स्मरणाला मदत

उपयोजक's picture
उपयोजक in जनातलं, मनातलं
4 Nov 2020 - 11:09 am

चांगली स्मरणशक्ती कोणाला नको असते? सर्वांनाच हवी असते. याच स्मरणशक्तीच्या विश्वाचा एक भाग आहे स्मृती सहायक.स्मृती सहायक म्हणजे जे काही आठवायचं आहे ते आठवायला मदत करणारी साधने.या साधनांपैकीच एक साधन आहे आद्याक्षरांपासून बनवलेली लघुरुपे.

भरपूर मुद्दे किंवा मोठी यादी असेल तेव्हा या प्रत्येक मुद्द्यातला महत्वाचा शब्द किंवा यादीतल्या वस्तू यांची आद्याक्षरे घेऊन त्यापासून एखादा शब्द किंवा वाक्य बनवणे ही युक्ती वापरली जाते.

यातले काही शब्द हे मजेदार असतात.किंबहूना ते मजेदार असल्यानेच लक्ष वेधून घेतात आणि दीर्घकाळ स्मरणात राहतात.

उदा. BB ROY of Great Britain has Very Good Wife हे विद्युत रोधकांवरील रंगपट्टे लक्षात ठेवण्यासाठीचे वाक्य प्रसिद्ध आहे.किंवा इंद्रधनुष्याचे रंग लक्षात ठेवण्यासाठी तांनापिहिनिपांजां

असे बरेच शब्द तुम्ही ऐकले असतील.काहीवेळा बनवलेही असतील.

तर मग येऊ द्यात अशी 'स्मृती सहायक लघुरुपे'. संग्रह होऊ द्या.ज्ञानसाठा वाढवायला मदत करुया. _/\_

भाषाशब्दक्रीडामदतविरंगुळा

प्रतिक्रिया

गवि's picture

4 Nov 2020 - 11:39 am | गवि

All Altruists Gladly Make Gum In Gallon Tanks

केमिस्ट्रीच्या माजी विद्यार्थ्यांसाठी स्मरणरंजन. आठवले ना?

उपयोजक's picture

4 Nov 2020 - 12:02 pm | उपयोजक

हे माहित नाही.कृपया सांगा.

थोडक्यात ढोबळमानाने बोले तो साखरेची रुपे.

Allose, Altrose, Glucose, Mannose, Gulose, Idose, Galactose, Talose.

महासंग्राम's picture

4 Nov 2020 - 11:43 am | महासंग्राम

कायप्पा गटाच्या पोष्टी इकडे पण यायला लागल्या अवघडे

उपयोजक's picture

4 Nov 2020 - 12:19 pm | उपयोजक

लांबीचा जडबंबाळ लेख आला की आजची नवतरुण मुले न वाचताच TLTR लिहून पळून जातात. ;)

स्मरण शक्ति वाढवायची आहे का.
अनेक मार्ग आहेत.
पद्धती आहेत.
२५०/३०० पानी पुस्तक , २०० वस्तुंची लीस्ट , १५० आकडी संख्या सहज लक्षात ठेवता येते.

उपयोजक's picture

4 Nov 2020 - 4:38 pm | उपयोजक

जरुर सांगा आपल्याकडील युक्त्या/पद्धती _/\_

वयस्क's picture

4 Nov 2020 - 8:21 pm | वयस्क

शाळेत असताना भूगोलाच्या परीक्षेत बऱ्याचदा एक प्रश्न असे. तो म्हणजे दोन मोठी शहरे जोडणाऱ्या रेल्वे मार्गावरील शहरांची नावे द्या. मुंबई व मद्रास मार्गावरच्या शहरांची नावे लक्षात ठेवण्यासाठी हा short form मी लक्शात ठेवला होता.

ंमुम्पुमीहुबन्गारसिकेरीम

मुम्बई, पुणे, मिरज, हुबळी, बन्गलोर, आरसीकेरी, मद्रास.

