पुस्तकांची मांदियाळी

Primary tabs

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture
डॉ. सुधीर राजार... in जनातलं, मनातलं
1 Aug 2020 - 2:06 pm

- डॉ. सुधीर रा. देवरे

अलीकडे प्रचंड प्रमाणात पुस्तकं प्रकाशित होत असतात. अगदी तालुक्याच्या ठिकाणी आणि गावागावातही रोज अनेक प्रका‍शन संस्था स्थापन होत असूनही त्या कमी पडतात म्हणून अनेक लेखक (लिहिणारा तो लेखक या अर्थाने) स्वखर्चाने आणि स्वत: स्थापन केलेल्या प्रकाशनाच्या नावाने पुस्तकं प्रकाशित करत आहेत. नक्की आकडा सांगता येत नसला तरी महाराष्ट्रात रोज कमीतकमी पंचवीस पुस्तकं प्रकाशित होत असावीत. या हिशोबाने महिण्याला सातशे पन्नास तर वर्षाला नऊ हजार पुस्तकं प्रकाशित होत असावीत. इतकी पुस्तकं कोणताही एक वाचक वाचू शकत नाही. एखाद्याने ही सगळी पुस्तकं वाचायचं ठरवलं व त्यासाठी दिवसातले चोवीस तास त्याने दुसरं काहीही काम केलं नाही तरी सगळी पुस्तकं आपल्या आयुष्यात वाचणं शक्य नाही.
एकदा एका लेखकाशी अपघाताने भेट झाली तेव्हा ते म्हणाले, ‘माझे आतापर्यंत फक्‍त पस्तीस पुस्तकं प्रकाशित आहेत.’ (कितीही मोठी रक्कम धनादेशावर लिहिताना ‘रूपये फक्‍त' हा शब्द लिहितात तसं या लेखकाने फक्‍त पस्तीस असं म्हटलं.) आपल्या दृष्टीने, बापरे पस्तीस पुस्तकं? आणि त्या लेखकाच्या दृष्टीने, फक्‍त पस्तीस पुस्तकं! तरीही अजून पर्यंत त्यांचं आणि त्यांच्या कोणत्याच पुस्तकाचं नाव वाचल्याचं आपल्याला आठवत नाही. त्यामुळे आपण वाचक म्हणून किती मागे आहोत हे लक्षात येतं. दिनांक १२-१२-२०१२ या दिवशी माझ्या एका मित्राने स्वखर्चाने एकदम बारा पुस्तकं प्रकाशित केलीत. त्या प्रकाशन समारंभाची आधी कार्यक्रम पत्रिका आणि नंतर फोन आला तेव्हा अगदी मनापासून त्या मित्राचं हार्दिक अभिनंदन केलं. एकाच वेळी बारा पुस्तकं प्रकाशित करणं म्हणजे त्या आधी बारा पुस्तकं लिहून काढणं हे एव्हरेष्ट शिखर सर करण्याइतकी ऊर्जा या मित्राने नक्कीच खर्च केली असावी, हे मनातून मान्य केलं.
दहा- बारा वर्षांपासून हळूहळू लिहून ठेवलेली आणि पाच वर्षांपासून एका प्रकाशकाकडे दिलेली माझी चार पुस्तकं एकदम अलीकडेच प्रकाशित झालीत, असं सांगायला सुध्दा संकोच वाटतो. संकोच यासाठी वाटतो, की एकाच वेळी चार पुस्तकं प्रकाशित होणं म्हणजे भविष्यातली आपली जबाबदारीही वाढलीच. या पार्श्वभूमीवर एकाच लेखकाची एकदम बारा पुस्तकं प्रकाशित होण्याची घटना एक रेकॉर्ड असेल हे नक्की.
अशा प्रचंड प्रमाणात साहित्य छापलं जात असेल तर मग वाचकाने काय करावं? कोणती पुस्तकं वाचावीत आणि कोणती वाचू नयेत हे त्याने कसं ठरवायचं? खरं तर हा प्रश्न वाचक म्हणून मलाच पडलेला आहे. म्हणून मी स्वत:ला एक शिस्त लावून घेतली. पुस्तक वाचण्याची एक प्राधान्यसूची मी तयार केली आहे. ती अशी:
एक: वाचलीच पाहिजेत अशी पुस्तकं.
दोन: एकदा वाचायला हरकत नाही अशी पुस्तकं.
तीन: वाचली नाहीत तरी चालेल अशी पुस्तकं.
अशा पध्दतीने एक आणि दोन क्रमांकाची पुस्तकं वाचत असतो. इथं इतर वाचकांनाही गृहीत धरून वरील तीन पर्याय सगळ्यांसाठी सुचवतो.
पुस्तकांची अशी यादी केली की वाचणं सोपं होईल हे खरं असलं तरी यासाठी निकष कोणता लावायचा हा सुध्दा यक्ष प्रश्न आहेच. कोणती पुस्तकं वाचावीत आणि कोणती वाचू नयेत, हे कोणाला विचारावं हे त्यापेक्षा कठीण.
(ब्लॉगवर टाकण्यासाठी हा लेख 2013 सालीच लिहून ठेवलेला. अद्याप अप्रकाशित. लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

