विद्यार्थ्यांची उन्नती हेच खरे

कवटी's picture
कवटी in जनातलं, मनातलं
26 Nov 2008 - 3:03 pm

त्याच अस झाल की परवा मी माझ्या पुतण्याला प्ले स्कूल मधे सोडायला गेलो होतो. खरे म्हण्जे त्याला एक छानसे पत्र लिहावे अशीच माझी इछ्छा होती. पण तो घरात राहुनच रोज २ तास शाळेत जाणार होता. त्यामुळे उगाच पोष्टाचा खर्च कशाला वाढवा असा सुज्ञ विचार मी केला. शिवाय 'शाळेत जाणार नाही ' असे त्याने जोर्दार भोकाड पसरले होते. त्यात त्याला पत्र वाचायला देणे मला तरी योग्य वाटले नाही. एक तर माझे अक्षर कुणाला लागत नाही. (माझे पेपर तपासणार्‍यांना ते कसे लागले आणि त्यानी मला कसे पास केले हा एक संशोधनाचा विषय आहे. यावरून एकंदर शिक्षण पध्धती विषयीच मोठे प्रश्नचिन्ह उभे राहीले आहे पण ते पुन्हा कधीतरी.)
आणि शिवाय माझ्या पुतण्याला अजुन लिहिता वाचता येत नाही.(त्यासाठीच तर त्याला शाळेत पाठवत होते.) त्यामुळे मी पत्र लिहायचा विचार डोक्यातून काढून टाकला.
सहज सुचले म्हणून मी माझ्या प्रीप्रायमरी स्कूलच्या (आम्ही त्याला मराठीत माँटेसरी म्हणायचो) दिवसांची आणि ह्या आजकालच्या पोरांच्या शाळेची तुलना करू लागतो. अगदी चप्पल पासुन शाळेतील बाईंपर्यंत (ई वरील अनुस्वार दिसत नसला तरी दिलेला आहे. क्रुपया गैरसमज नकोत.) सगळ्या गोष्टींची तुलना डोळ्यासमोरुन झरझर सरकू लागली. आमच्या काळी चप्पल ही पायाला इजा होउ नये म्हणून वापरायची वस्तू होती. ड्रेसला म्याचिंग, फ्याशन असले प्रकार आमच्या पालकांच्या आणि पर्यायाने आमच्या गावीही न्हवते. वॉटरब्याग ही संकल्पनाच आम्हाला ठाउक न्हवती. शाळेच्या टाकीच्या नळाला ओंजळ धरून त्यात साठणारे पाण्यात गाई-म्हशींसारखे तोंड बुडवून पाणी प्यायचे येवढेच माहीत होते. शाळेत लागणारी वह्या पुस्तके न्यायच्या खाकी रंगाच्या दप्तरावर मिकीमाऊस असावा की डोनाल्डडक असा प्रश्न कधी आम्हाला पडला नाही आणि दप्तर सारख्या म्लेंछ शब्दाला संस्क्रुतोद्भव शब्द दिल्याने मराठी भाषेचे अतोनात नुकसान होइल काय असा विचारही मनाला शिवला नाही.
पण आजकाल माझ्या पुतण्याचा शाळेला जायच्या आगोदरचा १०-१५ मिनिटे वेळ 'आज कुठल्या रंगाची वॉटरब्याग न्यायची आणि कुठला बूट्/चप्पल घालायची हे ठरवण्यात जातो.

आमच्या माँटेसरीच्या बाई आणि माझ्या पुतण्याच्या टीचर यांची तर तुलनाच करवत नाही. कुठे आमच्याकाळातील त्या नऊवारी साडी नेसलेल्या पन्नाशीच्या पुढच्या मास्तरीण बाई आणि कुठे आजकालच्या लिप्स्टीक् लावलेल्या स्लीवलेस मधील टीचर...
पण हे झाले बाह्यबदल. दोन्हीचे विद्यादानाच्या कार्यात सारखीच तन्मयता असेल असे वाटते.

कुणीसे म्हटलेच आहे.....
"शाळा ते घर, घर ते शाळा, आम्हा येतो कंटाळा"

शिक्षणपध्धती पुर्वीची असो की आत्ताची, विद्यार्थ्यांची उन्नती हेच खरे ध्येय असले पाहिजे.

कवटी.

कथाविचार

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Nov 2008 - 7:41 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

शिक्षणपध्धती पुर्वीची असो की आत्ताची, विद्यार्थ्यांची उन्नती हेच खरे ध्येय असले पाहिजे.
सहमत

कवटीभौ, मस्त जमल्ये भट्टी!

कवटी's picture

26 Nov 2008 - 7:48 pm | कवटी

१३_१३ व्यस्त अदिती ,
आपणास हा लेख आवडल्याचे वाचून बरे वाटले.
आपल्या प्रतिक्रीयेबद्दल आभार.

कवटी.

http://www.misalpav.com/user/765

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Nov 2008 - 8:05 pm | बिपिन कार्यकर्ते

मस्तच लेख रे कवटीभाऊ. जमलाय.

कुठे आमच्याकाळातील त्या नऊवारी साडी नेसलेल्या पन्नाशीच्या पुढच्या मास्तरीण बाई आणि कुठे आजकालच्या लिप्स्टीक् लावलेल्या स्लीवलेस मधील टीचर...

