माझ्या क्षणभंगुर कवितेवर
प्रतिसाद देणार्या क्षमाशील वाचकांनो,
या कवितेच्या शवपेटीवर मी शेवटचा खिळा ठोकेन.
धन्यवादाचा.
अन् मग
विस्मृतीच्या विस्कळखाईत कायमची दफनल्यावर
ह्या कवितेचं
काळंशार मायाळू खत होवो.
अन् मग
उपेक्षेच्या झळा सोसून,
दुर्बोधतेचे आरोप झेलून,
कोमेजलेली
कुण्या प्रतिभावंताची अस्सल कविता
त्या खतावर
पुन्हा जीव धरून तरारो.
अन् मग
विचक्षण वाचकांनो,
त्या बावनकशी कवितेचं असणं,
गारूड टाकणं,
अस्वस्थ करणारे
प्रश्न पाडणं,
सारं सारं
तुमच्यात
अनिर्बंध साथीसारखं
पसरत जावो.
प्रतिक्रिया
3 Jul 2020 - 8:19 pm | प्राची अश्विनी
कमाल!!!
3 Jul 2020 - 9:10 pm | गोंधळी
कडक.
3 Jul 2020 - 9:21 pm | रातराणी
अप्रतिम!
3 Jul 2020 - 10:08 pm | ज्ञानोबाचे पैजार
इथे वेगाने साथ पसरते आहे
पैजारबुवा
17 Jul 2020 - 6:11 pm | मन्या ऽ
अप्रतिम!!
18 Jul 2020 - 6:32 pm | चांदणे संदीप
आज खूप दिवसानंतर एकाहून एक सरस लेखन वाचायला मिळाले, त्यातले हे अव्वल रत्न.
अनंत यात्री, जियो!
सं - दी - प
21 Jul 2020 - 10:42 pm | सत्यजित...
.......