दुसर्‍याच्या नेत्रातून जीवन पहावं.

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
24 Nov 2008 - 9:23 am

लहानपणी आम्ही आमच्या आजोळी उन्हाळ्याच्या सुट्टीत जायचो.आजगावला आमचा ब्राम्हणांचा एक वाडा होता. दहा पंधरा घरं असतील एका वाड्यात.घरातली सर्व कामं नोकर चाकर येऊन करायची.पण गाई म्हशीना चरायला न्यायचं,त्याना नदीवर धुवायचं, घरी त्याना आणून गोठ्यात बांधून ठेवायचं,त्यांच्या समोर चारा वाढायचा,उरलेल्या अन्नाचा-पेज,उष्ट अन्न,-आंबवण त्याना खाऊ घालायचं ही कामं गावतल्या महारवाड्यातून काळू महार आणि त्याच्या बायका, मुलं येऊन करायची.
जाता जाता त्याला उरलेलं जेवण देऊन त्याच्या हातावर चवली ठेवायचं माझ्या आजीचं आणि चुलत आजीचं रोजचं काम असायचं.

माझी आई दरखेपेला अशीच आमच्याबरोबर येताना न चूकता आमचे जूने कपडे काळू महाराच्या मुला मुलीना वापरायला द्दायची.त्यांची ही गरिबी बघून मला त्यावेळी खूपच त्यांची दया यायची.काळूचा बाप आणि आजा मरेपर्यंत असलीच काम येऊन करायचे.हे त्यांचं पिढीजात काम असायचं.असं माझे आजोबा सांगायचे.आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत आल्यावर ही सर्व आजोळची वहिवाट पाहून मी त्यात स्वारस्य घेऊन पहायचो.मुंबईला असले व्यवहार होत नसल्याने हे बघायला जरा कौतूक वाटायचं.आणि दुःखही व्ह्यायचं. काळू महाराचा मुलगा-दगडू- मात्र असली कामं करीत नसे.तो शाळेत जाऊन शिकत असल्याने त्याचा अभ्यास करण्यात वेळ जायचा.

शिक्षणामुळे त्याच्या इच्छाशक्तिचा आणि शैलीचा उपयोग उपयुक्त प्रारंभीक सामाजीक क्रियांच्या व्याख्या करण्यात आणि वापर करण्यात झाला.धर्माचा खरा उपयोग अश्या काही लोकाना होतो की ज्याना त्यांच्या मनुष्य म्हणून जन्माला येण्याच्या योग्यतेच्या पलिकडे त्या धर्माची गरज, सहारा घेण्यात आणि दिलासा घेण्यात होते.एकप्रकारची मंत्रमुग्ध सुंदरता दुःखाने भरून वहाणार्‍या खोल नदीतून उफाळून येऊन,ती सुंदरता जणू मानवी जीवनाच्या छपलेल्या झर्‍यांना छूत आणि अछूत यातल्या धार्मिक अभिव्यक्तीला स्पर्श करते.शिक्षीत दगडूला हे आता भासू लागलं होतं.

माझी खात्री आहे की,मनुष्याला चांगला किंवा वाईट हे समाजच बनवतो.हाच समाज आपल्या व्यक्तित्वाला, नीतिशास्त्राला आणि आपल्या सामाजीक आदर्शाना रूप देतो.
दगडू महाराचा विचार केल्यावर त्याच्या जीवनाच्या तर्कशास्त्रात माणसा माणसातल्या असमानतेचा असंधिक्त विचार मी करू लागलो.

मला असं वाटतं,ज्यावेळेला माझी आई ह्या समाजातल्या लोकाना बोलावून आमचे सर्वांचे,तसेच आमच्या शेजार्‍यापाजार्‍यांचे वापरलेले कपडे मुद्दाम जमा करून आणून त्यांना द्दायची त्यावेळी त्या महारवाड्यातून त्यांच्या आया बहिणी कच्ची बच्ची सर्व आशाळभूत होऊन यायची. ते देण्यात कुणाला काय तर कुणाला काय दिलं जायचं.पण मग मला आवर्जून वाटायचं,की जरी कपडे देण्याच्या क्रियेत असामनाता राहिली तरी मुळातच त्या अच्छूत गरिबांच्या सामाजिक आणि आर्थिक वातावरणात असमानता असण्यात कसली प्रामाणिकता आली असावी.?

