावज म्हणजे काय? तर इतर ग्रुपात कोणी हि ऐर्यागैर्याने काही फॉरवर्ड केले की ती माहिती ४० च्या ४० ग्रुपवर ढकलून टाकतात.जी माहिती वाचली त्याच्या सत्यासत्यतेची तपासणी करणार नाहीत, त्यातला बावळट भाग पुसून टाकणार नाहीत, संदर्भ मागितल्यावर नम्रपणे संदर्भ नसल्याचे मान्य करणार नाहीत. कारण मुळात तो उद्देशच नसतो.मग उद्देश काय असतो? तर आपल्या मताशी जुळणारा मजकूर खराच असतो, त्यावर शंका घेणारा व्यक्ती हा अज्ञान पसरवून अखिल विश्वाचं नुकसान करतो आहे, त्याने लोकांना दिशाभूल करण्याची सुपारी घेतली आहे असा शोध लावून "झापड लावलीये हे मान्य करा ना ! झापड लावलीये हे मान्य करा ना! सगळीकडे असेच पचकता का?" हे रेकॉर्ड अडकल्यासारखे रिपीट मोडवर आळवत ठेवणे हा मुख्य उद्देश असतो.बरं हे कधीतरी करुन अशा लोकांचं समाधान होत नाही. ते परत परत करुन "मी व्हाट्सअपवर एखाद्याला कस ज्ञान दिल? माझ्या फॉर्वर्डला आधार काय मागतो!" याचा परत परत विकृत आनंद घेत बसतात.
आता याचा परिणाम काय होतो? तर समोरचा दुखावला जातो, मी म्हणतो ते खरं मानावं अशी अपेक्षा त्याला बावळटपणाची वाटते ;फेक फॉरवर्ड करुनच्या करुन वर उच्चासनावरून आलेले "झापड उघडा, परीघ वाढवा" असे मोघम सल्ले आणि, वैयक्तिक जीवनाचा उद्धार करणार हे कोण सहन करत बसेल? म्हणजे स्वत:च्या स्वभावदोषामुळे मैत्री वगैरे लांबच पण आंजावर साधे सलोख्याचे संबंधही राहत नाहीत हे या फॉरवर्डपिसाटांच्या कधी लक्षातच येत नाही. उन्मादावस्थेत आपण काय गोंधळ घातलाय याची जाणीवच नसते.जाणीवच नसल्याने ना खेद ना खंत!

श्रीगुरुजी's picture

25 Dec 2020 - 1:25 pm | श्रीगुरुजी

+ १

काहीजणांच्या बाबतीत हे तंतोतंत जुळतंय.

उपयोजक's picture

25 Dec 2020 - 8:55 pm | उपयोजक

Chrome

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

26 Dec 2020 - 1:00 am | ॲबसेंट माइंडेड ...

बरोबर आहे अरबी समुद्रातली मिठाची पातळी घटत चालली आहे हि वस्तुस्थिती आहे.

उपयोजक's picture

25 Dec 2020 - 12:06 pm | उपयोजक

खरंय! पटेश! :)

पण मी जे लिहिलं ते फॉरवर्डसंबंधी नसून स्वत: लिहिलेल्या ; सहजपणे लिहिलेल्या मजकूराबद्दल आहे बरं का! ;)

लिंक मागण्यात किंवा संदर्भ देण्यासाठी लिंक देण्यात काही चूक आहे असे निदान मला तरी वाटतं नाही. संदर्भ देउन केलेल्या लिखाणाला मी अधिक उपयोगी समजतो.
असो...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chabidar Chabi | Girlz | Praful-Swapnil | Sagar Das | Naren Kumar | Vishal Devrukhkar