अगदीच नऊवारीच्या काळात आम्ही नव्हतो तरी लिप्स्टीकच्या काळात पण नव्हतो ना... :(

अवांतरः माझ्या प्रतिसादाला प्रतिसाद दिलाच पाहिजे ;)

बिपिन कार्यकर्ते

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Nov 2008 - 8:07 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> अगदीच नऊवारीच्या काळात आम्ही नव्हतो तरी लिप्स्टीकच्या काळात पण नव्हतो ना...
अहो बिपीनकाका, महत्त्वाचं हे, का विद्यार्थ्यांची उन्नती?

कवटी's picture

26 Nov 2008 - 8:14 pm | कवटी

>>अहो बिपीनकाका, महत्त्वाचं हे, का विद्यार्थ्यांची उन्नती?
अगदी खरे बोललीस बघ अदिती.
लेख आणि त्यावरच्या प्रतिक्रीया लक्षपूर्वक वाचून विचारपूर्वक प्रतिक्रीया देण्याचा तुझा गुण मला विशेष आवडला.

कवटी

http://www.misalpav.com/user/765

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Nov 2008 - 8:21 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

लेख आणि त्यावरच्या प्रतिक्रीया लक्षपूर्वक वाचून विचारपूर्वक प्रतिक्रीया देण्याचा तुझा गुण मला विशेष आवडला.
फक्त प्रतिक्रिया नाही, प्रतिक्रियेला उत्तरही!

टारझन's picture

27 Nov 2008 - 12:33 am | टारझन

संहिताजी , तुमची अवांतर प्रतिक्रिया पटली,
अवांतर प्रतिक्रियेबद्दल आभार

- टार्कृष्ण

कवटी's picture

26 Nov 2008 - 8:10 pm | कवटी

बिपिनराव,
तुमचा आणि आमचा काळ एकच. पण लेख म्हटले की जरा असे टोकाचे लिहावे लागते.
बाकी आपणास हा लेख आवडल्याचे वाचून बरे वाटले.

आपल्या प्रतिक्रीयेबद्दल आभार.

कवटी

http://www.misalpav.com/user/765

सर्किट's picture

26 Nov 2008 - 11:07 pm | सर्किट (not verified)

कवटी,

ह्या इंग्रजी कवितेची महाजालावरून चोरी केलेली आहे, त्यामुळे आपला हा लेख काढून टाकण्याची संपादकांना आपण स्वतःच विनंती करावी.

धन्यवाद.

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

कवटी's picture

27 Nov 2008 - 11:00 am | कवटी

सर्किटजी तुमचे बरोबर आहे. ही कविता मी महाजालावरून घेतली आहे. त्याला चोरी म्हणणे बरोबर नाही कारण ती कविता माझी आहे असे कुठेही म्हटलेले नाही. तरी एकंदर भावना लक्षात घेउन मी ती कविता काढून टाकत आहे.
कुणाला त्रास झाला असल्यास क्षमस्व.
आपण आवर्जून येउन लेख वाचून प्रतिक्रीया दिल्याबद्दल आभार.

कवटी

http://www.misalpav.com/user/765

सर्किट's picture

28 Nov 2008 - 1:50 am | सर्किट (not verified)

धन्यवाद,

कारण ही कविता कुठून घेतली होती, ते मला पूर्णपणे माहिती आहे.

सदस्यांच्या कुटुंबियांची (तेही इयत्ता पहिलीच्या मुलीची) कविता परवानगी न घेता, इथे टाकण्याबद्दल माझा आक्षेप होता. त्याला मान देऊन कविता काढल्याबद्दल आभारी आहे.

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

कवटी's picture

28 Nov 2008 - 10:13 am | कवटी

सर्किट आपला राग निवळला हेच माझ्यासाठी मोठे आहे.
आपल्या प्रतिक्रीयेबद्दल अभार.
तेव्हढे आमच्या विनंतीचे ही मनावर घ्या.
कवटी

http://www.misalpav.com/user/765

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Nov 2008 - 11:41 pm | बिपिन कार्यकर्ते

मला वाटते कवटी भाऊंनी 'कुणीसे म्हटलेच आहे.....' असं स्पष्ट लिहिलंच आहे की हो तिथे!!!

बिपिन कार्यकर्ते

सर्किट's picture

26 Nov 2008 - 11:49 pm | सर्किट (not verified)

कुणीसे म्हटले आहे, असे लिहून, अक्खे च्या अख्खे पुस्तक टंकले, लेख टंकले, तरी देखील ती चोरीच असते.

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

टारझन's picture

27 Nov 2008 - 12:30 am | टारझन

सर्किटजी,
आपली प्रतिक्रिया आवडली.
प्रतिक्रियेबद्दल घन्यवाद !!

(कवटी के साथ बातां : कवट्या , तुझा बाण कुठल्या दिशेला होता ते कळलं बे, लेखाच आपल्याला म्हाईत नाय .. पण तुझ्या आभारी प्रतिक्रियांबद्दल आभार रे चोच्या)

- टार्कृष्ण

बिपिन कार्यकर्ते's picture

27 Nov 2008 - 12:41 am | बिपिन कार्यकर्ते

तुमचा रोख जर का वाङमयचौर्याकडे असेल तर सहमत. माझा रोख फक्त मिपाच्या धोरणाकडे होता. मिपाच्या धोरणानुसार ढकलेले साहित्य अथवा दुसर्‍याचे साहित्य त्या प्रकारची सूचना न लिहिता इथे लिहिण्यास मनाई आहे. त्यानुसार.

आपल्या प्रतिसादाबद्दल आणि त्यातल्या संदेशाबद्दल आभारी आहे. :)

बिपिन कार्यकर्ते