नाद सोड यमकाचा लेका, वजन विचारा देशील का ?
पुरे शब्दांची कारागिरी, अन आतुन येई ते लिहीशिल का ?
मुखड्याच्या दो शब्दांची, दोरी तू ओढसी किती ?
शब्दांचे भरताडच होते, भाव दाटला त्यात किती ?
सुखे बैसुनी गादीवरती, कविता जन्मा येत नसे !
पांघरुन वेदनेचे जगणे, दु:खाचे लागेल उसे !
-- आपला दळण छाप
लहरी सागर