सांगा कसं शिकायचं ?

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
23 Nov 2008 - 8:51 am

त्याचं असं झालं,मी माझ्या नातीला निरोपाचे एक छोटेसे पत्र लिहीत होतो.ती आज युसी(अर्वाइन)एलेला पुढील शिक्षणासाठी रवाना झाली.तिला निरोप द्यायला मी विमानतळावर पण गेलो नाही.
माझा नातू सुद्धा गेल्या आठवड्यात असाच तिच्या सारखाच युसी(एस सी) स्यॅनाकृझला पुढील शिक्षणासाठी रवाना झाला. त्यालाही मी निरोपाचं असंच एक छोटसं पत्रं लिहीलं. त्याचं ठिकाण जवळच असल्याने त्याला घरूनच निरोप देता आला.
आता एकदा गेल्यानंतर ही मुलं सुरवातीला तीनएक महिने तरी आम्हाला दिसणार नाहीत.

सहजच सुचलं म्हणून मी माझ्या काळातल्या, आणि आमच्या मुलांच्या वेळच्या, भारतातल्या शिक्षण पद्धतीचा विचार मनांत येऊन, तुलना करू लागलो.
आमची कॉलेजं अगदी जवळच,रोज ट्रेनने किंवा बसने जाऊन परत रात्री घरी.रात्री घरी आल्यावर, आईने केलेली पोह्याची किंवा साबुदाण्याची खिचडी, बरोबर गरम गरम कपभर चहा घेऊन, थोड्या इकड्च्या तिकडच्या गप्पा करीत हवा तेव्हडा अभ्यास करून वाटल्यास एखादी टिव्ही वरची सिरयल बघून रात्री आईच्या हातचं सुग्रास जेवण जेऊन, झोपी गेल्यावर परत सकाळी उठून रोजचाच तोच कार्यक्रम चालूच.

त्या तुलनेने किंबहूना, तुलना करणंच गैर, इतकं इकडचं ह्या मुलांचे आयुष्य खडतर. कदाचीत एखाद्याला स्वतंत्र डॉर्म मधे रूम मिळेल,नाहीपेक्षा सर्व साधारण प्रत्येकी दोन मुलं एका रूम मधे वाटून राहातात.स्वतःचा जणू नवा संसारच थाटतात.
"पैसा दो और सेवा लो."
सकाळच्या ब्रेकफास्टपासून रात्रीच्या जेवण्यापर्यंत, लाजवाब खाणं. "फ्रेशमन फिफटीन" असं म्हणण्याची एक प्रथा इकडे आहे.त्याचा अर्थ असा, की ही पहिल्या वर्षाची मुलं दोन तिन महिन्यात पंधराएक पौंड वजन वाढवतात.परंतु, गप्पा मारा आणि थोडा टीव्ही बघा असलं काही करता येत नाही."बैलाला जूं" बांधून शेत नांगरायला लावल्या सारखं, पहिल्या दिवसापासून बिझी ठेवतात.

तसं पाहिलं तर तिकडचा शिक्षणाचा निव्वळ खर्च, इकडच्या मानाने नगण्य.अर्थात तिकडचा खर्च भारतातल्या स्रर्व साधारण लोकांच्या दृष्टीने खूपच,पण इकडे प्रत्येक गोष्ट "पैशाचा धंदा"या द्रुष्टीने पाहिला जात असल्याने, एक मराठी कविता आठवली
प्रेमची चटणी
प्रेमची भाकर
प्रेमाचा सुटला स्वाद
करूया प्रेमाचा संसार
तद्वत
पैसाच चटणी
पैसाच भाकर
पैशाचा सुट्ला स्वाद
करूया पैशाचा संसार

खरं म्हणजे इकडे मुल, अठरा वर्षाचं झालं, म्हणजे ऍड्ल्ट झालं (बाप्या किंवा बाई)असं समजतात.त्यामुळे बाह्य जगाशी ती उघडी होतात.अकस्मात त्यांना पोक्तपणा येतो.एव्हडंच काय, त्यांच्या याउप्पर होणाऱ्या कसल्याही माहितीची वाच्यता,मग त्यांचा प्रोगरेस कसा चालला आहे, त्याला परिक्षेत मार्कस किती मिळाले, याची माहिती, कायद्याने इतर कुणालाही (आई वडीलाना सुद्धा)कॉलेज कडून देता येत नाही.अर्थात ही गोष्ट "फ्रिडम ऍन्ड प्रायव्हसी"च्या कारणासाठी असल्याने, ज्यासाठी अमेरिका तत्पर आहे,त्याचा वापर केला जातो.कदाचित ह्याचा वापर एव्हड्या लहान वयात पण केला जातो ह्याला इकडची कुटुंबपद्धती कारणीभूत असेल,परंतु, ह्या विषयावर चर्चा करणे इथे योग्य वाटत नाही.

