कथा: त्रिकोणाचे तिन कोन

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
19 Jul 2020 - 2:31 pm

विषय मराठी युवकभारती (प्रथम भाषा), इयत्ता: बारावी

महाराष्ट्रीय राज्य पाठ्यपुस्तक अवलोकन व टिप्पणी संशोधीत खाजगी मंडळ, पुणे-१२
अशासन निर्णय क्रमांक - नअभ्यास-१२१३/ (प्रअ ८६२) एएसडीएफ/४ दिनांक ३१/०४/२० अन्वये विस्थापन करण्यात आलेल्या समितीच्या दिनांक ३०/०२/२० रोजीच्या बैठकीत हा पाठ या अशैक्षणीक (कोरोना काळ) वर्षापासून निर्धारीत करण्यात येत आहे.

विद्यार्थी तसेच शिक्षकांसाठी सुचना: सदर पाठ आपल्या स्मार्ट फोनमधील दक्षशिक्ष या अ‍ॅपद्वारे पाठावरील क्यू. आर. स्कॅनरद्वारे स्कॅन केल्यास अध्यापनास उपलब्ध आहे.

पाठ क्रमांक: ५ - कथा: अधांतरी त्रिकोण ले. पाषाणभेद (जन्मतिथी उपलब्ध नाही ते मृ. शके १६६१ किंवा ६२)

=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=

अप्रसिद्ध समिक्षक, विनोदी लेखक, कवी, टिकाकार, प्रतिसाद लेखक. लहाणपणापासूनच ते आंतरजालावर लेखन करत असत. तेथील टिका वाचून टिकाकार झाले. विविध वाडःमयप्रकार हाताळले. इतर टिकाकारांना तोंड दिले. पाभेचा चहा, युगलगीतः बाई इथंच ठोकू का हा खिळा?, मुक्त'पिठीय' लेख: अमेरीकेचे राष्ट्रप्रेम आदी असंख्य लेख आंतरजालावर प्रसिद्ध. द्वितीय आंतरआकाशगंगा मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद भुषविले.

प्रस्तूत पाठात लेखकाने बालपण ते तरुणपणाचे चित्र रेखाटले आहे. कथानायक आपल्या अभ्यासाकडे लक्ष देवून इतर सर्व गुण आपल्या अंगी कसे बाणवत होता याचे विवेचन केले आहे. मैत्री, कष्ट, चांगला स्वभाव, खिलाडू वृत्ती, गरीबांविषयी- सर्व धर्मांविषयी कणव आदी गुण कथानायकात विषद होतात. आजच्या युवकांमध्ये हे गुण अंगी बाणावेत ह्या उद्दात्त हेतूने प्रस्तूत पाठ लिहीला आहे असे लेखकाने आम्हास खाजगी बैठकीत सांगितलेले आहे.
=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=

कथा: अधांतरी त्रिकोण

माझे नाव अमृत. आमचा मालेगावला कापडाचा कारखाना होता. निरनिराळ्या प्रकारचे कापड त्यात तयार होत असे. गावाच्या बाहेर मोठी जागा असल्याने आमचा कारखाना तेथे होता. गावात राहण्यापेक्षा आम्ही कारखान्याच्या आवारातच राहत असू. तेथे आमचा बंगला होता. बंगल्यातल्या वरच्या मजल्यावर माझी खोली होती. तेथेच मी अभ्यास करत असे. एखाद्या वेळी तेथे अभ्यासाला रहिम येत असे. अभ्यास करण्याऐवजी आम्ही मस्तीच जास्त करत असू. बंगल्याच्या बाजूची चिंच आणि जांभळाचे झाड टेरेसच्या उंचीची असल्याने आम्ही ती फळे पाडण्याचा प्रयत्न करत असू. आम्हाला ते जमत नसे. मग आमचे माळी काका लांब बांबूला आकडा लावून आम्हाला चिंच आणि जांभळे काढून देत.

