आमच्या घरापलीकडे एक भलमोठ नवीन तीन मजली घर बांधला आहे. तिथे एक परिवार राहयला आल आहे. बाहेरुन तर एकदम मस्त दिसत घर,अचुक रंगसंगतीने रंगवल आहे.अंगणात सुरेख छोटीशी बाग आहे. त्या बागेत मोगरा, गुलाब, जाई, रातराणी, जास्वंद,अनेक फुलाची झाडं आहे. मधल्या मजल्यावर छोटीशी Gallery आहे तिथे कुंडीत रोपे लावलेली आणि त्या कुंड्या लटकवल्या. हवेच्या तालात त्या सुरात हालत असत. फाटकाच्या आत नेहमी एक महागडी कार उभी असते. त्यांच्याकडे एक कुत्रा ही आहे.
एकंदरीत खुप श्रींमत लोक राहयला आलेत. नुस्त बाहेरुनच इतकं सुंदर घर तर मग आतुन किती सुंदर असेल.मला ते घर आतुन पण बघायची तीव्र इच्छा झाली.
रोज येता-जाता मी बघायचे ते घर. बागेत माळी काका अन् त्यांचा लहान मुलगा मन लावुन काम करायचे. त्या झाडांना जणु मायेच्या सावलीतच वाढवायचे, आपल्या लेकरांवर जस जीव लावतात अगदी तसाच जीव झाडांवर लावायचे.
त्या घरात एकदा हळदी- कुंकुच कार्यक्रम होतं. सोसायटीतल्या सगळंया बाईकांना निमंत्रणे येत होती. माझी आईसुद्धा आतुरतेने वाट पाहत होती.तेवढयात माळी काकांचा पोरगा आला आमच्या घरी हळदी-कुंकु आहे बाईसाहेबांनी बोलवल आहे, माझी आईची कळी फुलली.तिला ही ते घर आतुन पाहयचं होत. त्यात कोण राहत जाणुन घ्यायच होत, मला ही सोबत चल म्हणाली, मला ही जायच होतच मी ही निघाले, आईसोबत.
मला खुप उत्सुकता होती कोण लोक असतील, कसे असतील?
आम्ही फाटकाच्या आत आलो, एक साधी रांगोळी नव्हती दारात, तसेच आत गेलो तर एक बाई भरजरी साडीत, अंगावर भरपुर दागिने होते.अत्तराचा सुगंध खोलीभर दरवळत होता.
आम्ही आलो तिच्या चेहरावर साध हसुही उमटल नाही ना कसला आदरातिथ्य. उलट ती नोकरांनवर विनाकारण खेकसत होती. आम्हाला बघुन ती गप्प बसली.आईला हळदी-कुंकु लावयला लागली.
मी आजुबाजूला पाहीलं, खोलीत सुरेख paintings लावलेल्या होत्या. Out of India trip चे फोटो होते, महागडया, antique वस्तुने खोली खुपच सुंदर सजवली होती.दोन मिनटे झाली. शांततेचा भंग करत.आईने त्यांची विचारपुस केली, पण त्या बाईने उर्मटपणे उत्तरे दिली. अस वाटत होत ती नाही, तिची श्रीमंती उधटपणे बोलत होती. वाटल क्षणासाठी की तिने हळदी-कुंकुवाला नाही तर तिच्या श्रीमंतीच प्रदर्शन बघायला बोलवलं. माझ आणि आईचे त्या घरातल्या लोकांनबद्दलची उत्सुकता पुरती मावळली, आणि आम्हाला काय समजुन घ्यायचं ते आम्ही समजुन घेतल.
निरोप घेऊन घरी परतलो.
खरंच कस असतं ना?
मी फक्त त्या घराच्या बाह्य सुंदरता वर भाळले, पण आतुन तर ते घर नव्हतेच नुसत्या रंगवलेल्या भिंती. म्हणजे नुसतच प्लास्टिकच सुंदर रंगीत फुल, पण फक्त शोभेसाठी, प्रेमाचा,नात्यांचा सुगंध माञ हारवलेला होता. घराला घरपण येण्यासाठी नात्यांची घट्ट भिंत असावी लागते,आपलेपणाचं छप्पर लागतं, एकमेंकांना प्रेमाचा आधार लागतो.
व्यक्तीच्या बाह्य गोष्टीवर न भाळता, अंतरीक गोष्टींना महत्व द्या. कोणती हि गोष्ट surface level वरून judge करू नका.
-प्राजक्ता.
प्रतिक्रिया
10 Oct 2020 - 1:17 pm | खेडूत
आवडले.
एक जगप्रसिद्ध फेसबुकी कविता- ''घर असावं घरासारखं'' ही आठवली.
गंप्याच्या वसाहतीत अशीच घरे असतील असं (का कुणास ठाऊक) पण वाटलं!
10 Oct 2020 - 1:43 pm | Prajakta Sarwade
:)
10 Oct 2020 - 3:10 pm | दादा कोंडके
पण अर्धवट वाटतीये.
दुसर्या एका प्रसंगात शेजारच्या झोपडपट्टीत रहाणार्या कडून बोलावणं आलं. गटारासमोर झोपडी असूनसुद्धा सुरेख रांगोळी घातली होती. छोट्याश्या जगेत खंडीभर शेंबडी पोरं आनंदानं खेळत होती. घरात माश्या घोंगावत होत्या पण आदरातिथ्य छान केलं गेलं. बोंदर्या चादरीवर बसून फुटक्या कोपातून अळणी चहा पिताना काहीच वाटलं नाही आणि अजुबाजुला कुजलेला वासही त्यांच्या चांगुलपणामुळे तो सुवास वाटला. वैग्रे असलं तर ही कथा सफळ संपूर्ण झाली असती.
10 Oct 2020 - 4:15 pm | Prajakta Sarwade
मला गरीब श्रीमंत दोन्ही मध्ये फरक नव्हता दाखवायचं
तो मुद्दा(msg) वेगळी कडे गेला असता मग
बाह्य गोष्टीपेक्षा, अंतरीक गोष्टींना महत्व द्या. मी फक्त त्या घराच्या बाह्य सुंदरता वर भाळले, पण आतुन तर ते घर नव्हतेच नुसत्या रंगवलेल्या भिंती.
मला फक्त एवढंच सांगायचे होते कि आपण कोणती हि गोष्ट surface levle वरून judge करतो, तस नका करू
जे दिसतंय तसंच असत असा नाहि ना. एवढच.
बाकी तुम्ही पण छान सुचवल.
10 Oct 2020 - 9:39 pm | दादा कोंडके
तै, इथंच ममव वृत्ती मार खाते.
बाह्य गोष्टींबरोबरच आंतरीक गोष्टींना महत्व द्या, असं का असू नये?
10 Oct 2020 - 9:47 pm | विजुभाऊ
मराठी साहित्यात श्रिमंत हे कायम वाईट आणि गरीब हे चांगले असे का दाखवतात
10 Oct 2020 - 9:54 pm | कपिलमुनी
80 च्या दशकात स्त्री प्रधान मासिकात असे लेख यायचे