प्रतिसाद वाद विवाद संवाद

३_१४ विक्षिप्त अदिती's picture
३_१४ विक्षिप्त अदिती in जनातलं, मनातलं
19 Nov 2008 - 8:01 pm

या काव्यासाठी प्रेरणा
{आधीच अवांतरः}हे विडंबन नाही{अवांतर संपलं}

हे जीवन आहे नश्वर हे जगत आहे नश्वर
आधार एकच असतो नाम त्याचे (विसोबा) खेचर
आयई असो वा फाफॉ क्लिक मिपालाच मिळत असते
लेखाकडून प्रतिसादाची वाट चालत असते

प्रतिसादातून माणसांची ओळख होऊन जाते
त्यांची असलेली ओळख सदा मित्र नामे रहाते
मैत्रीतूनच रट्टे-कट्टे स्त्रावित होत जातात
मगच त्यातून संवाद आकार घेत जातात

आता मिसळ हापसण्यातच वैराग्य माझे संपले
पण अवांतराचे बीज डोक्यात माझ्या उरले
आता व्यस्त अदिती संगणकाशी जाईल
प्रतिसाद द्या वर क्लिक करुन पुन्हा शांत राहिल.

बालगीतविरंगुळा

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

19 Nov 2008 - 8:03 pm | यशोधरा

:)

ब्रिटिश टिंग्या's picture

19 Nov 2008 - 8:06 pm | ब्रिटिश टिंग्या

(प्रतिसाद दिलेला नाही)

शितल's picture

19 Nov 2008 - 9:15 pm | शितल

:)

भास्कर केन्डे's picture

19 Nov 2008 - 10:11 pm | भास्कर केन्डे

#:S

टारझन's picture

19 Nov 2008 - 8:13 pm | टारझन

टारझन ,
आपणास ताकिद (न) देउनही आपण पुन्हा प्रकाटाआ वाले प्रतिसाद देत आहात असे आढळून आले आहे, सबब , आपला प्रकाटाआ पुन्हा टंकण्यात येत आहे . प्रकाटाआ हे धाग्याशी केवळ अवांतर नाही , तर ते लेखकाचे गाल कुरवाळून खाआआअन्न्न कन काणाखाल्या वाजवण्यासारखे आहे.

कळावे ,

आणिबाणिचा प्रतिसादकर्ता

लिखाळ's picture

19 Nov 2008 - 8:22 pm | लिखाळ

मुद्दामच प्रतिसाद कोरा ठेवला आहे
-- (आणिबाणीतल उत्तरदाता) लिखाळ.

छोटा डॉन's picture

19 Nov 2008 - 8:18 pm | छोटा डॉन

च्यायला काय पण म्हणा हां, सध्या मिपावर "प्रासंगीक आणि मार्मीक " काव्य आणि लेख व ते सुद्धा अगदी "शिघ्र" पद्धतीने भरभरुन येऊ लागले आहेत ...
शॉल्लेट्ट मज्जा येते आहे.

लै भारी कविता, आवडली एकदम ...

प्रतिसादातून माणसांची ओळख होऊन जाते
त्यांची असलेली ओळख सदा मित्र नामे रहाते
मैत्रीतूनच रट्टे-कट्टे स्त्रावित होत जातात
मगच त्यातून संवाद आकार घेत जातात

+१, सहमत आहे ...

आता व्यस्त अदिती संगणकाशी जाईल
प्रतिसाद द्या वर क्लिक करुन पुन्हा शांत राहिल.

=)) =)) =))
आता आमचेही २ पैसे ...
आता (डोंबलाचा) व्यस्त डॉन्या पुन्हा घरुन मिपा उघडेल,
"प्रतिसाद द्या" वर क्लिक करुन पुन्हा अवांतर प्रतिसादाचे पीक काढेल ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

लिखाळ's picture

19 Nov 2008 - 8:18 pm | लिखाळ

छान आहे.. कवितेच्या प्रांतात मुशाफिरी...
स्त्रावित आले.. प्लावित कसे काय नाही आले?
-- लिखाळ.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Nov 2008 - 8:24 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

छान आहे.. कवितेच्या प्रांतात मुशाफिरी...
हो ना, सवय नाही त्यामुळे चुकून "जनातलं, मनातलं" मधेच गेली ती! होते हो चूक (बाई)माणसाच्या हातून, माफ करा गरीबाला एकदा!
स्त्रावित आले.. प्लावित कसे काय नाही आले?
आता एवढं मराठी/संस्कृत येत असतं तर मला आकडेमोडीची नोकरी नसती ना मिळाली!