हे सांगण्याचं कारण एका वर्षी माझ्या आईने हे दरवर्षीचं कपडे देण्याचं काम एकदा माझ्यावर आणि माझ्या बहिणीवर सोपवलं.ह्या मिळालेल्या संधीतून मला वरील विचार सुचला.ह्या संधीने मला अचंबा होण्यासारखा,आणि नवीन जागृती होण्यासारखा एक मार्ग दिसू लागला.त्यामुळे सामाजीक धारणे बाबत एका महत्वाच्या बाबीवर माझा मजबूत दृढविश्वास बसाला. आणि तो असा की कुणाही व्यक्तीची ईमानदारीने पारख करायची झाल्यास त्याच्या नेत्रातून जगाकडे दृष्टी टाकली पाहिजे.मग ती त्यांची गरीब आजी असो किंवा तरूण बहिण असो,किंवा म्हातारा आजा असो.

त्यानंतर ज्या ज्या वेळी मी माझ्या आजोळी येत असे त्या त्या वेळी मी हे कपडे तर घेऊन यायचोच,त्या शिवाय लहान मुलाना खेळणी,शाळेत जाणार्‍याना गंमतीच्या गोष्टी असलेली पुस्तकं आणि वृद्धासाठी त्या वयात लागणारी नेहमीची औषधं आणून द्दायचो.अशा तर्‍हेने मी माझ्या अंतरदृष्टीचं आयोजन करायचो.

आतापावेतो दगडू चांगलाच शिकून मोठा झाला होता.मी त्याला विचारलं,
"तुझे वाडवडील ज्या तर्‍हेने राहायचे आणि आता तू शिक्षण घेऊन तुझी जी प्रगती केलीस त्यानंतर तू तुझ्या जीवनाकडे कसं पहातोस?"
त्यावर तो मला म्हणाला,
"जीवनाकडे मी अशा दृष्टीने पहातो की जे सतत पुनर्रचनेच्या प्रक्रियेत आहे.अशी पुनर्रचना की जीला नेहमीच बदलत्या दृश्यांची आणि परिस्थितीची जरूरी भासावी.पण त्यातून मी अशी आशा करतो की ती परिस्थिती जीवनातल्या येणार्‍या कठिण संबंधातून काही पोषक गोष्टी खेचून घेत असेल.जीवन हे मला अंत नसलेलं आव्हान आहे.असं आव्हान की ज्यावर
निसर्गाचे आणि सामाजिक जीवनाचे दबाव लादलेले आहेत.मला असं अनुभवायला आवडेल की ते जगातलं आत्मीक जीवन आहे आणि जे दुनियादारी,हाव आणि संवेदनाशुन्यता ह्या ज्या माणसाच्या मोठ्यात मोठ्या गरजा आणि अभिलाषा आहेत त्यावर त्याचा मोठा दबाव असेल.
काही लोक त्या आत्मीक जीवनाला "निसर्ग" समजतात तर काही "देव" समजतात."

दगडू महाराचं हे छोटसं भाष्य ऐकून मला इतका आनंद झाला की निदान ह्याच्या पिढीला नव्हेतर ह्याच्या नंतरच्या कुठच्याच महाराच्या पिढीला आमची ती कामं करावी लागणार नाहीत आणि मला जुने कपडेपण कुणाला द्दायला नकोत.त्याला दोन कारणं झाली.एक म्हणजे माझ्या मामानी गाईम्हशीना डेअरीत देऊन टाकून तो गाईम्हशीचा गोठा बंद करून टाकला आणि आता त्याना सेंट्रल डेअरीतून मुबलक दुध मिळायला लागल.आणि दुसरं कारण म्हणजे दगडू पासूनची आणि नंतरची पिढी हळू हळू सुशिक्षीत होऊन त्याना साजेशी कामं करायला लागली. तो त्याच्या पूर्वीच्या पिढीचा आशाळभूतपणा डोळ्यासमोर
आल्यावर मला खूप दुःख होतं.पण ही नवीन सुधारणा पाहून मात्र अत्यानंद होतो.

श्रीकृष्ण सामंत

कथाविचार

प्रतिक्रिया

जैनाचं कार्ट's picture

24 Nov 2008 - 11:19 am | जैनाचं कार्ट (not verified)

>>>मनुष्याला चांगला किंवा वाईट हे समाजच बनवतो.हाच समाज आपल्या व्यक्तित्वाला, नीतिशास्त्राला आणि आपल्या सामाजीक आदर्शाना रूप देतो.

