हिशोब

उपटसुंभ's picture
उपटसुंभ in जे न देखे रवी...
20 Nov 2008 - 12:42 pm

कर्जाचे अन कर्जमाफीचे ओघ ठेवले.
दान दिले पण परताव्याचे योग ठेवले.

पाणी आता साधन झाले लढण्यासाठी,
पिण्यास बाकी पेप्सी आणि कोक ठेवले.

दर रविवारी संस्कृतिरक्षण पुरले नाही.
रोज पार्वती अन तुलसीचे “सोप” ठेवले.

विचार मांडायाला त्यांनी दिली मुभा पण,
छातीवरती तलवारीचे टोक ठेवले.

देवा तुजला नवसाचा बघ चेक फाडला.
गार्‍हाणे मी मात्र आपुले “रोख” ठेवले.

चित्रगुप्तही मला म्हणाला कमाल झाली.
हिशोब होते मीही ऐसे “चोख” ठेवले..!

– अभिजीत दाते

गझलविचार

प्रतिक्रिया

राघव's picture

20 Nov 2008 - 1:04 pm | राघव

नेहमीप्रमाणेच छान गझल!

विचार मांडायाला त्यांनी दिली मुभा पण,
छातीवरती तलवारीचे टोक ठेवले.

देवा तुजला नवसाचा बघ चेक फाडला.
गार्‍हाणे मी मात्र आपुले “रोख” ठेवले.

हे अगदी खास!

मुमुक्षु

दत्ता काळे's picture

20 Nov 2008 - 1:15 pm | दत्ता काळे

देवा तुजला नवसाचा बघ चेक फाडला.
गार्‍हाणे मी मात्र आपुले “रोख” ठेवले.

- वा, वा, फार सुंदर

लिखाळ's picture

20 Nov 2008 - 7:03 pm | लिखाळ

वा वा गजल आवडली..
नवसाचा चेक मस्तच ! :)
-- लिखाळ.

कपिल काळे's picture

20 Nov 2008 - 8:47 pm | कपिल काळे

विचार मांडायाला त्यांनी दिली मुभा पण,
छातीवरती तलवारीचे टोक ठेवले.

वा वा सुंदर गझल. मिपावर पण सध्या असे आमच्या छातीवर टोक ठेवलेले आहे

http://kalekapil.blogspot.com/

मदनबाण's picture

21 Nov 2008 - 5:22 am | मदनबाण

छान गझल...

मदनबाण.....

हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर

मनीषा's picture

21 Nov 2008 - 12:35 pm | मनीषा

आवडली
विचार मांडायाला त्यांनी दिली मुभा पण,
छातीवरती तलवारीचे टोक ठेवले. ... छानच