अवांतरः प्रतिसाद लिहिणार नाही असं वरच लिहिलं होतं, पण एकदा चूक कबूल करुन टाकली की टोचणी लागत नाही हो! कविता केल्याची चूक एकदा मान्य करण्यासाठी हा प्रतिसादप्रपंच.

'एका नश्वर' कवितेपासून स्फूर्ती घेऊन, मिसळ हापसत हापसत, दुसरे नश्वर काव्य रचणार्‍या ब्रम्हवादिनी अदिती, कवितेच्या प्रांतात तुझे स्वागत असो! B)

चतुरंग

ब्रिटिश टिंग्या's picture

19 Nov 2008 - 8:25 pm | ब्रिटिश टिंग्या

विडंबनाची!

- टिंग्या

अवांतर : पुढच्या १५ मिनीटात विडंबन पाडले तर तुमच्या खरडवहीत कित्ती किती हुश्शार असे खरडले जाईल!

शंकरराव's picture

19 Nov 2008 - 8:23 pm | शंकरराव

सर्कीट असो वा विसोबा (मिपाकरांनी) साक्षीभाव जपावा
मिटे सर्व वाद प्रतिसाद ऍसा लिहावा
शंकरराव म्हणे ..

कपिल काळे's picture

19 Nov 2008 - 9:23 pm | कपिल काळे

चतुरंग, विसोबा भलते डांबिस
पिवळा धम्मक असे कर्ण
सुनीत गातो मुक्त होवूनी
लिखाळ करी दशा विदिर्ण

टारझन प्राजु कार्यकर्ते
मिपाच्या प्रसाराचे
सर्किट भारी चेंगट तरीही
कौतुक करितो कोलबेराचे

व्यस्त व्यस्त लेखिका असूनी
लिहू लागली कविता
कपिल टंकितो प्रतिसादा
माउस घेउन त्या हाता

बाकिची नावे नंतर कधीतरी.

सध्या प्रासंगिक लेखन अगदी शीघ्रपणे येत आहे ह्या डॉनच्या म्हणण्याशी सहमत.( त्यामुळे मी ही थोडा शीघ्रकवी झाली)
एकंदरीत मिपावर सरस्वती पाणी भरु लागली आहे तर!!
प्रणव खेर्डेकरच्या कवितेवर प्रतिसाद आले नाहीत म्हणून तो नारज झाला, पण त्याच्या कवितेमुळे डांबिस आणि अदिती ह्यांना काव्याची प्रेरणा मिळाली. लगे रहो प्रणव.

http://kalekapil.blogspot.com/

लिखाळ's picture

19 Nov 2008 - 9:28 pm | लिखाळ

एकंदरीत मिपावर सरस्वती पाणी भरु लागली आहे तर!!
तसे नसावे !

सरस्वतीच्या तोंडाला कोरड पडली आहे.
-- (छंदोबद्ध)लिखाळ.

पण पाणी भरुन भरुन काव्य फारच 'पाणीदार' झाले की तोंडचे पाणी पळते आणि मग विडंबनाद्वारे पाणी पाजायची इच्छा होते त्याचे काय?

चतुरंग

भास्कर केन्डे's picture

19 Nov 2008 - 10:19 pm | भास्कर केन्डे

आजीसाहेबांचे आवांतर वा विडंबन, त्यावरची चर्चा व कपिलशेठांची ही कोटी... सगळे मस्तच चालले आहे. चालू द्या...