एका बाजूला असलेल्या कारखान्याच्या मोठ्या पटांगणाच्या बाजूला काही कामगारांची घरे होती. त्या घरांत मोजके, जे गरजू कामगार होते त्यांचीच राहण्याची सोय वडीलांनी केलेली होती. इतर कामगार आसपासच्या वस्त्यांमधून येत. कामगार आणत असलेल्या सायकलीपैकी लहान सायकल घेवून मी ती चालवायला तेथेच शिकलो. मैदानात मी आणि कामगारांची मुले खेळत असू. आताच्यासारखा अभ्यास तेवढा काही नव्हता. तेव्हा मी काय असेल सहावी सातवीत. दुपारी बारापर्यंत शाळा सुटली की पूर्ण संध्याकाळपर्यंत आम्ही निरनिराळे खेळ खेळत असू. पकडापकडी, चोर पोलीस आदी खेळण्यासाठी किंवा लपण्यासाठी कारखाना आणि आमचा बंगला तेथील विस्तीर्ण पटांगण अगदी योग्य जागा होती. त्यात करीमचाचा यांचा मुलगा असलेला रहिम आणि वडीलांविना पोरकी झालेली देवीका हमखास असे. तसे आम्ही तिघेही एकाच वयाचे होतो. देवीकाला आम्ही सारे देवू म्हणत असू. तिची आई आणि मावशी आमच्याच कारखान्यात रंगकाम करणार्‍या विभागात काम करत असत.

मधूनच आम्हाला आठवण झाली की आम्ही कारखान्यात चक्कर मारत असू. आम्हाला तेथे पाहून वडील रागवत. कारखाना म्हटला की तेथे रांगेने यंत्रमाग, कापडाची रिळे, दोर्‍यांच्या बॉबीन्स आदी सामान पसरलेले असायचे. एकदा एक नवे मशीन कारखान्यात आणले आणि ते बसवतांना अपघात होवून करीमचाचा जायबंदी झाले. त्यांचा डावा पाय अधू झाला. त्या अपघातानंतर ते कुबडी घेवून कारखान्यात हलके काम करायचे किंवा मेन गेटवर आल्या गेल्या मालाची नोंद ठेवायचे. कारखान्यातल्या वजन काट्यावर आम्ही वजन करणे, त्यात बसून झोका खेळणे आदी करत असू. मी मालकाचा मुलगा असल्याने कुणी हरकत घेत नसे. पण आता ते सारे आठवले की हसू येते. आम्हा लहान मुलांबरोबर नशीबाने कोणताही अपघात झाला नाही.

आमचा कारखाना एक प्रकारचे मोठे कुटूंबच होते. दिवाळीच्या दिवसांत फटाक्यांची रेलचेल असे. वडील हौसेने फटाके आणत आणि आम्ही लहान वयाची मुले फटाके फोडण्यास संध्याकाळपासून सुरूवात करत असू. रहिम तसा धिट होता. तो लहान फटाके हातामध्ये वात पेटवून फेकत असे. देवू तशी भित्री अन भोळी असल्याने तो नेमका तिच्या बाजूलाच फटाके फोडत असे. ते पाहून देवूची आई त्याला रागवे. मग मात्र तो पण शांतपणे इतर ठिकाणी फटाके फोडत असे.

ईदच्या दिवशी रहिमची आई, अमीनाबी, आम्हाला घरी खिरखुर्मा पाठवत असे. मला मात्र त्यांच्या घरीच तो खायला आवडत असे. ईदच्या दिवशी त्यांच्या चाळीतील अनेक कुटूंबे तेथे आलेली असत. तेव्हा खिरखुर्मा सगळ्यांना देतांना तिची बिचारीची धांदल उडत असे. एकतर खिरखुर्मासाठी काचेच्या वाट्या कमी पडत आणि त्यात लोकांची गर्दी. मग माझी आई स्वत:च कपाटातून काचेच्या वाट्या घेवून येई आणि रहिमच्या आईला मदत करत असे. आज मी मोठा झालो असलो आणि इतर ठिकाणी खिरखुर्मा खाल्लेला असला तरी त्या वेळच्या खिरखुर्म्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे. तशी चव त्यानंतर कधीही चाखायला मिळालेली नाही.

गणपतीच्या दिवसात रहिमचाचा मातीचा गणपती तयार करत असत. त्यांच्या हातात कला होती. दरवर्षी ते नव्या पद्धतीचा गणपती बनवत. मला आठवते, मी नववीत असतांना माझ्या आग्रहामुळे त्यांनी त्या वर्षी झुल्यावरचा गणपती केला होता. त्यांनी कारखान्यातले सामान वापरून तो झुला हलता केला होता. तो इतका आकर्षक झाला होता की तो देखावा पहायला अगदी सोयगाववरूनही लोक आले होते.

