शाळा-कोलेजात असताना, आम्ही क्रिकेट जाम खेळायचो बुवा! मी आणि माझे बरेचसे मित्र कोलेज सुटले रे सुटले कि क्रिकेट्साठी जमायचो अन अगदी काळोख होइपर्यत खेळायचो. जेवणाची वेळ, चहा याची जराही आठवण नसायची तेव्हा......
आमच्या खेळण्याच्या २ जागा होत्या, एक हायवे जवळ असलेला 'सर्विसिंग रोड', आणि दुसरी म्हंजे 'अलकनंदा मैदान'.
तसा मी क्रिकेट्च्या सर्वच क्षेत्रात (फंलदाजी, गोलदाजी व क्षेत्ररक्षण) पांरगत होतो. म्हंजे रेकार्डच तसा होता आपला...समोरच्या फंलदाजाने चेंडु उंचावर टोलावला असेल, आणि खाली का जर मी क्षेत्ररक्षणासाठी असेन तर आमच्या टीमचा गोंलदाज जराही जोशमध्ये न येता गपचुप बोलिंग मार्कवर जात असे. व आजुबाजुच्या क्षेत्ररक्षकांचा आवाज मा़झ्या कानावर पडे, "फक्त एकच रन दे रे, दुसरा नको." मी ही त्या सुचनेचे इमानेइतबारे पालन करत असे.
चुकुन जर गोंलदाजी हातात दिली गेली तर अंपायरची चांगलीच परेड घ्यायचो. तो बिचारा निमुटपणे कधी १ हात बाजुला, कधी २ हात बाजुला, तर कधि दोन्हि हात वर करायचा....
तसा मी जात्याच फंलदाज, त्यामुळे दुसरया किंवा तिसरया नंबरवर उतरायचो (अर्थातच शेवटुन....) आमच्या टिममध्ये दोघे-तिघे खंदे फलदाज असल्यामुळे आमच्यावर फंलदाजी करायची वेळच यायची नाही. (झाकली मुठ सव्वा लाखाची........)
पण एकुणच क्रिकेटवर आपल प्रेम होते बुवा! आपापसात खेळताना मी फंलदाजीवर जाम मेहनत घ्यायचो. अलकनंदाच्या मैदानात खेळताना फलदाज एका भितिकडुन फलदाजी करायचा, समोरची भिंत (७०-८० फुटावर असेल बहुधा) म्हणजे बोन्ड्रिलाइन. मात्र षटकार मारण्यासाठि चेंडु सरळ मारावा लागत असे. अन्यथा फक्त २ धावा मिळत.
आमच्यातले काही फलदाज सातत्याने हि भिंत पार करायचे. मी पण प्रयत्न करायचो, पण साला... जमायचेच नाही. अगदी जिवाच्या आकांताने बल्ला फिरवायचो पण बोल नेहमीच माझ्या बेटला गुंगारा दयायचा. कित्येकदा या भिंतीपासुन त्या भिंतिपर्यत चालत जायचो. त्या भितिचा खुप हेवा वाटायचा अन ती पार करणारया मित्रांचाही.
आमच्यामध्ये १ रिवाज होता, टीममधिल ज्या कोणामुळे आम्ही मेच जिंकायचो, त्याला समोरच्या टीमचे सर्व पैसे मिळत. कधि-मधि हे पैसे २-३ जणांमध्ये शेअरही होत.(एकापेक्शा जास्त मेचविनर असले तर). शक्यतो हे मेचविनर माझे २ लंगोटीयारच असयचे -- समिर आणी छोटि. (१ सचिन तर दुसरा वार्न) त्यामुळे माझी मजाच असायची. शक्यतो मेच जिंकल्यावर आम्ही चायनीज खायला जायचो. त्यावेळी या १००-१५० रुपड्याचं खुप अप्रुप वाटे.दर खेपेला वेगवेगळे पदार्थ......अजुनही चव रेंगाळतेय जिभेवर........................
आणि तो दीवस उजाडला, माझ्यातिल फलदाजाचा??? रविवारचा दिवस होता, आमची मेच होती, समोर १ चांगलीशी टिम होती. नाणेफेक जिंकुन आम्हि फलदाजी स्विकारली. पण तो दिवस वेगळाच होता. अवघ्या ३ षटकांत आमचे ६ खंदे वीर झाडाखाली (तम्बुत)परतले होते. १० षटकांची मेच होती, जेमतेम १५-१६ धावा झाल्या असतील तेव्हा आमच्या. आणि आउट होणारया फलदाजाने माझ्या हातात बेट दिली.(मनात पहिल्यांदाच भिती वाटत होती, कारण प्रत्यक्ष फलदाजीची वेळ आमच्यावर अभावानेच येइ). मी स्ट्राइक घेत होतो, मित्रांचा आवाज कानावर पडत होता.
"विकेट टाकु नकोस रे..........."
"ज्वालाला स्ट्राइक देत जा रे................"
"४०-४५ धावा झाल्या तरी चालेल रे, बघुया.............."