उपयोजक's picture

4 Nov 2020 - 10:40 pm | उपयोजक

पण हे लघुरुप अर्थहीन आहे.हेच लक्षात ठेवायला कठीण वाटतंय. ;)

जयन्त बा शिम्पि's picture

5 Nov 2020 - 3:24 pm | जयन्त बा शिम्पि

मराठीत व्रुत्ते व अलंकार शिकतांना,मात्रा मोजाव्या लागत. यासाठी मी सोपी पद्धत स्वीकारली होती. एकुण आठ गण आहेत. पुर्वीची रीत अशी होती... 'य ' यमाचा, म्हणजे पहिला लघु, नंतरचे दोन्ही गुरु, 'भ ' भास्कराचा ,म्हणजे पहिला गुरु, नंतरचे दोन्ही लघु, , 'म' म्हणजे ' मारावा ' .....पण हे लक्षात ठेवणे कठीण वाटे. त्यासाठी मी सोपी सांकेतिक पदावली पाठ केली होती. ती अशी....
" यरतन भजसम " विस्त्रुत स्वरूप असे....(य) आद्य लघु, (र) मध्य लघु , (त) अन्त्य लघु, (न) सर्व लघु , (भ) आद्य गुरु,(ज) मध्य गुरु,(स) अन्त्य गुरु, (म) सर्व गुरु.
यात उरलेल्या दोन्ही ठिकाणी पहिल्या तीनात गुरु ची मात्रा मोजणे व 'भ','ज' 'स' साठी उरलेल्या दोन्ही ठिकाणी लघु ची मात्रा मोजणे अपेक्षित आहे. थोडे अधिक खुलासेवार म्हणजे " य " आध्य लघु,मध्य गुरु,अन्त्य गुरु. हा झाला 'य' गण. 'र' गणासाठी ,पहिला गुरु,मधला लघु व शेवटी गुरु.. याप्रमाणे उर्वरित् तपासून पाहा. समर्थ रामदास स्वामींचे ' मनाचे श्लोक ' भुजंगप्रयात ' व्रुत्तात आहेत. उदाहरणार्थः ' मना सज्जना भक्तिपंथेची जावें " { भुजंगप्रयाती "य' हे चारही येती } ह्या ओळीत तीन तीन अक्षरांचे गट पाडल्यास व त्यांच्या मात्रा मोजल्यास , लक्षात येइल की ' य ' गणाची लक्षणे म्हणजे " आद्य लघु,मध्य गुरु,अन्त्य गुरु, चारही गटास बरोबर लागू होतात.
' भुजंगप्रयाती "य' हे चारही येती ' ही ओळ सुद्धा व्रुत्ताचे नाव व त्यातील गण कोणते आहेत , हे दर्शविते. म्हणजेच व्रुत्ताचे नाव व गणाचा प्रकार ,वेगळा पाठ करावयास नको.

जयन्त बा शिम्पि's picture

5 Nov 2020 - 3:32 pm | जयन्त बा शिम्पि

छोटीशी दुरुस्ती:- ' भुजंगप्रयाती य हे चार येती " असे हवे होते. क्षमस्व.

इरसाल's picture

5 Nov 2020 - 5:42 pm | इरसाल

स्कॅटिव्हक्रोमॅफेकोनिकॉझि.
स्कँडियम, टिटेनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅग्नेशियम, फेरस, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक

इरसाल's picture

5 Nov 2020 - 5:44 pm | इरसाल

मॅग्नेशियम नाही मॅगनीज वाचावे

शा वि कु's picture

5 Nov 2020 - 6:58 pm | शा वि कु

- आता शिजवा कप कमी खा (यत्ता तिसरी, आपला जिल्हा.)
सांगली जिल्ह्याचे तालुके-
आटपाडी,तासगांव, शिराळा, जत, वाळवा, कवठेमहांकाळ, पलूस, कडेगाव,मिरज ,खानापूर

पदावली कशी सोडवायची-
भागूबेवडा- भागाकार,गुणाकार,बेरीज,वजाबाकी- डावीकडून उजवीकडे.
तानापिहिनीपाजा- इंद्रधनुष्याचे रंग.

मनिम्याऊ's picture

5 Nov 2020 - 9:24 pm | मनिम्याऊ

भागूबेवडा :D :D :D

उपयोजक's picture

7 Nov 2020 - 12:18 pm | उपयोजक

:)))))

सिरुसेरि's picture

5 Nov 2020 - 8:12 pm | सिरुसेरि

chemistry periodic table - first 20 elements - क्रम लक्षात ठेवायची पद्धत - आमच्या सरांनी शिकविली होती .

H HE LI BE BCNOF NE NA MG AL SI P S CL AR K CA

भुजंग पाटील's picture

6 Nov 2020 - 4:18 am | भुजंग पाटील

My Very Educated Mother Just Served Us Nine Pizzas.

Mercury, Venus, Earth, Mars, Jupiter, Saturn, Uranus Neptune, Pluto (तेव्हा प्लुटो ग्रह होता)