© डॉ. सुधीर रा. देवरे
ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

वाङ्मयलेख

प्रतिक्रिया

कंजूस's picture

2 Aug 2020 - 6:34 am | कंजूस

पुस्तकं
वाचण्याची एक प्राधान्यसूची
-काही वाचनालयांत (नपाच्या सार्वजनिक किंवा खासगी) स्वत: एकेक पुस्तक पाहून ,चाळून घेण्याची सोय ठेवतात तेव्हा काम फार सोपे होते.
साहित्य संमेलनांत तर प्रचंड पुस्तकं बघण्यासाठी ठेवलेली असतात. ती उघडून पाहता येतात.
पुस्तक विकत घेताना ते संदर्भ असणारे, वारंवार पाहावे लागणारे असेल तरच विकत घेतो. बहुसंख्य मराठी कादंबऱ्या विकत घेण्याचा काहीच उपयोग नसतो. कारण चार दिवसांत वाचून झाल्यावर रद्दी. इंग्रजी विकल्या जातात.
कोणती पुस्तकं वाचावीत आणि कोणती वाचू नयेत, हे कोणाला विचारावं हे त्यापेक्षा कठीण.
वर्तमानपत्रे नव्या पुस्तकांच्या समीक्षा शनिवारी रविवारी देतात. त्यात दोन तीन मोठ्या, आणि दोनतीन उल्लेख असतात. त्यातून विषय आणि वाचावे का नाही कळायला मदत होते.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

2 Aug 2020 - 10:45 am | डॉ. सुधीर राजार...

सविस्तर प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

एक सोपा मार्ग वापरतो - पुस्तकांच्या शक्यतो ebook अथवा डिजिटल आवृत्ती घेतो, आणि आधी नमुना पाने वाचून मग घेतो. एकदा वाचून झाले की पुस्तक ठेवण्याची कटकट नाही. तशी शक्यतो गाजलेली पुस्तकेच लोक ebook आवृत्ती म्हणून टाकतात, त्यामुळे पुस्तकांची निवड करण्याची एक पायरी थोडीफार वाचते.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

2 Aug 2020 - 10:47 am | डॉ. सुधीर राजार...

आजच्या काळात हे बरोबर आहे. धन्यवाद.

फक्त फ्री डाउनलोड घेतो. ती सुद्धा खूप आहेत।

राघव's picture

2 Aug 2020 - 10:22 am | राघव

मी पण.

पण बरीचशी पीडीएफ असतात. किंडल अ‍ॅप वर वापरायचे तर त्यांना कन्वर्ट करावे लागते अन् ते दर वेळेस नीट होईलच असे नाही.
उदा. फाँट कमी-जास्त केला तर पान स्क्रोल करावे लागते. त्यात मजा नाही.
त्यामुळे कोणत्याही पीडीएफ ला किंडल फॉरमॅट मधे योग्य पद्धतीनं कन्वर्ट करून मिळेल, असे कोणते सॉफ्टवेअर माहित असल्यास सांगावे.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

2 Aug 2020 - 10:50 am | डॉ. सुधीर राजार...

फॉंट परावर्तीत मात्र होऊ शकतो.

शा वि कु's picture

2 Aug 2020 - 5:13 pm | शा वि कु

प्रॉपर इ बुक फॉरमॅट असेल (.azw, .mobi, .epub वगैरे) तर कॅलिबर अत्यंत उपयोगी आहे. किंवा थेट ऑनलाइन कन्व्हर्ट करणाऱ्या बऱ्याच साईट्स आहेत.

पीडीएफ असेल तर कन्व्हर्जन पेक्षा रिसायझिंग करायचं, म्हणजे ते विचित्र स्क्रोल करायला लागत नाही. मोबाईल वर वाचण्यासाठी मून रीडर किंवा अडोबे आहेत, त्यात टेक्स्ट रिफ्लो सुविधा असते, काम होऊन जातं.

किंडलवर वाचण्यायोग्य पीडीएफ कन्व्हर्जन साठी के2पीडीएफओप्ट नावाचं सॉफ्टवेअर आहे.
यात अर्थात स्कॅन पाने असलेल्या पीडीएफ वर काही उपाय नाही. पण टेक्स्ट असलेली कोणतीही फाईल किंडलवर येनकेन प्रकारे किंडलवर निवांतपणे उघडता येते.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

3 Aug 2020 - 10:58 am | डॉ. सुधीर राजार...

छान माहिती

राघव's picture

3 Aug 2020 - 12:11 pm | राघव

अरे वाह! हे छान आहे. करूण बघतो. :-)

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

2 Aug 2020 - 10:48 am | डॉ. सुधीर राजार...

छान

विजुभाऊ's picture

2 Aug 2020 - 2:06 pm | विजुभाऊ

मध्यंतरी एक वर्कशॉप केले
यात त्यांनी एका महिन्यात पुस्तक कसे लिहून प्रकाशीत करायची याचे शिक्षण दिले होते.
बहुतेक वेळा सेल्फ हेल्प बुक्स अशा पद्धतीने लिहीली आणि प्रकाशीत केली जातात.
इंटरनेट मुळे माहिती मिळवण्यात बरीच सुलभता आलेली आहे.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

3 Aug 2020 - 10:57 am | डॉ. सुधीर राजार...

नवीन माहिती

रीडर's picture

2 Aug 2020 - 4:12 pm | रीडर

PDF पुस्तकांसाठी कृपया लिंक देऊ शकाल का? ही कॉपीराईट संपलेली पुस्तके असतात न?

प्रोजेक्ट गटेनबर्ग
पूर्णपणे मोफत आणि पूर्णपणे कायदेशीर.

राघव's picture

3 Aug 2020 - 12:17 pm | राघव

एक नंबर! धन्यवाद!

रीडर's picture

2 Aug 2020 - 9:40 pm | रीडर

धन्यवाद
मराठी पुस्तके आहेत का इथे पाहीन