या दरम्यान आम्ही लहान मुले मोठी झाले होतो. दहावीला मला चांगले गुण मिळाले. आई तर अगदी आनंदून गेली होती. देवूला तर माझ्यापेक्षा कितीतरी अधीक गुण मिळाले होते. हुशारच होती ती. रहिम मात्र कमी गुण मिळाले म्हणून नाराज झाला होता. तसे त्याचे गुणही काही कमी नव्हते. चांगले ६२% होते ते. आणि गणितात तर त्याला दिडशे पैकी थोडेथोडके नव्हे तर १३५ गुण मिळाले होते. बिचार्‍याने इंग्रजीत मार खाल्ला होता.

माझा मोठा भाऊ अरिहंत हा वडीलांबरोबर कारखान्याचे काम बघत असल्याने मी सुद्धा कारखाना सांभाळण्याच्या कामाला आईचा तिव्र विरोध होता. मी शिकून काहीतरी वेगळे करावे अशी तिची इच्छा होती. तिच्या माहेरी, माझा मामाचा मुलगा पारस हा सीए झालेला होता. मी पण सीए च करावे असे त्याने आईला भरवलेले होते. सीए केले तर पुढे मी मोठा झाल्यावर कारखान्याच्या व्यापाला उपयोगात येईल असे त्याने वडीलांना सांगितले होतेच. आता आमचे अजून दोन कारखाने गावाच्या जवळ असणार्‍या एमआयडीसीत झाल्याने कामाचा ताणही वाढलेला होता. झालाच तर फायदाच होणार असल्याने माझी सीए होण्यास वडीलांची काहीच हरकत नव्हती. आईला देखील मी काहीतरी वेगळे करण्याचे समाधान लाभत होते.

या सर्व कारणांमुळे टीएनजे कॉलेजमध्ये मी कॉमर्समध्ये प्रवेश घेतला. माझ्याच वर्गात देवीकाही होती. रहिमने सायन्सला प्रवेश घेतला. त्याचा माझा वर्ग आता वेगळा झालेला होता.

लहाणपणापासून देवीका माझ्या सोबत असल्याने तिच्याकडे मी काहीसा आकर्षित झालेलो होतो. रहिमलादेखील ती आणि तिलाही रहिम आवडत असावा असे मला वाटायचे. एक दोन वेळा मी त्यांना एकत्र बघून रहिमचा मला राग आलेला होता. देवू मात्र माझ्या वर्गात असल्याने मला तिच्याबरोबर जास्त वेळ राहता येत असे. आम्ही दोघेही माझ्या स्कुटरवरून कॉलेजला जात असू. तिचा आणि माझा खाजगी क्लास एकच होता. देवू आणि मी जास्तीत जास्त वेळ एकत्रच राहत असू. कॉलेजमध्ये वर्गमित्र आम्हाला एकमेकांच्या नावाने बोलवून चेष्टादेखील करत असत. तिच्या मनात काय आहे याचा मला पत्ता नव्हता. बरे, ती मला आवडते म्हणजे ते प्रेमच आहे असे मला वाटत नव्हते. मुख्य म्हणजे ती अभ्यासू होती. गरीबी जवळून पाहिली असल्याने तिला अभ्यासाचे महत्व पहिल्यापासुन पटलेले होते. त्यात बारावीचे वर्ष म्हणजे मोठा अभ्यास होता. शिकून तिला प्राध्यापक व्हावेसे वाटते असे तिने मला कित्येकदा सांगितलेले होते.

रहिम त्याच्या प्रॅक्टीकल्स आणि कॉलेज, क्लासमधून जेव्हा वेळ मिळे तेव्हा आमच्या मिसळे. जेव्हा जेव्हा ती रहिमशी बोले तेव्हा माझ्या मनात आक्रंदन सुरू होई. त्यांची घरेही आजूबाजूलाच असल्याने ते दोघेही माझ्या व्यतिरीक्त एकत्र असत. रहिम जरी माझा मित्र होता तरी देवीकेच्या बाबतीत त्याची मला असूया वाटत असे. देवीकाने केवळ माझ्याशीच बोलावे असे मला वाटे. मी मोठ्या घरातला आणि ती एका सामान्य घरातली असल्याने ती मला आपल्या प्रेमाबद्दल हो म्हणणार नाही असेही मला मनात वाटे. या लहान मोठेपणाच्या समजानेच ती रहिमशी मैत्री राखून असावी असेही एक मन म्हणत असे.

