जगायचे जगायचे !

पल्लवी's picture
पल्लवी in जे न देखे रवी...
26 Nov 2008 - 8:13 pm

वि.सु : ही कविता माझा मित्र राजदीप जोशी ह्याची असुन त्याच्या वतीने व पुर्वपरवानगीने इथे मी प्रसिद्ध करत आहे.

असेच धडपडायचे..पुन्हा पुन्हा उठायचे,
मधेच डगमगायचे.. तरी उभे रहायचे !

व्यथेत गलबलायचे..पडायचे..रडायचे,
करुन अश्रु कोरडे, लढायचे लढायचे !

घाव घालता कुणी.. फुटायचे..तुटायचे,
असेच मोड-मोडता, जडायचे घडायचे !

कल्पनेच्या अंगणी..निमग्न रिमझिमायचे,
पहाट-पालवी सवे सजायचे.. फुलायचे !

ताम्र अग्रजेपरी..क्षितीज पेटवायचे,
[पण] चंद्रभान ठेवुनी निमूट मावळायचे !

हवे तिथे असायचे,नको तिथे नसायचे,
दुरांत रम्य जीवना, जगायचे जगायचे !

~राजदीप जोशी~

गझलप्रकटन

प्रतिक्रिया

घाटावरचे भट's picture

27 Nov 2008 - 1:20 am | घाटावरचे भट

छान. तुमच्या मित्रवर्यांनाही बोलवा मिपावर. अजून अशा कविता येऊ देत.

धनंजय's picture

27 Nov 2008 - 1:32 am | धनंजय

असेच म्हणतो.

राघव's picture

27 Nov 2008 - 12:43 pm | राघव

असेच म्हणतो.

ताम्र अग्रजेपरी..क्षितीज पेटवायचे,
[पण] चंद्रभान ठेवुनी निमूट मावळायचे

वा वा..! बहोत खूब! सुंदर!
मुमुक्षु

आनंदयात्री's picture

27 Nov 2008 - 12:34 pm | आनंदयात्री

छान आहे कविता.