कॅम्पस मधे राहून दुनियादारी सांभाळावी लागते.पैशाचे सर्व व्यवहार सांभाळावे लागतात.एव्हड्या लहान वयात केव्हडी ही जबाबदारी?
उलट तिकडे, अगदी लग्न होई तो पर्यंत, शिक्षण आणि अभ्यासाशिवाय कसलीच जबाबदारी नसते.आई किंवा बाबांचा ती जबाबदारी असते.आता आता तर भारतातसुद्धा अशीच पद्धती चालू करू पहात आहे किंबहूना झाली आहे.आता हे बरं की ते बरं हे ज्याने त्याने ठरवावं.

एका दृष्टीने पहिलं बरं वाटतं, की स्वतःच्या पायावर उभं राहाण्याची संवय अगदी सुरवाती पासून होते.दुसऱ्या प्रकारात एव्हडी जबाबदारी नसल्याने, शिकत असतानाचं आयुष्य मजेत जातं.काही तरी मिळण्यासाठी काही तरी गमवावं लागतंच.
शेवटी काय? ती पद्धती असो वा ही पद्धती असो, "पसंत अपनी अपनी अन ख्याल अपना अपना " हेंच खरं.कुणीस म्हटलंय ना-----

"पिसे सनतडी, काड्या जमवी चिमणी बांधी कोटे ।
दाणा दाणा आणून जगवी जीव कोवळे छोटे ।
बळावता बळ पंखामधले पिल्लू ऊडूनी जाई ॥१॥"

ह्या सत्याला निवड मात्र नाही.मग शिक्षणपद्धती इकडची असो वा तिकडची असो.

श्रीकृष्ण सामंत

कथाविचार

प्रतिक्रिया

कोलबेर's picture

26 Nov 2008 - 10:21 am | कोलबेर

वटी काय? ती पद्धती असो वा ही पद्धती असो, "पसंत अपनी अपनी अन ख्याल अपना अपना " हेंच खरं.कुणीस म्हटलंय ना-----

ह्यातला खेळकरपणा भावला!

श्रीकृष्ण सामंत's picture

26 Nov 2008 - 11:06 am | श्रीकृष्ण सामंत

कोलबेर,
प्रतिक्रिये बद्दल आभार.

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

सर्किट's picture

26 Nov 2008 - 1:36 pm | सर्किट (not verified)

यू सी अर्वाईन आणि यू सी सँटाक्रूज ह्या दोन्ही चांगल्या युनिवर्सिटीज आहेत.

अभिनंदन !

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

सखाराम_गटणे™'s picture

26 Nov 2008 - 1:40 pm | सखाराम_गटणे™

खूपच,पण इकडे प्रत्येक गोष्ट "पैशाचा धंदा"या द्रुष्टीने पाहिला जात असल्याने, एक मराठी कविता आठवली
प्रेमची चटणी
प्रेमची भाकर
प्रेमाचा सुटला स्वाद
करूया प्रेमाचा संसार
तद्वत
पैसाच चटणी
पैसाच भाकर
पैशाचा सुट्ला स्वाद
करूया पैशाचा संसार

मनाला भावले

विनायक प्रभू's picture

26 Nov 2008 - 1:43 pm | विनायक प्रभू

लै भारी, सामंत काका.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Nov 2008 - 1:49 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

कॅम्पस मधे राहून दुनियादारी सांभाळावी लागते.पैशाचे सर्व व्यवहार सांभाळावे लागतात.एव्हड्या लहान वयात केव्हडी ही जबाबदारी?
आजची पिढी आधीच्या पिढीपेक्षा स्मार्ट आहेच ना, मग काळजी कशाला?

शेवटी काय? ती पद्धती असो वा ही पद्धती असो, "पसंत अपनी अपनी अन ख्याल अपना अपना " हेंच खरं.कुणीस म्हटलंय ना-----
अगदी.

सर्किट's picture

26 Nov 2008 - 2:04 pm | सर्किट (not verified)

आजची पिढी आधीच्या पिढीपेक्षा स्मार्ट आहेच ना, मग काळजी कशाला?

अदितीशी सहमत आहे.

नवीन पिढी अर्थव्यवहार चांगले समजते.

ओबामाच्या इकॉनॉमिक ऍडवायजर मध्ये बरेच ३५-४० वर्षाचे आहेत.

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

श्रीकृष्ण सामंत's picture

27 Nov 2008 - 12:08 am | श्रीकृष्ण सामंत

सर्किट,सखाराम_गटणे,विनायक प्रभू,अदिती,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com