सोबतीण
लेखनविषय:
आज अंगणातच मला दुरावा दिसला,
सगळयानी त्याला परक केल
याची खंत सलत होती त्याला,
त्याची ती अवस्था पाहवली नाही मला,
मी दुराव्याला ही आपलेस केलं,
असहायतेलाही साहय केलं,
दुख ही दरात उभा राहुन पाहत होत सार.
त्याच ही अगदी आनंदाने स्वागत केलं,
तो मला विखुरताना पाहयला आला होता,
त्यालाच मी प्रेमाच्या दोन शब्दांने सावरलं,
ते एेकुन माञ त्याचे डोळे नभाळ झाले
आणि दुख ही त्या क्षणी सुखावला,
कसली तरी चाहुल लागली,
कोण आहे तिकडे, पाहलं
कोपरयात गुपचुप खाली मान घालुन
एकटाच एकटेपणा बसला होता
काय हवं तुला? मी विचारताच,
काही न बोलता नुसताच तो हसला
मी गेले त्याकडे, बसले त्याच्याजवळ
आम्ही गप्पामध्ये इतके रंगलो, की
राञ संपुन पहाट झाली लक्षातच आला नाही
जस जस सुर्यकिरणे सगळीकडे
तिमिराला पुसत पसरु लागली,
तसा तसा तो ही नाहीसा होऊ लागला,
जाताना हसुन माझा निरोप त्यांने घेतला
कित्येक राञी नंतर आज त्याच हसु पाहलं
एकटेपणाची सोबतीण मी होऊन
त्याच्या एकटेपणाच ओझा मी वाहीलं......
-प्राजक्ता
वाचन
4627
प्रतिक्रिया
0