बारावीची परीक्षा संपली. आम्हा दोघांना चांगलेच गुण मिळाले होते. आम्ही दोघांनी रितसर त्याच कॉलेजध्ये पदवीसाठी प्रवेश घेतला. रहिमला इंजिनीअरींगच्या सीईटी परिक्षेत उत्तम गुण मिळाल्याने पुण्याच्या गव्हर्नमेंट कॉलेजला प्रवेश मिळाला. करीमचाचा तर एकदम आनंदून गेले होते. त्याला होस्टेलवर सोडायला मी त्याच्याबरोबर पुण्याला गेलो असतांना रहिमने त्याचे मन मोकळे केले. देवीकाबद्दल माझे जसे प्रेम होते तसेच त्याचेही देवीकावर प्रेम होते. मी जसे तिला माझ्या प्रेमाबद्दल विचारू शकलो नाही तसे त्यानेही तिला कधी विचारले नव्हते की तसे भासू दिले नव्हते. देवू त्याच्याबद्दल किंवा माझ्याबद्दल असलाच विचार करत असेल याची त्यालाही खात्री नव्हती. मी त्याला होस्टेलवर सोडून निघालो तेव्हा तो हमसून हमसून रडला. देवू बद्दल तो जास्तच भावनाशील होता. मी देखील माझे देवूबद्दलचे मत त्याला सांगितले. प्रेमात गरीब श्रीमंत असला प्रकार नसतो याबद्दल तो मला अन मी त्याला खात्री देत होतो.

रहिमला सोडून मी गावी परतलो. माझे आणि देवूचे कॉलेज सुरू झाले. ती आता माझ्याबरोबर कॉलेजला येत नसे. परंतु आमचे नेहमीसारखे सरळ आयुष्य चालू झाले. रहिम जरी तेथे नव्हता तरी देवू काही त्याच्याबद्दल बोलत नव्हती. त्यांचा संपर्क आता होत नव्हता. त्याच्याबद्दल ती माझ्याकडे चौकशी करत नव्हती. माझ्याशी ती हसून खेळून राहत असे. कॉलेजमधल्या अभ्यासाविषयी गप्पा मारत असे. मैत्रीच्या पलिकडे बोलायला ती चुकूनही तयार नसे.

त्यावर्षी बाहेर पाऊस पडत होता. देवू अन तिची आई पावसात भिजत आमच्या घरी आल्या. देवूच्या आईने देवूचे लग्न ठरल्याची बातमी दिली. नवरा मुलगा त्यांच्याच समाजातला, सरकारी नोकरीत, पीडब्ल्यूडीत वरिष्ठ इंजिनीअर या पदावर होता. मुख्य म्हणजे तो देवूला पुढे शिकायला मदतही करणार होता. तिच्या एकंदरीत वर्तवणूकीवरून ती अगदी आनंदी भासत होती. माझ्या आईने साखर भरवून तिचे तोंड गोड केले. मला तर तो एक धक्काच होता.

त्या वर्षीच्या दिवाळीनंतर लगेचच देवूचे लग्न मुलाच्या गावीच लागणार होते.

फटाक्यांविना त्या वर्षीची माझी दिवाळी मात्र सुन्न होती.

+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=
स्वाध्याय कृती
+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=

१) कृती करा.

(१) कथानायकाने सांगितलेल्या लहाणपणाच्या गमती: अ) ________________ आ) ______________
(२) कथेतील मुलगा खेळत असलेले खेळ: अ) ________________ आ) ______________
(३) कथेतील तिन पात्रे: अ) ________________ आ) ______________इ)______________

२) खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा.
(१) माळी काका लांब बांबूला आकडा लावून पैसे काढून देत असत.
(२) त्या वेळच्या खिरखुर्म्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे.
(३) गणपतीच्या दिवसात करिमचाचा मातीचा गणपती तयार करत असत. त्यांच्या हातात कला होती.
(४) देवूच्या आईने देवूचे लग्न ठरल्याची बातमी दिली.

३) थोडक्यात उत्तरे लिहा.
(१) अमृत रहिमला होस्टेलमध्ये सोडायला का गेला होता?
(२) देवीका आनंदात का होती?
(३) देवीका अन तिची आई लग्नाची बातमी सांगायला अमृतच्या घरी का गेल्या?

४) दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडून गाळलेल्या जागा पुन्हा भरा.
(१) देवीकाबद्दल माझे जसे ______ होते तसेच त्याचेही देवीकावर _______ होते. (अभ्यास, प्रेम, मन)
(२) आम्ही दोघेही माझ्या _________ कॉलेजला जात असू. (सायकल, स्कूटर, कार)
(३) देवू तशी भित्री अन _______ असल्याने तो नेमका तिच्या बाजूलाच फटाके फोडत असे. (अभ्यासू, कष्टाळू, भोळी)

५) व्याकरण

(अ) खालील वाक्यांचा प्रकार ओळखून लिहा.
(१) कारखाना म्हटला की तेथे रांगेने यंत्रमाग, कापडाची रिळे, दोर्‍यांच्या बॉबीन्स आदी सामान पसरलेले असायचे.
(२) मला तर तो एक धक्काच होता.

(आ) खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समासाचे नाव लिहा.
(१) भोळीभाबडी
(२) पटांगण

६) स्वमत
(अ) "फटाक्यांविना त्या वर्षीची माझी दिवाळी मात्र सुन्न होती", या विधानाबाबत तुमचे मत सविस्तर लिहा.
(आ) "तिच्या एकंदरीत वर्तवणूकीवरून ती अगदी आनंदी भासत होती.", या वाक्याचा तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा.

७) उपक्रम
पस्तुत पाठात आलेल्या इंग्रजी शब्दांची यादी करा. त्यासाठी वापरले जाणारे मराठी शब्द लिहा.

८) तोंडी परीक्षा
'माझ्या जीवनातील आनंदाचे क्षण' या विषयावर पाच मिनीटांचे भाषण सादर करा.

- पाषाणभेद
१९/०७/२०२०

कथासद्भावना

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

19 Jul 2020 - 6:23 pm | पाषाणभेद

विषय मराठी युवकभारती (प्रथम भाषा), इयत्ता: बारावी

महाराष्ट्रीय राज्य पाठ्यपुस्तक अवलोकन व टिप्पणी संशोधीत खाजगी मंडळ, पुणे-१२
अशासन निर्णय क्रमांक - नअभ्यास-१२१३/ (प्रअ ८६२) एएसडीएफ/४ दिनांक ३१/०४/२० अन्वये विस्थापन करण्यात आलेल्या समितीच्या दिनांक ३०/०२/२० रोजीच्या बैठकीत हा पाठ या अशैक्षणीक (कोरोना काळ) वर्षापासून निर्धारीत करण्यात येत आहे.

विद्यार्थी तसेच शिक्षकांसाठी सुचना: सदर पाठ आपल्या स्मार्ट फोनमधील दक्षशिक्ष या अ‍ॅपद्वारे पाठावरील क्यू. आर. स्कॅनरद्वारे स्कॅन केल्यास अध्यापनास उपलब्ध आहे.

पाठ क्रमांक: ५ - कथा: अधांतरी त्रिकोण ले. पाषाणभेद (जन्मतिथी उपलब्ध नाही ते मृ. शके १६६१ किंवा ६२)

=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=
अप्रसिद्ध समिक्षक, विनोदी लेखक, कवी, टिकाकार, प्रतिसाद लेखक. लहाणपणापासूनच ते आंतरजालावर लेखन करत असत. तेथील टिका वाचून टिकाकार झाले. विविध वाडःमयप्रकार हाताळले. इतर टिकाकारांना तोंड दिले. पाभेचा चहा, युगलगीतः बाई इथंच ठोकू का हा खिळा?, मुक्त'पिठीय' लेख: अमेरीकेचे राष्ट्रप्रेम आदी असंख्य लेख आंतरजालावर प्रसिद्ध. द्वितीय आंतरआकाशगंगा मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद भुषविले.

प्रस्तूत पाठात लेखकाने बालपण ते तरुणपणाचे चित्र रेखाटले आहे. कथानायक आपल्या अभ्यासाकडे लक्ष देवून इतर सर्व गुण आपल्या अंगी कसे बाणवत होता याचे विवेचन केले आहे. मैत्री, कष्ट, चांगला स्वभाव, खिलाडू वृत्ती, गरीबांविषयी- सर्व धर्मांविषयी कणव आदी गुण कथानायकात विषद होतात. आजच्या युवकांमध्ये हे गुण अंगी बाणावेत ह्या उद्दात्त हेतूने प्रस्तूत पाठ लिहीला आहे असे लेखकाने आम्हास खाजगी बैठकीत सांगितलेले आहे.
=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=

पाषाणभेद's picture

19 Jul 2020 - 6:25 pm | पाषाणभेद

+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=
स्वाध्याय / कृती
+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=

१) कृती करा.