त्यांची असलेली ओळख सदा मित्र नामे रहाते
आम्ही बॉ ज्यांना मित्र समजतो ते तर आम्हाला फाट्यावर मारतात... असो. असते एकाकाचे फाटके (नशिब हो) ;)

कपिल टंकितो प्रतिसादा
माउस घेउन त्या हाता
आँ... माऊसाने टंकित करताय... बरं बरं =))

आपला,
(प्रेक्षक) भास्कर
आम्ही येथे वसतो.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Nov 2008 - 10:05 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

आम्ही बॉ ज्यांना मित्र समजतो ते तर आम्हाला फाट्यावर मारतात... असो. असते एकाकाचे फाटके (नशिब हो)
अहो भास्करकाका, म्हणूनच कट्ट्यांबरोबर रट्टेही आले ना! ;-)

आणि सरस्वतीच्या तोंडचं पाणी पळालेलं आहे, रंगराव, विडंबनाची वाट बघत्ये! (विडंबन केलेलं काव्य उच्च समजतात म्हणून हो!) ;-)

(स्वयंघोषित अवांतरसम्राज्ञी) अदिती

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Nov 2008 - 7:06 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

तुझं काव्य उच्च समजलं जायला हवंय की मूळ काव्य?

तुम्ही "प्रेरणा" म्हणून ज्या धाग्याची लिंक टाकणार ते! तुम्ही विडंबक (आणि संपादकही), तेव्हा मी एकदम हाताची घडी तोंडावर बोट! :W

(राजकारणी) अदिती

करणारे नसते त्यामुळे हाताची घडी तोंडावर बोट असे न करता मोकळेपणाने बोल!
आपल्याला एखाद्या गोष्टीत निवड करायची संधी मिळणं हे फार चांगलं असतं असं मी तरी मानतो अन्यथा बर्‍याचवेळा ह्यात वाव नसतो! :)

चतुरंग

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Nov 2008 - 10:22 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

इथे विडंबन आणि संपादन दोन्हीही मुस्कटदाबी करणारे नसते त्यामुळे हाताची घडी तोंडावर बोट असे न करता मोकळेपणाने बोल!
चतुरंग, मी काही फार गंभीरपणाने ते विधान केलं नव्हतं, (पण तुम्ही फारच गंभीरपणे घेतलंय). आणि विडंबन कराच असाही आग्रह नाही. कारण तुम्ही कविता/विडंबनं "पाडत" नाहीत असं माझं मत आहे.

आपल्याला एखाद्या गोष्टीत निवड करायची संधी मिळणं हे फार चांगलं असतं असं मी तरी मानतो अन्यथा बर्‍याचवेळा ह्यात वाव नसतो!
नक्कीच चांगलं असतं, पण कधीकधी आपल्याला एखाद्या गोष्टींची फारशी समज नसते. तेव्हा त्याबद्दल आपल्याला केवढीतरी माहिती आहे, समज आहे याचा आव न आणणंच इष्ट, नाही का?
भले ती वरची कविता (म्हणू शकते का?) मी लिहिलेली असेल पण म्हणून कवितांमधलं मला काहीही समजत नाही. तर हे मुख्य कारण मी मत व्यक्त न करण्याचं.

माझ्या कवितेचं (पुन्हा कविता?) विडंबन करणार असाल, जरूर करा. मलाही हसायला आणखी एक कारण मिळेल (खुद के साथ बातां: कारणाशिवाय हसत नाहीस का गं, मिस्वाक?) पण मूळ कवितेच्या जनकाने कवितेचं विडंबन करु नये असं एका प्रतिसादात लिहिलं आहे, तेव्हा आता बॉल तुमच्या कोर्टात! तुमचा निर्णय मान्य!! अहो, या कवितांच्या प्रांतात मी वाट चुकूनच डोकावले, तुम्ही इथले नेहेमीचे, तेव्हा तुमचं म्हणणं प्रमाण.

(गद्य, "बेकंबे"वाली) अदिती

यशोधरा's picture

19 Nov 2008 - 9:42 pm | यशोधरा

>>>सरस्वतीच्या तोंडाला कोरड पडली आहे.

=))

विसोबा खेचर's picture

19 Nov 2008 - 11:14 pm | विसोबा खेचर

आयला!

लै भारी कविता...! :)

अदिती, जियो..! :)

--विसोबा खेचर.

विसोबा खेचर's picture

20 Nov 2008 - 10:41 am | विसोबा खेचर

लेका रंग्या, माझा प्रतिसाद संपादित केलास होय रे? इथे मी एक छानशी शिवी दिली होती ती गेली कुठे? :)

असो...

