अनटायटल टेल्स ६

Primary tabs

मकरंद घोडके's picture
मकरंद घोडके in जनातलं, मनातलं
20 Nov 2020 - 6:48 pm

तिच्यच्या हातात ग्लास आणि सिगारेट! डोळ्यात ब्लर देखावे
बॉयकट केसांच्या विस्फारलेल्या गवतासारख्या कांड्या!
ती म्हणते काहीबाही, आणि रस्त्यावर जाता येता जी माणसं म्हणून टूणटूण अशी दुचाक्यांवर उडत जातात त्यांना न्याहाळते.
तिचं काsही म्हणणं नाहीये जोवर किक बसत नाही!आणि एकदा का तो क्षण आला की ती हावरटासारखी भुंकू लागते-सिस्टीम कास्ट स्वातंत्र्य कला संभोग सगळ्यावरच!
बरं तिची दखल घ्यायची तर कॅटेगीरी फिल्टर करणारे असंख्य डोळे फक्त वखवखलेले आहेत.म्हणजे ती अमूकढमूक ची अमुक अमुक पासून थेट पैसे घेते ती!इथपर्यंत!
वसुंधरा बापट नाव तिचं!दिसायला यथा तथाच पण आपली शक्तीस्थाने ओळखून व्यवस्थित वापरणारी मॉडर्न ललना!
तिच्यावर क्रश असणारा तिला मनापासून म्हणाला होता-तू सुंदर दिसतेस आणि मला खूप आवडतेस.
वसू-मग हे सौंदर्य तुला फक्त पाहायचं आहे की अनुभवायचं आहे?
तो-म्हणजे?
वसू-तू व्हर्जिन आहेस का?
तो-अर्थात.
वसू-मी नाहीये.
पुन्हा तो कधीच परत दिसला नाही.

पुरुष शरीरसुखासाठी भयंकर वेडेपणा करतात, कुठल्याही स्त्री विषयी हा सेक्स बद्दल चा त्यांचा ठेवणीतला अँगल फारसा क्लिअर नसतो पण तरीही दुसऱ्या पुरुषाशी शय्यासोबत केलेली बाई त्याला जेव्हा क्लिअर असं काही सांगते तेव्हा तो उध्वस्तच होतो आणि ज्याला आपण सो कॉल्ड पांढरपेशा समाज म्हणतो त्याचा तो एका क्षणात भाग होऊन जातो.
उत्क्रांतीच्या पोकळ गप्पा मारतो..स्त्री पुरुष समानतेची गोड गाणी गातो आणि स्वतःवर कसलीतरी नैतिकतेची चादर घेऊन झोपी जातो.
वसुंधरा या अंधाऱ्या रात्रीला कैक सवाल विचारत आली आहे
मी स्त्री आहे तर मग ते मी चॉईस म्हणून निवडलं आहे का?
इतरांनी माझ्याविषयी स्त्री म्हणून सॉफ्ट कॉर्नर ठेऊन जवळ येऊन मी फक्त आणि फक्त स्त्री आहे म्हणून आधार देऊन माझ्याबद्दल दुबळेपणाचं ओझं का पॉईंट आऊट करायचं?
एका स्त्रीचं आईपण जेवढं कुरवाळलं गेलंय त्यापेक्षा जास्त बाईपण चूरगाळलं गेलं आहे.
माणसं वरून कशीही असली तरी आतून नागडी असतातच,वाट पाहायची ती फक्त वस्त्रावरणे उतरण्याची.
जी आतून बाहेरून सेमच असतात त्यांचीच तर गोची होत असते नेहमी.
त्यांच्याबद्दल भीतीयुक्त आदर किंवा आदरयुक्त भीती तयार असते. त्यांच्याबद्दल समजायचं जे असतं ते बऱ्याचदा गैरसमजावरच उभं असतं!
काय फरक पडतो जेव्हा समाज म्हणून तुम्ही स्वतःकडे आणि खुद्द समाजाकडे पाहता? किंवा समाज तुमच्याकडे पाहतो?
खूप क्लिष्ट आणि थांग न लागणारं असतं असं हे !
मग जे क्लिष्ट व बदलणारं आहे त्याचा विचार विनाकारण करण्यात काय हाशील आहे?
वसुंधरा बापट च्या वळणावर किंवा आडवळणावर भले तुम्ही चालू शकत नाही पण आतून तर नागडे विचार घेऊन आणि बाहेरून मस्त इस्त्री केलेले छान कपडे पांघरून तर वावरू शकता ना! या अभिनयासाठी कुठलंही पारितोषिक कमीच आहे! घ्या मजा लेको..

व्यक्तिचित्रविचार