गुंतागुंत

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
6 Nov 2020 - 7:09 pm

"नमस्कार सर, गोखले बोलतोय."
बोला गोखले साहेब
"मला वाटले तुम्ही फोन कट करताय की काय"
ते का बरे?
"अहो माझ्या मुलाने तुमचा पाणउतारा केला होता म्हणून"
अहो कसला पाणउतारा ? त्याला माझे म्हणणे नाही पटले, चालतंय की, त्यात चूक काय? आणि मला कोब्रा दंशाची सवय आहे.
"त्याचे परिणाम भोगतो आहे की"
का? काय झाले?
"जेईई ला ११० मार्क"
चांगले आहेत की
"सर मस्करी करताय."
नाही हो, अजिबात नाही. मी तुम्हाला एक नंबर देतो. त्या वर मुलाला फोन करायला सांगा. माझा एक विद्यार्थी आहे अभय शाह. अमेरिकेत मास्टर्स करतोय. त्याला पण १०५ मार्क होते j
जेईई मध्ये २०१५ मध्ये. माझ्या संपर्कात आला. ४ वर्षे इंजिनीरिंग अभ्यासक्रमाच्या बाहेर काय करायचे ते मी त्याला सांगितले. आज सेमीस्टर पूर्ण व्हायच्या आधी त्याची प्लेसमेंट पण झाली. ते सुद्धा सद्य परिस्थितीत. मी कळवतो त्याला. तोच त्याला नीट समजावून सांगेल.
"मुलाला तुमच्याशी बोलायचे असेल तर?"
तर ती एक चांगली सुरुवात आहे.
"आणखी एक समस्या आहे, जरा खाजगी आहे"
बोला
"माझे साडू लेले, त्यांच्या मुलाला १४० आहेत. त्या वरून त्यांची मग्रुरी सहन करावी लागते आहे. काही इलाज? नाते तोडायचे नाही."
एक काम करा, त्याच्या मुलाची पार्टी तुम्ही द्या. पार्टी संपवून येताना एक आहेर द्या. त्याला म्हणा, someday all of us are going to be absolutely DEAD आणि
ब ट न दाबल्यावर भट्टी चे तापमान एकच असते.
"आले लक्षात. आम्ही कारण नसताना मुलांच्या यश अपयशा मध्ये प्रमाणाबाहेर गुंतून जातोय. धन्यवाद सर"

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Nov 2020 - 10:16 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर, लेखन वाचून अनेकांचे अनुभव असेच असावेत असे वाटले. पोरांशी आपण जेईईच्या मार्कांबाबत समाधानी नसतो. पोरंही आता बारावी झालेले असतात शिंगे फुटलेले असतात. कठीण असतं हे सर्व....! धन्यवाद.

-दिलीप बिरुटे

खरंय..पालकांनी अपेक्षांचे ओझे दिलं तर असंच होतं.माझ्या ओळखीच्या दोन नातलगांनामध्ये सौम्य स्पर्धा होती यंदा .. दहावीला दोघांच्या मार्कांत बरीच तफावत होती.पण बारावीला दोघांनाही बोर्डाला २% फरक आहे.ज्याला १० वीला जास्त मार्क होते त्यांच्याकडून इतक्या अपेक्षा वाढवल्या की बारावीचे कमी मार्क पाहून कुटुंब हिरमुसल..उलट १० वीला ज्याला कमी मार्क होते त्याला चांगले मार्क मिळाले.
पालक म्हणून टेन्शन असणं साहजिक आहे पण,पालक म्हणून​
स्पर्धा हा १९८०-२००५ मधला pattern अजूनही नाही संपला?