चालु असलेलं पुर्ण षटक निर्धाव गेले. माझी बेट, बोलला स्पर्श करु पहात होती. ५ व्या षटकात ज्वालाने स्ट्राइक घेवुन चौकार मारला आणि मनावरील द्डपण काहीस कमी झालं. पुढच्याच चेंडुवर ज्वालाने १ धाव घेतल्यमुळे मी स्ट्राइकवर आलो. बोलर फ़ास्टर होता.
त्याने पुढचा बोल टाकला..
बेटपिच डिलीवरि...............
मी बेट उचलली..........................
नेहमी रुसलेली 'बोलरुपी नववधु' माझ्या 'बेटवर' आदळली होती....अगदि घणाघाती....
मी धाव घेण्यासाठि धावलो, पहातो तर काय? अंपायरचे दोन्ही हात वरती....समीर, ज्वाला धावत माझ्याकडे आलेले ....
"मैदान पार केलस रे उम्मि..शाबाश...असाच खेळ".
(मंडळी विचार करा, काय अवस्था झाली असेल माझी? झाडाखाली परतलेले मित्र पाठ थोपटुन जात होते....आज मी धन्य झालो होतो.क्रिकेट जगतातिल शहेनशहा(आपल्या तेंडल्या हो...) १०० रन्स पुर्ण झाल्यावर वरती पहातो ना, अगदि तोच थाट व भावना मनात उमलत होत्या.)
षटकातिल पुढ्चे चेंडु निर्धावच गेले. मात्र त्या दिवशी पुर्ण १० षटके खेळलो, नाबाद.....
छोटि नंतर सांगत होता, वीसेक धावा केल्या असतिल मी. आमच्या संघाची धावसंख्या झाली होती -- ५२.
ती मेच तर आम्हि जिंकलोच पण त्या मेचचा विनरहि मी ठरलो होतो. मेचविनरचे मिळालेले पैसे व जोडीला स्व:ताकडचे ५० रुपये आणखी टाकुन आमची स्वारी चायनिजकडे वळली, त्यादिवशी माझ्याबरोबर नेहमीचे 'मेचविनर' तर होतेच पण आजतागायत कधीहि मेचविनर न झालेलेही दोघे-तिघे होते,
खुप आंनद होत होता आज ओर्डर देताना........
आजही तो दीवस जश्याच्या तसा लक्षात आहे.............
(त्यानंतर मी मारलेला कोणताही चेंडु त्या भिंतीला पार करु शकलेला नाहि, पण म्हणुन फलदाजी करणं सोडतोय थोडाच. हि...हि..हि....)
अष्टपैलू क्रिकेटपट्टू,
उम्मि.....
प्रतिक्रिया
25 Nov 2008 - 5:04 pm | केवळ_विशेष
समोरच्या फंलदाजाने चेंडु उंचावर टोलावला असेल, आणि खाली का जर मी क्षेत्ररक्षणासाठी असेन तर आमच्या टीमचा गोंलदाज जराही जोशमध्ये न येता गपचुप बोलिंग मार्कवर जात असे. व आजुबाजुच्या क्षेत्ररक्षकांचा आवाज मा़झ्या कानावर पडे, "फक्त एकच रन दे रे, दुसरा नको." मी ही त्या सुचनेचे इमानेइतबारे पालन करत असे.
हा हा हा...:)
25 Nov 2008 - 5:11 pm | घाशीराम कोतवाल १.२
मला सुधा कधी व्यवस्तीत बॅटींग करता आली नाही पण मी एक चांगला गोलंदाज होतो मॅचविनर एव्हडा नक्कीच होतो
मागोवा - आमच्या काही उचापत्याचा...
25 Nov 2008 - 5:14 pm | सखाराम_गटणे™
>>मला सुधा कधी व्यवस्तीत बॅटींग करता आली नाही
मला फक्त बॅटींग मध्येच रस आहे.
--
मुम्बैच्या उकाड्यातही अंगावर शिरशिरी आणणारी रंगीत आठवण येऊन तुमचे गाल आरक्त होत असतील तर याचे आश्चर्य बाळगु नका. त्या उकाड्यातही अंगावर शिरशिरी आणणारी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
25 Nov 2008 - 5:21 pm | घाटावरचे भट
>>मला फक्त बॅटींग मध्येच रस आहे.
बॅटिंग मधे रस असणे आणि बॅटिंग चँपियन असणं यात फरक आहे.
25 Nov 2008 - 5:57 pm | सखाराम_गटणे™
>>बॅटिंग मधे रस असणे आणि बॅटिंग चँपियन असणं यात फरक आहे.
होईल हळु हळु सराव,
रोम वॉज नॉट बिल्ट इन वन डे.
--
मुम्बैच्या उकाड्यातही अंगावर शिरशिरी आणणारी रंगीत आठवण येऊन तुमचे गाल आरक्त होत असतील तर याचे आश्चर्य बाळगु नका. त्या उकाड्यातही अंगावर शिरशिरी आणणारी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
25 Nov 2008 - 6:03 pm | घाटावरचे भट
>>रोम वॉज नॉट बिल्ट इन वन डे.