(१) कथानायकाने सांगितलेल्या लहाणपणाच्या गमती: अ) ________________ आ) ______________
(२) कथेतील मुलगा खेळत असलेले खेळ: अ) ________________ आ) ______________
(३) कथेतील तिन पात्रे: अ) ________________ आ) ______________इ)______________

२) खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा.
(१) माळी काका लांब बांबूला आकडा लावून पैसे काढून देत असत.
(२) त्या वेळच्या खिरखुर्म्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे.
(३) गणपतीच्या दिवसात करिमचाचा मातीचा गणपती तयार करत असत. त्यांच्या हातात कला होती.
(४) देवूच्या आईने देवूचे लग्न ठरल्याची बातमी दिली.

३) थोडक्यात उत्तरे लिहा.
(१) अमृत रहिमला होस्टेलमध्ये सोडायला का गेला होता?
(२) देवीका आनंदात का होती?
(३) देवीका अन तिची आई लग्नाची बातमी सांगायला अमृतच्या घरी का गेल्या?

४) दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडून गाळलेल्या जागा पुन्हा भरा.
(१) देवीकाबद्दल माझे जसे ______ होते तसेच त्याचेही देवीकावर _______ होते. (अभ्यास, प्रेम, मन)
(२) आम्ही दोघेही माझ्या _________ कॉलेजला जात असू. (सायकल, स्कूटर, कार)
(३) देवू तशी भित्री अन _______ असल्याने तो नेमका तिच्या बाजूलाच फटाके फोडत असे. (अभ्यासू, कष्टाळू, भोळी)

५) व्याकरण

(अ) खालील वाक्यांचा प्रकार ओळखून लिहा.
(१) कारखाना म्हटला की तेथे रांगेने यंत्रमाग, कापडाची रिळे, दोर्‍यांच्या बॉबीन्स आदी सामान पसरलेले असायचे.
(२) मला तर तो एक धक्काच होता.

(आ) खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समासाचे नाव लिहा.
(१) भोळीभाबडी
(२) पटांगण

६) स्वमत
(अ) "फटाक्यांविना त्या वर्षीची माझी दिवाळी मात्र सुन्न होती", या विधानाबाबत तुमचे मत सविस्तर लिहा.
(आ) "तिच्या एकंदरीत वर्तवणूकीवरून ती अगदी आनंदी भासत होती.", या वाक्याचा तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा.

७) उपक्रम
पस्तुत पाठात आलेल्या इंग्रजी शब्दांची यादी करा. त्यासाठी वापरले जाणारे मराठी शब्द लिहा.

८) तोंडी परीक्षा
'माझ्या जीवनातील आनंदाचे क्षण' या विषयावर पाच मिनीटांचे भाषण सादर करा.

पाषाणभेद's picture

19 Jul 2020 - 6:39 pm | पाषाणभेद

प्रस्तूत पाठ हा लेखकांनी लिहीलेला असल्याने "राज्य पाठ्यपुस्तक अवलोकन व टिप्पणी संशोधीत खाजगी मंडळ, पुणे-१२" यातील लेखनात बदल करू शकत नाही. लेखकांनी लिहीलेल्या मतांविषयी लेखकच सहमत नसल्याने पाठ्यपुस्तक अवलोकन व टिप्पणी मंडळदेखील सहमत नाही.
पाठ्यपुस्तकात लेखकाने जसा लेख उपलब्ध करवून दिला आहे तसा आम्ही छापला आहे. यात काही बदल करणे मंडळाला शक्य नाही. तसेच यात काही तृटि असल्यास मंडळ त्यास जबाबदार नाही.

विजुभाऊ's picture

20 Jul 2020 - 9:55 am | विजुभाऊ

की दारूण शुंदोर कोथा आछी दादा.
खूब भॉलो

प्रचेतस's picture

20 Jul 2020 - 11:55 am | प्रचेतस

मस्त

दुर्गविहारी's picture

21 Jul 2020 - 4:10 pm | दुर्गविहारी

मस्तच लिहिली आहे कथा ! :-)

चौथा कोनाडा's picture

21 Jul 2020 - 8:19 pm | चौथा कोनाडा

भारी कथा ! आवडली !
झकास प्रयोग केलाय प्रतिसादांमम्ध्ये !