कार्गो - एक फसलेला प्रयोग

साहना's picture
साहना in जनातलं, मनातलं
15 Sep 2020 - 7:11 am

विज्ञान कथा हा प्रकार मला विशेष प्रिय आहे. कार्गो हा नेटफ्लिक्स चा चित्रपट पाहायची उत्सुकता होती. आमचे एक मित्र ह्या प्रकल्पावर काम करत असल्याने सुद्धा विशेष उत्सुकता होती. पण हा चित्रपट सपशेल फेल आहे.

कथानक तुम्हाला सांगितले तरी काहीही फरक पडणार नाही कारण ह्यांत स्पॉईलर असे काहीच नाही. "दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे" ह्यांत जसे मथळ्यांतच कलाईमेक्स सांगून कारण जोहर मोकळा झाला होता त्याच प्रमाणे कार्गो म्हणजे सुद्धा एक अवजड ओझे आहे जे तुम्हाला सहन करावे लागते.

राक्षस आणि मानवांचा एक तह झाला आहे. राक्षस लोक म्हणजे X-men प्रमाणे विशेष शक्ती असलेले खूप वर्षे जगणारे लोक आहेत. राक्षस लोकांनी अवकाशांत पुष्पक नावाची याने पाठवली आहेत. कुठलाही माणूस जेंव्हा मरतो तेंव्हा तो ह्यातील एक विमानावर पोचतो. जिथे एखादा राक्षस कारकून त्यांची सर्व स्मरणशक्ती काढून त्यांना पुनर्जन्म घेण्यासाठी पृथ्वीवर पाठवतो. अख्या विमानात फार तर एक किंवा दोन राक्षस असतात.

आपला नायक "प्रहस्थ" आहे. हेच मला थोडेफार खटकले. हिंदू कथांतून प्रेरणा घ्यायची होती तर फक्त रावणाची प्रेरणा का घेतली ? त्याशिवाय आपला नायक एक राक्षस आहे ह्या विषयाचा कथेवर काहीही प्रभाव नाही.

एक गोष्ट चॅन केलीय ती म्हणजे संपूर्ण अवकाश यंत्रणा आपल्या स्टेट बॅंकेच्या कारकुनांनी चालविल्या प्रमाणे एकदम "रिट्रो" वाटते. प्रहस्थ असो वा त्याचे ग्राउंड स्टाफ सगळे एकदम सरकारी बाबू वाटतात. अगदी यंत्रणा सुद्धा मुद्धाम जुनाट वाटते.

प्रहस्थ हा एकटाच आपल्या विमानात मागील ७० वर्षे काम करत आहे. त्याच्या मदतीसाठी मागे ते एक मुलगी पाठवतात. पाहणाऱ्यांना वाटेल कि ह्यांत काही तरी ट्विस्ट आहे पण आपला अपेक्षाभंग होतो. आता हे दोघे मिळून काही तरी करणार असे वाटते इतक्यांत आपल्या प्रहस्थ ला निवृत्ती घेण्यासाठी भाग पडले जाते. प्रहस्थ पृथीवर परत येतो आणि त्याची तरुण सहकारी युविष्का पुष्पक चा चार्ज घेते.

चित्रपट संपल्यानंतर आपल्याला लक्षात येते कि मुलांत चित्रपटाची कथा एकदम रद्दड होती. मुख्य मुद्दा होता कार्गोचा. कथेच्या दरम्यान अनेक मेलेले लोक वर येतात आणि प्रहस्थ आणि युविष्का त्यांना प्रोसेस करतात .कदाचित प्रेक्षकांनी ह्यावर भर द्यावा असे दिग्दर्शकाला वाटले असेल पण त्यांत ते पूर्ण पाने अपयशी ठरतात.

एखादा माणूस मरतो तर शरीरा सकट तो विमानात कसा पोचतो ? पोचलाच तर आपण मेलो आहोत ह्या इतक्या महत्वाच्या गोष्टीवर ते कसे काहीच थयथयाट करत नाहीत ? अगदी पोलीस स्टेशन मध्ये हजेरी लावायला आलेल्या गुंडाच्या चर्येने ते आपल्या स्वतःच्या मृत्यूला सामोरे जातात. आणि ह्याच मुले आपण प्रेक्षक ह्यांना जास्त गांभीर्याने घेत नाही.

कदाचित जीवन हे अतिशय छोटे असून आपण छोट्या छोट्या गोष्टीं समधान मानून ते सार्थक केले पाहिजे असे कदाचित चित्रपट आम्हाला सांगू इच्छित होता पण ते खरे असेल तर आपल्या आयुष्याचे २ तास हा चित्रपट पाहून खर्ची घालणे त्या तत्वाच्या विरोधात जाते, कारण हा चित्रपट खरोखर एकदम रद्दी आहे .

कलासमीक्षा

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

15 Sep 2020 - 10:41 am | चौथा कोनाडा

झकास परखड समिक्षण !

संपूर्ण अवकाश यंत्रणा आपल्या स्टेट बॅंकेच्या कारकुनांनी चालविल्या प्रमाणे एकदम "रिट्रो" वाटते. प्रहस्थ असो वा त्याचे ग्राउंड स्टाफ सगळे एकदम सरकारी बाबू वाटतात.

हे भारी लिहिलंय, त्या मुळं कार्गोचा दर्जा समजतो.
ओटीटीच्या लाटेत असे ओंडके वहात येणारच,

कानडाऊ योगेशु's picture

15 Sep 2020 - 3:17 pm | कानडाऊ योगेशु

पळवत पळवत दहा बारा मिनिटांत उरकला. पॉझ करुन पाहावा असा एकही प्रसंग नव्हता.

नीलस्वप्निल's picture

15 Sep 2020 - 3:44 pm | नीलस्वप्निल

धन्यवाद ! २ तास वाचवल्या बद्द्ल :)

संपूर्ण अवकाश यंत्रणा आपल्या स्टेट बॅंकेच्या कारकुनांनी चालविल्या प्रमाणे एकदम "रिट्रो" वाटते. प्रहस्थ असो वा त्याचे ग्राउंड स्टाफ सगळे एकदम सरकारी बाबू वाटतात. अगदी यंत्रणा सुद्धा मुद्धाम जुनाट वाटते.

तुम्ही शेवटच्या स्टेट बँकेत कधी गेल्या होत्या? एवढ्यात गेल्या नसल्यास एकदा जाऊन बघा.
बाकी माझे पण दोन तास वाचवल्याबद्दल आभार!

कपिलमुनी's picture

16 Sep 2020 - 7:46 pm | कपिलमुनी

स्टेट बँकेत जॉईट अकाउंट काढायला तर म्हणे दोघांचे पत्ते सेम हवेत.