इट टूक डीकेड्स टू बिल्ड रोम. तोपर्यंत तुम्ही म्हातारे व्हाल. वाढत्या वयानुसार चेंडू नीट दिसेनासा होतो म्हणतात.
25 Nov 2008 - 6:05 pm | श्री
=)) =)) =))
तमसो मा ज्योर्तिगमय
25 Nov 2008 - 6:05 pm | जैनाचं कार्ट (not verified)
>>>वाढत्या वयानुसार चेंडू नीट दिसेनासा होतो म्हणतात.
=))
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ
26 Nov 2008 - 10:27 am | सखाराम_गटणे™
--
अनुभवाने अंधुक उजेडात सुद्धा गैप शोधता येतो.
26 Nov 2008 - 10:38 am | शैलेन्द्र
मग घ्या अनुभव..
25 Nov 2008 - 5:37 pm | टारझन
बॅटिंग मधे रस असणे आणि बॅटिंग चँपियन असणं यात फरक आहे.
सहमत , +१ , =)) , असेच म्हणतो ...
बाकी मला तर बॉल मधे इंटरेस्ट आहे. त्यात चँपियन नसलो तरी चालेल. बॉल हवा फेकायला ...
-(बॉलर) टारझन मॅक'ग्रा
26 Nov 2008 - 10:54 am | अवलिया
बाकी मला तर बॉल मधे इंटरेस्ट आहे. त्यात चँपियन नसलो तरी चालेल. बॉल हवा फेकायला ...
चांगले आहे
॥ अथ बॉल पुराण॥
बॉल अनेक प्रकारचे असतात.
बॉल वेगवेगळ्या आकाराचे असतात.
बॉल अनेक कारणासाठी वापरता येतात.
टेबलटेनिसचे बॉल छोटे असतात तर फुटबॉलचे बॉल मोठे असतात.
काही जण बॉल हाताने खेळतात त्यांना बास्केटबॉल, व्हॉलीबॉल वगैरे नावे आहेत.
काही बॉल टणक असतात तर काही मउ असतात
बॉलचे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे उपयोग होतात.
कधी कधी बॉल कापडाच्या चिंध्या वापरुनही मोठे बनवुन खेळता येते. हा खास आबाधोबी साठी वापरतात.
फलश्रुती - हे बॉल पुराण वाचणा-याला बॉलचा लाभ होईल
॥ इति बॉल पुराण ॥
26 Nov 2008 - 11:01 am | सखाराम_गटणे™
वेगवेगळ्या प्रदेशातील बॉल वेगवेगळे असतात.
कडक बॉल नेहमीच चांगले.
26 Nov 2008 - 12:53 pm | टारझन
बॉल महापुराणाने डोळे धन्य झाले.
अफ्रिकेत सगळेच बॉल मोठे असतात, कोणत्याही दुकानात जा... ऍक्चुअली दुकानं पण मोठी आहेत. इथे मोठ मोठे मॉल्स त्यात मोठ मोठे बॉल्स. इथे कुकाबुरा (लाल किंवा पांढरे सिम वाले) बॉल भेटत नाहीत.
(अवांतर : नान्या .. कवठं माहित आहेत का रे तुला ? आपारपी खेळायचो आम्ही, बेक्कार टन्नक आणि योग्य आकार. आम्ही रानात कवठं खेळत असू, रंम्य ते बालपण (बॉलपन) )
- कवठाने बॉलिंग शिकलेला टारफान पठाण
25 Nov 2008 - 5:51 pm | परिकथेतील राजकुमार
किती दिवस झाले मी कारणच शोधत होतो सगळ्यांना सांगायचे कि अस्मादिक जिल्हा पातळीवर खेळुन आले आहेत ;) छान वाटले लेख वाचुन, सगळे जुने दिवस पुन्हा आठवले ! धन्यवाद मित्रा ___/\___
++++ प्रसाद ++++
तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी...तू बहराच्या, बाहूंची...
http://papillonprasad.blogspot.com/
25 Nov 2008 - 7:30 pm | कपिल काळे
--
25 Nov 2008 - 7:31 pm | अवलिया
नाही... बॅट बॉल.
26 Nov 2008 - 1:33 pm | अनिल हटेला
बॅटींग अणी बॉलींग म्हणजे खास आमचा प्रांत !!
आणी फील्डींग लावणे हा आवडता छंद !!
;) ;)
(आद्य कसोटीपटू)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
26 Nov 2008 - 1:40 pm | महेश हतोळकर
फिल्डींग आमचा पण आवडता छंद होता. येणार्या प्रत्येक बॉल वर नजर ठेऊन पोझिशन घ्यायचो. दुर्दैवाने बॉलला आधीच आमच्या कर्तृत्वाचा अंदाज यायचा आणि बॉलच आपली दीशा बदलायचा.