बऱ्याच दिवसांनी लिहितोय, चूकभूल माफ असावी.
कोरोनामुळे बऱ्याच लोकांचं नुकसान देखील झालं आहे, त्यांची आवर्जून माफी मागतो.
कोरोना ची किंमत त्याला विचारा...
नव्याने पालक झालेल्या जोडप्याला जेव्हा त्यांच्या बाळाला शेकडो स्पर्श होत नाहीत आणि बाळाला हातात घेऊ नका हे म्हणण्याची वेळच येत नाही,
एका गरीब पोरीच्या बापाला जो पोरीच्या लग्नात कर्ज काढून हजारो लोकांना फुकट जेवू घालण्याच्या विचाराने सतत धास्तावलेला होता,
माझा कोणावाचून काही अडत नाही असं म्हणणाऱ्या क्वारंटाईन व्यक्तीला,
त्या कुटुंबाला ज्याचा कर्ता कोरोनाच्या आधी दिवसातले १२-१४ तास घराबाहेर होता,
दिवसातले १२ तास प्रदूषणात श्वास घेणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या फुफ्फुसाला,
शिकण्यासाठी शहरात येऊन शहरातच स्थायिक झालेल्या आणि लोकडाऊन मध्ये गावी जाऊन अडकलेल्या पाल्याच्या मात्या-पित्याला
कोरोनाच्या संकटात सारं जग हळहळतंय, पण त्यात सुद्धा मात्र काहींचं मन मनातल्या मनात सुखावतंय..
प्रतिक्रिया
14 Aug 2020 - 3:06 pm | Cuty
शहरात आपल्या मुलाबाळांसोबत निवांत रमलेल्या ,
आणि मेव्हणा, साडू , नंदा, जावा,जावई असा बिनकामाचा गोतावळा गावातच अडकलेल्या,
एखाद्या जोडप्याला विचारा!
हा:हा:
14 Aug 2020 - 7:04 pm | दुर्गविहारी
बातम्याकडे त्रयस्थ दृष्टीने पहाणे आणि स्वतः अनुभव घेणे यात नक्कीच फरक असणार. लवकरात लवकर हे संकट टळो.