आज कुंदलहल्ली येथील नागलिंगेश्वर मंदिरातील यंदाच्या तसचं गेल्या वर्षीच्या पूजेची छायाचित्र पाहु. नागलिंगेश्वर हे तस थोड जास्त वर्दळ असणारं मंदिर. मंदिरातील शिवलिंग जवळपार पाच फुट उंचीच आहे. लिंगावर पाच फण्यांचा नाग आहे म्हणुन हा नागलिंगेश्वर. गेल्या वर्षी कार्तिक महिन्यातल्या चारी सोमवारी पूजेसोबत रोज संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा असत- शास्त्रीय संगती, भरतनाट्यम्, कुचिपुडी इत्यादी. ह्या वर्षी फक्त पूजाच झाल्या.
पहिला सोमवार
अन्नधान्य वापरून केलेली हि पूजा
दुसरा सोमवार
संपूर्ण पिंड नाण्यांनी सजवली होती
तिसरा सोमवार
द्राक्ष, लिंबू, डाळिंब इत्यादी फळे वापरुन केलेली सुंदर पूजा
पिंडीवर बनवलेला मोत्यांचा गणपती
चौथा सोमवार
अर्धनारीश्वर स्वरुपात झालेली पूजा
शेवटचा सोमवार
पिंडिवर चांदिचा मुखवटा ठेवून फुलांनी सजवलेली पिंड
आता पाहुत २०१९ च्या पूजा
पहिला सोमवार-
फुलांनी सजवलेली पिंड
दुसरा सोमवार
गाजर, शेपू आणि काकडी ह्या भाज्या वापरुन केलेली सजावट
तिसरा सोमवार
कवड्यांनी सजवलेली पिंड
चौथा सोमवार -
मोती, गाजराचा खिस, मुळ्याचा खिस आणि वाटाणे वापरुन पिंडीवार तिरंगा बनवला आहे
अमावस्या
चांदिचा मुखवटा आणि फुलांची सजावट
विशेष सुचना:
माझ्या ह्या तसेच इतर लेखातील फोटो वापरण्यासाठी लेखकाची परवानगी घेन्याची किंवा क्रेडिट देन्याची गरज नाही. फोटोचा दुरुपयोग करणे टाळावे आणि फोटो वापरताना मंदिराच्या नावाचा व्यवस्थित उल्लेख करावा ही नम्र विनंती_/\_