१००% सत्य वचन !

खुप छान लिहता तुम्ही !

शिक्षण हेच जिवनमान सुधारण्याचं महत्वाचे साधन आहे... पण शिक्षणापेक्षा मी अनुभव / प्राक्टीकल कामावर जोर देणे पसंद करतो !

आपला, दहावी ना-पास ;)
जैनाचं कार्ट

शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ

घाशीराम कोतवाल १.२'s picture

24 Nov 2008 - 4:58 pm | घाशीराम कोतवाल १.२

आपण राज्याशी सहमत
शिक्षण हेच जिवनमान सुधारण्याचं महत्वाचे साधन आहे... पण शिक्षणापेक्षा मी अनुभव / प्राक्टीकल कामावर जोर देणे पसंद करतो !
आपला, बारावी चार वेळा ना-पास

घाशीराम कोतवाल
मागोवा - आमच्या काही उचापत्याचा...

llपुण्याचे पेशवेll's picture

24 Nov 2008 - 10:02 pm | llपुण्याचे पेशवेll

बदलता काळ आणि सुधारणेचे सकारात्मक परीणाम अधोरेखित करणारा हा लेख आवडला. कोकणातल्या आमच्याही घराच्या आसपास असेच कपडे वाटप आमची आजी करत असे. केवळ महारच नाही तर साधारण सर्वच जातीच्या लोकाना. म्हणजे माझा चुलत-चुलत भाऊ देखील माझे जुने कपडे घालायचा. याला कारण मुख्यत्वे 'गरीबी' हेच होते. गरीबी आणि अपुर्‍या सोई (म्हणजे केवळ जीवनावश्यक सोयीच असे नव्हे) तर शिक्षण, दळणवळण याचा अभाव, दुर्गमता. यामुळे गरीबी ही सर्व जाती धर्माना छेद देऊन सर्वांकडे समभावाने वसलेली होती. असो. आता परीस्थिती सुधारत आहे. :)

छूत - अछूत शब्द जरा वाचताना खटकले. स्पृश्य - अस्पृश्य असे शब्द साधारणपणे मराठीत वापरतात.

पुण्याचे पेशवे

श्रीकृष्ण सामंत's picture

25 Nov 2008 - 8:59 am | श्रीकृष्ण सामंत

पुण्याचे पेशवे,
आपल्या म्हणण्याशी मी पूर्ण सहमत आहे.ह्या लेखात महाराचं उदाहरण एव्हड्यासाठीच दिलं की तो समाजातला अतिशय दूरल्क्षीत समुदाय असल्याने त्यांची स्थिती माझ्या लक्षात जास्त होती.आपण म्हणता तसं आमच्या ही नातेवाईकात परिस्थिती चांगली नसलेल्या लोकानाही मदत करावी लागायची.
छूत-अछूत (कोकणात आम्ही शिवा-शिवी असा वाकप्रचार करायचो.) आणि महार ह्या शब्दा ऐवजी स्पृश्य-अस्पृश्य आणि हरिजन हे शब्द न वापरून वाचताना त्यावेळच्या परिस्थितीची वास्तविकता ठेवण्याचा विचार माझ्या मनात आला.
आपल्याला वाचताना ते खटकलं हे वाचून वाईट वाटतं.क्षमस्व.
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

श्रीकृष्ण सामंत's picture

25 Nov 2008 - 7:18 am | श्रीकृष्ण सामंत

जैनाचं कार्ट,घाशीराम कोतवाल,
आपणा दोघांच्याही म्हणण्याशी मी सहमत आहे.
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

जागु's picture

25 Nov 2008 - 11:47 am | जागु

सामंत मी आजच इथे जॉइन झाले आहे. तुमचे लेख वाचते आहे. तुम्ही छान लिहिता.

