आकार

द्विज's picture
द्विज in जे न देखे रवी...
26 Nov 2008 - 2:28 pm

शेतकरी ब॑धू॑ना सादर समर्पित

आकार


परिस्थितीच्या कोन्डीतून
जीवनाकडे पळणारा
जिवन्तपणीच म्रुत्यूलाही ओशाळवणारा
सावकाराच्या पिपाणीवरी डोलणारा
अन्नदात्याच्या आयुष्याचा आकार हा सारा

तापलेल्या उन्हामध्ये घाम वाळवितो
कोरड्या भाकरीत जीव त्याचा पुरता सामावितो
एका हातात लेकरु दुज्या हातात हा भारा
अन्नदात्याच्या आयुष्याचा आकार हा सारा

जीव केविला केविला त्याचा झिज झिज झिजे
अठरा विश्वाची गरीबी त्याच्या खोपट्यात निजे
कर्त्रुत्वात कर्तव्य आणि स॑सारपसारा
अन्नदात्याच्या आयुष्याचा आकार हा सारा

पाहता पाहता धीर त्याचाही सुटतो
तरीही बापडा ढोरावाणि हा राबतो
सोसतो सोसतो जीवनाचा सारा मारा
अन्नदात्याच्या आयुष्याचा आकार हा सारा
--------द्विज

संस्कृतीविचार

प्रतिक्रिया

द्विज's picture

26 Nov 2008 - 2:34 pm | द्विज

परत द्या------द्विज
परमात्म्याने नटलेला आत्मा बनून येतो
आधी कवी मग देहाचा जन्म घेतो

द्विज's picture

26 Nov 2008 - 3:04 pm | द्विज

परत तेच

------द्विज
परमात्म्याने नटलेला आत्मा बनून येतो
आधी कवी मग देहाचा जन्म घेतो

द्विज's picture

26 Nov 2008 - 3:10 pm | द्विज

आता ही तर आध्ह्यात्मिक कविता नाही------द्विज
परमात्म्याने नटलेला आत्मा बनून येतो
आधी कवी मग देहाचा जन्म घेतो

द्विज's picture

26 Nov 2008 - 3:20 pm | द्विज

काय रे भो
तो कोण बाप आला होता त्याला ५-५ प्रतिसाद
चा॑गल्या कवितेला एकही नाही ------द्विज
परमात्म्याने नटलेला आत्मा बनून येतो
आधी कवी मग देहाचा जन्म घेतो

सुनील's picture

26 Nov 2008 - 3:37 pm | सुनील

काय भौ स्वतःलाच प्रतिसाद देत बसलाहात? लिहाव आणि गप बसावं, ज्याला प्रतिसाद द्यायचेत ते देतीलच.

मला कविता बरी वाटली.

अवांतर - हा बाप कोण?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Nov 2008 - 7:15 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अहो तो कोण बाप होता त्याला "गेट वेल सून"ची गरज होती, म्हणून त्याला प्रतिसाद मिळाले. मागच्या वेळी तुम्हाला टारझननी सांगितलं ना,
इथे त्यानुसार:
१. सद्ध्या च्या हॉट टॉपीक वर काही तरी प्रक्षोभक लिहा.
२.एखादं प्रसिद्ध विडंबण करा
३. मराठी-अमराठी वर लिहा
४. एखादी शोकांतिका लिहा, किंवा सेंटी सेंटी लिहा
५. हा ऑल टाईम प्रतिसाद खेचणारा विषय आहे, महिलांवर सरसकट कमेंट्स करणारं काहीतरी लिहा.
ही पंचसुत्री लक्षात ठेवा .. तुमचा धागा सेंच्युरी नाही , फिफ्टी तरी नक्कीच मारेल.

लगेच भराभर भारंभार प्रतिसाद येतील.

बाकी कवितेबद्दल: मला या विषयात फार गती नाही त्यामुळे माझ्या प्रतिसादाकडे फार लक्ष देऊ नका. पण एकूण ठीक वाटली कविता.

अवांतर: तुम्ही त्या "बापा"चं नाव काढलंत आणि त्यानी म्हणे माझं फारच कौतुक केलं होतं म्हणून मी कवितेच्या धाग्यावर एवढंतरी लिहिलं.

(गद्य) अदिती

टारझन's picture

26 Nov 2008 - 10:57 pm | टारझन

द्विज साहेबांच अंमळ अवघड दिसतंय ... लैच्च अपेक्षा आहेत. त्याच्या भरात कुठले गैरप्रकार करू नका ही विनंतीवजा धमकी.

पुन्हा कविता आमचा प्रांत नाही.कविता न वाचताच प्रतिक्रिया दिलेली आहे. का ते आपल्याला कळले असेलच

- एजंट टारझन
(कुबड्या खविस अस्थि-दंत विमा एजन्सी, अफ्रिका खंड)
आमच्या शाखा लवकरत भारतात पसरणार आहेत.