खळाळत्या नदीतीरी सांज घेते ठाव

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जे न देखे रवी...
22 Nov 2008 - 9:25 am

संध्याकाळची वेळ होती.नदी खळाळत वहात होती.वीजा चमकत होत्या.राजा-राणी पल्याड जायला आतूर होती. पल्याडला त्या वटवृक्षाखाली त्यांच घरकूल होतं.आत्तांच परत येऊ अशा समजूतीने ती दोघं मुलाना एकटच सोडून नदीच्या अल्याड आली होती. भन्नाड वारं सुटलं होतं.
चमकत्या वीजेच्या प्रकाशात जेव्हा त्याना नाव दिसली तेव्हा केव्हा एकदा नावेत बसून नदी ओलांडून मुलाना भेटू अशी राणीला उत्कंठा लागली होती.

हे चित्र मनात आलं जेव्हा,
(हंसर्‍या)मुमुक्षुने एक ओळ दिली.
"खळाळत्या नदीतीरी सांज घेते ठाव"
आणि दुसरी ओळच काय ती लिहायला सांगितलं.
पण दुसरी ओळ लिहून झाल्यावर,ओळीवर ओळी आठवायला लागल्या त्याला काय करणार?.शेवटी कविताच जन्माला आली.

खळाळत्या नदीतीरी सांज घेते ठाव
लखलखत्या वीजेमुळे किनारी दिसे नाव
वल्हवतवल्हवत कधी जाउं या पल्ल्याड
सांग साजणा! कभिन्न रात्र येईल का रे आड

घन घन घटा जमूनी कोसळतील धारा
सजणा बिलगू देईना हा खट्याळ वारा
नको रे चंद्रा! लपू तू ढगा मागे
पडू दे लख्ख चांदणे अमुच्या मार्गे

आवर ग! सरिते आता तुझी खळखळ
होईना सहन अमुच्या बछड्यांची हळहळ
दिसू लागले अमुचे घरटे वटवृक्षा खाली
पिल्लाना गोंजारण्याची वेळ आता आली

श्रीकृष्ण सामंत

कविताविरंगुळा

प्रतिक्रिया

सर्किट's picture

22 Nov 2008 - 9:30 am | सर्किट (not verified)

पण दुसरी ओळ लिहून झाल्यावर,ओळीवर ओळी आठवायला लागल्या त्याला काय करणार?.शेवटी कविताच जन्माला आली.

काका, कविता छान जन्माला आली आहे.

हॉस्पिटलातून घरी आलात का ? ;-)

काळजी घ्या. सुरुवातीचे काही दिवस तरी ;-)

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

श्रीकृष्ण सामंत's picture

22 Nov 2008 - 11:58 am | श्रीकृष्ण सामंत

काय बाबा ?काका नको झालाय का?कुठल्या हॉस्पिटलची गोष्ट करतोयस?
तुझी तब्यत ठिक आहे ना?
अरे विम्याचे पैसे(हाप्ते) फुकट जात आहेत.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Nov 2008 - 9:44 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

पण दुसरी ओळ लिहून झाल्यावर,ओळीवर ओळी आठवायला लागल्या त्याला काय करणार?.शेवटी कविताच जन्माला आली.
कोणी कवितेला जन्म दिला. मला भलतेच काही संदर्भ आठवले सध्याच्या मिपावरच्या चर्चांवरुन! ;-)

श्रीकृष्ण सामंत's picture

26 Nov 2008 - 11:13 am | श्रीकृष्ण सामंत

अदिती,
जो तो आपआपल्या अक्कलेप्रमाणे चर्चा करतो.
तुझ्या प्रतिक्रिये बद्दल अभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

राघव's picture

24 Nov 2008 - 12:28 pm | राघव

आबा, ही कविता म्हणत होतात होय?
छान झालीये!
मुमुक्षु

श्रीकृष्ण सामंत's picture

25 Nov 2008 - 11:37 pm | श्रीकृष्ण सामंत

हीच कविता मी म्हणत होतो.आणि तुझीच ती कवितेतली पहिली ओळ जीने मला उरलेली कविता लिहायला प्रेरणा दिली. तुला कविता आवडली हे वाचून बरं वाटलं.प्रतिक्रिये बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com