आपला,
(संपादकांच्या निर्णयात हस्तक्षेप न करणारा) तात्या.

आनंदयात्री's picture

20 Nov 2008 - 9:52 am | आनंदयात्री

मस्त, उत्सफुर्त, प्रासंगिक !!

अभिनंदन !!

>>आता व्यस्त अदिती संगणकाशी जाईल
>>प्रतिसाद द्या वर क्लिक करुन पुन्हा शांत राहिल.

=))

आपलाच,

(अवांतरप्रतिसादकर्ता)

(गैर) आनंदयात्री

"प्रतिसाद वाद विवाद संवाद" नाव की मिपावर नवे "विभाग" असे वाटले. :-)

.. क्लिक करुन पुन्हा शांत राहिल.

किती वेळ? :-)

अवलिया's picture

20 Nov 2008 - 1:40 pm | अवलिया

.. क्लिक करुन पुन्हा शांत राहिल.
किती वेळ?

३.१४ सेकंद फक्त....
बाकी नो कमेन्टस...

अवांतर - मनातले स्फुट मांडण्याची लेखिकेचे कौशल्य चांगले आहे
अतिअवांतर - वाढदिवसाच्या शुभेच्छा
महत्वाचे अवांतर - एलियनी का नाही आल्या?
फालतु अवांतर - आपण मुखवटा वापरता का?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Nov 2008 - 3:23 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अवांतर - मनातले स्फुट मांडण्याची लेखिकेचे कौशल्य चांगले आहे
अतिअवांतर - वाढदिवसाच्या शुभेच्छा

भगवंतास्टीक!

महत्वाचे अवांतर - एलियनी का नाही आल्या?
आपण कथा पुन्हा एकदा वाचा, मग आपल्याला लगेच उत्तर मिळेल की प्रश्न "नल अँड व्हॉईड" आहे!

फालतु अवांतर - आपण मुखवटा वापरता का?
मी त्याचं उत्तर इथे का देऊ?

यापुढे आपणांस किंवा इतर कोणालाही काही चर्चा करायची असेल, विनोदांवर हसायचं असेल किंवा माझ्याशी वाद घालायचा असेल, भांडण उकरायचं असेल तर खरडवह्या वापरणे. आधीच मी अवांतरांसाठी बदनाम आहे तेव्हा चिखलात दगड मारू नयेत- हुकूमावरुन

(आगाऊ) अदिती

मिपाकराच्या काव्यप्रतिभेला बहार आला आहे.तात्या यंदा पासुन मिपाभुषन असा एकादा पुरस्कार सुरु करावा आणि तो प्रणव जीना देण्यात यावा.
खर तर आता त्या पुरस्कारासाठी प्रणवजी,पिंडा काका.अदिती व कपिल काळे ह्याच्यात खरी चुरस आहे.त्यामुळे लगे रहो. येऊद्यात नव्या कविता.
वेताळ

राघव's picture

20 Nov 2008 - 2:26 pm | राघव

हाहाहा... काय तुफान डोकी चालतात इथे!
मी हे वाचलेच नव्हते. आधीच प्रणवरावांना प्रतिसाद देवून आलो!!
अदितीताई,
तुम्ही कवितेची (वाट लावण्याची) वाट कधीपासून धरलीत?? ;)
(हसरा) मुमुक्षु

विनायक प्रभू's picture

20 Nov 2008 - 3:53 pm | विनायक प्रभू

कभी कभी अदिती
कविता भी करती है.

अभिज्ञ's picture

20 Nov 2008 - 4:21 pm | अभिज्ञ

मला तर हा धागाच (प्रतिसादांसह)अवांतर वाटला.

चालु द्यात.

अभिज्ञ.

आनंदयात्री's picture

20 Nov 2008 - 4:24 pm | आनंदयात्री

वा वा .. आपला प्रतिसाद पाहुन अंमळ मौज वाटली.

तुमचे वरिल काव्याबाबत काय मत आहे ?

इनोबा म्हणे's picture

20 Nov 2008 - 5:57 pm | इनोबा म्हणे

चालू द्या.

अवांतरः प्रासंगिक कविता आवडली.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर