एक कविता

दत्ता काळे's picture
दत्ता काळे in जे न देखे रवी...
22 Nov 2008 - 1:48 pm

हि कविता मी कॉलेजमध्ये असताना केलेली होती.

थांबू नकोस तू, ओळख देण्यासाठी
नादात हरवल्या एका वेड्यासाठी
तो म्हणतो "गाणे रुसले गाता, गाता,
शब्दांस टाळुनी गेली एक कविता"

हे गाणे नाही, हे तर त्याचे जळणे
कवळून आठवणी, झाडामागे हसणे
ती सुरेल गाथा, झुरण्यासाठी आता
शब्दांस टाळुनी गेली एक कविता

आठवतो चांदण्या रात्रीमधले श्वास
'याचना फुलांची', होता केवळ भास
त्या याचकास ना उरला कोणी दाता
शब्दांस टाळुनी गेली एक कविता

प्रेमकाव्यकविता

प्रतिक्रिया

सुवर्णमयी's picture

24 Nov 2008 - 7:35 am | सुवर्णमयी

शब्दांस टाळुनी गेली एक कविता
- वा! ही ओळ एकदम मनाला भिडली. कविता अतिशय सुरेख झाली आहे.
सोनाली

विसोबा खेचर's picture

24 Nov 2008 - 10:13 am | विसोबा खेचर

कविता अतिशय सुरेख झाली आहे.

असेच म्हणेन..!

येऊ द्यात अजूनही..

तात्या.

राघव's picture

5 Dec 2011 - 12:34 am | राघव

खरंच चित्राताईंनी म्हटल्याप्रमाणे चांगल्या कविता शोधणं मुश्किल होतंय.. ही कविता तर निसटलीच होती. धन्यु.

राघव