श्रीकृष्ण सामंत's picture

26 Nov 2008 - 10:50 am | श्रीकृष्ण सामंत

जागु,
आपलं मिपावर माझ्याकडूनही स्वागत.माझे लेख आपल्याला आवडतात हे वाचून बरं वाटलं.
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

सर्किट's picture

25 Nov 2008 - 10:33 pm | सर्किट (not verified)

जीवनाकडे मी अशा दृष्टीने पहातो की जे सतत पुनर्रचनेच्या प्रक्रियेत आहे.अशी पुनर्रचना की जीला नेहमीच बदलत्या दृश्यांची आणि परिस्थितीची जरूरी भासावी.पण त्यातून मी अशी आशा करतो की ती परिस्थिती जीवनातल्या येणार्‍या कठिण संबंधातून काही पोषक गोष्टी खेचून घेत असेल.जीवन हे मला अंत नसलेलं आव्हान आहे.असं आव्हान की ज्यावर
निसर्गाचे आणि सामाजिक जीवनाचे दबाव लादलेले आहेत.मला असं अनुभवायला आवडेल की ते जगातलं आत्मीक जीवन आहे आणि जे दुनियादारी,हाव आणि संवेदनाशुन्यता ह्या ज्या माणसाच्या मोठ्यात मोठ्या गरजा आणि अभिलाषा आहेत त्यावर त्याचा मोठा दबाव असेल.
काही लोक त्या आत्मीक जीवनाला "निसर्ग" समजतात तर काही "देव" समजतात."

ह्या दगडू महाराला कळलं ते आज मोठमोठ्या सुशिक्षित लोकांनाही कळत नाही.

धन्य तो दगडू, आणि धन्य तुम्ही ज्यांना अशा महान व्यक्तींचा सहवास लाभला!

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Nov 2008 - 10:45 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

ह्या दगडू महाराला कळलं ते आज मोठमोठ्या सुशिक्षित लोकांनाही कळत नाही.
+१ सर्किट काकांशी सहमत.

घाटावरचे भट's picture

25 Nov 2008 - 11:23 pm | घाटावरचे भट

वरील सर्वांशी सहमत.

कोलबेर's picture

26 Nov 2008 - 7:53 am | कोलबेर

वरील सर्वांशी आणि खालील एखाद दोघांशी देखिल सहमत.
आता बाजुचे कधी प्रतिसाद देतात पाहू आणि त्यावर सहमती ठरवू.
(सहमत) कोलबेर

सखाराम_गटणे™'s picture

26 Nov 2008 - 10:33 am | सखाराम_गटणे™

++++१
सहमरत

कपिल काळे's picture

25 Nov 2008 - 10:53 pm | कपिल काळे

हो दगडू महारासारखे किती जणांना समजेल?

छोटा डॉन's picture

25 Nov 2008 - 11:03 pm | छोटा डॉन

सामंतकाका, तुमचा लेख आवडला ...

>>मनुष्याला चांगला किंवा वाईट हे समाजच बनवतो.हाच समाज आपल्या व्यक्तित्वाला, नीतिशास्त्राला आणि आपल्या सामाजीक आदर्शाना रूप देतो.
+१, सहमत आहे ह्या वाक्याशी ...
हे बर्‍याच जणांना समजुन सुद्धा लोक एकदम नासमझ वागतात.
असो.

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

श्रीकृष्ण सामंत's picture

26 Nov 2008 - 11:01 am | श्रीकृष्ण सामंत

सर्किट,अदिती,घाटावरचे भट,कोलबेर,सखाराम_गटणे कपिल काळे,छोटा डॉन,
आपल्या सर्वाच्या म्हणण्याशी मी अगदी सहमत आहे.
आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

सखाराम_गटणे™'s picture

26 Nov 2008 - 1:52 pm | सखाराम_गटणे™

दगडू महारा सारखे लोक, आजकाल दिसणॅ मुश्कील झाले आहे.

बाकी महार म्हणणे हा गुन्हा आहे ना (?????)

--
मुम्बैच्या उकाड्यातही अंगावर शिरशिरी आणणारी रंगीत आठवण येऊन तुमचे गाल आरक्त होत असतील तर याचे आश्चर्य बाळगु नका. त्या उकाड्यातही अंगावर शिरशिरी आणणारी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

श्रीकृष्ण सामंत's picture

27 Nov 2008 - 12:18 am | श्रीकृष्ण सामंत

बाकी महार म्हणणे हा गुन्हा आहे ना (?????)
मला वाटत नाही कारण आपल्या सैन्यात ब्रिटिशांपासून नेमलेली "महार रेजीमेंट" म्हणून एक तुकडी आहे.अर्थात आता त्या तुकडीत सर्वच महार असतील असं नाही.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com