आज अंगणातच मला दुरावा दिसला,
सगळयानी त्याला परक केल
याची खंत सलत होती त्याला,
त्याची ती अवस्था पाहवली नाही मला,
मी दुराव्याला ही आपलेस केलं,
असहायतेलाही साहय केलं,
दुख ही दरात उभा राहुन पाहत होत सार.
त्याच ही अगदी आनंदाने स्वागत केलं,
तो मला विखुरताना पाहयला आला होता,
त्यालाच मी प्रेमाच्या दोन शब्दांने सावरलं,
ते एेकुन माञ त्याचे डोळे नभाळ झाले
आणि दुख ही त्या क्षणी सुखावला,
कसली तरी चाहुल लागली,
कोण आहे तिकडे, पाहलं
कोपरयात गुपचुप खाली मान घालुन
एकटाच एकटेपणा बसला होता
काय हवं तुला? मी विचारताच,
काही न बोलता नुसताच तो हसला
मी गेले त्याकडे, बसले त्याच्याजवळ
आम्ही गप्पामध्ये इतके रंगलो, की
राञ संपुन पहाट झाली लक्षातच आला नाही
जस जस सुर्यकिरणे सगळीकडे
तिमिराला पुसत पसरु लागली,
तसा तसा तो ही नाहीसा होऊ लागला,
जाताना हसुन माझा निरोप त्यांने घेतला
कित्येक राञी नंतर आज त्याच हसु पाहलं
एकटेपणाची सोबतीण मी होऊन
त्याच्या एकटेपणाच ओझा मी वाहीलं......
-प्राजक्ता
प्रतिक्रिया
16 Sep 2020 - 10:39 pm | Prajakta Sarwade
प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत....
18 Sep 2020 - 9:23 am | प्रचेतस
लिहीत राहा, लोक वाचत असतातच.
19 Sep 2020 - 9:35 am | Prajakta Sarwade
नक्की लिहित राहू,
18 Sep 2020 - 10:33 am | शा वि कु
पण "विखुरताना पाहायला आलेला तो" आणी "कोपऱ्यात बसलेला तो" एकच आहेत का वेगवेगळे ?
19 Sep 2020 - 9:46 am | Prajakta Sarwade
माणसाला ज्या भावना मध्ये आपण एकटे सोडतो,तेव्हा त्या व्यक्ती ला कस वाटत हे ना मांडता, त्या भावनाना कस वाटत असेल(परकेपणा, दुख, एकटेपणा), त्यावर कविता आहे, त्या भावनाची सोबतीण होऊन त्यांना मी त्या भावनाना धीर दिला असा आहे .
19 Sep 2020 - 9:53 am | विनिता००२
छान :)
19 Sep 2020 - 11:04 am | Prajakta Sarwade
आवडली हेच खूप!
19 Sep 2020 - 10:15 am | गणेशा
दुःखाला हि सुखाची झालर लावणे
आणि एकटेपणा लाही सोबत देणे ह्या कल्पनाच किती सुंदर आहेत..
दुःखाला आनंदाने सामोरे जाऊन त्याला सावरणे मस्तच..
कविता छान आहे..
लिहीत रहा.. वाचत आहे...
19 Sep 2020 - 11:01 am | Prajakta Sarwade
मार्गदर्शन असु दे!
21 Sep 2020 - 9:30 pm | निओ
थोडं शुद्ध लेखन, ऊच्चार (कि मुद्रण संस्कार) याकडे लक्ष दिलं असतं तर ऊत्तम झाले असते.
23 Sep 2020 - 12:53 am | Prajakta Sarwade
लक्ष असेल यापुढे त्या points वर
23 Sep 2020 - 12:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लिहिते राहा. शुभेच्छा....! कवितेचा फायनल ड्राफ्त करतांना शब्दांचे अनुक्रम आणि योग्य शब्द, योग्य जागी आला पाहिजे.
आशय कसा थेट भिडला पाहिजे, वाचतांना वाचक कुठे अडखळला नाय पाहिजे. बाकी, कवितेचा आशय आवडला. हे वेगळे सांगणे न लगे.
-दिलीप बिरुटे