आज पिलेकाम्मा देवीच्या मंदिर परिसरात असलेल्या मुनेश्वर ह्या महादेवाच्या अवताराच्या पूजा पाहुत. प्रत्येक पूजेसोबत चेहर्यावरचे भाव कसे बदलातात पहा. कधी हसमुख, कधी उग्र तर कधी सौम्य.
पहिला सोमवार
मुनेश्वराचा पोषाख हिरव्या आणि चंदेरी चमकीने बनवला होता
दुसरा सोमवार
भस्माच्या लेपाने झालेली मुनेश्वराची पूजा
तिसरा सोमवार
हळद आणि कुंकु ह्यांच्या लेपाने बनलेला शंकराचा पोषाख. शेजारी असलेल्या लिंगाला देवीच्या चेहर्यात कसं छान परिवर्तित केलं आहे पहा :)
चौथा सोमवार
शेवटचा सोमवार ( सोमवती अमावस्या)
संपूर्ण मंदिर परिसर हजार पणत्यांच्या तेजाने उजळून निघाला होता आणि गाभार्याच्या भिंती केळ्याच्या पानांनी सजल्या होत्या.
मंदिरातील उत्सवमूर्ती
त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्त हनुमान मंदिरात विष्णुदिप( मशाल) प्रज्वलित करण्यात आली, त्या पुजेची काहि छायाचित्रे
समोर कापूर जळत असताना, सीता एकटीच अग्निपरीक्षा देती आहे असा भास होतोय ना?
प्रतिक्रिया
18 Dec 2020 - 10:18 am | प्रचेतस
जबरदस्त फोटो आहेत.
18 Dec 2020 - 9:46 pm | पॉइंट ब्लँक
धन्यवाद _/\_
18 Dec 2020 - 5:07 pm | तुषार काळभोर
शेवटचा अगदी जपून ठेवावा असा!
18 Dec 2020 - 9:48 pm | पॉइंट ब्लँक
हो , उत्सवमूर्ती आहेतच सुंदर. त्यादिवशी त्यांचे क्लोजअप घ्यायचं राहुनच गेलं. :( बघु, परत कधी संधी मिळते का ते.
18 Dec 2020 - 6:31 pm | चांदणे संदीप
सर्वच फोटो सुंदर!
फोटोंची सुपारी वगैरे घेता का ओ तुम्ही?
सं - दी - प
18 Dec 2020 - 9:50 pm | पॉइंट ब्लँक
नाहि हो, कसली सुपारी आणि कसलं काय. प्रोफेशनल फोटोग्राफर नाही मी. वेळ घालवायला चांगलं साधन म्हणुन फोटोग्राफी असं समीकरण आहे ते :)
19 Dec 2020 - 11:16 am | गोरगावलेकर
सर्वच फोटो खूप सुंदर. आवडले.
19 Dec 2020 - 9:49 pm | पॉइंट ब्लँक
धन्यवाद _/\_