बेचव बकवास

शेर भाई's picture
शेर भाई in जनातलं, मनातलं
1 Jun 2020 - 11:39 pm

सगळ्यात आधी मिसळ-पाव हॉटेलामध्ये आमच्या सारख्या पामरास आपला ठेला लावू दिल्याबद्दल हॉटेल मालकांचे आभार. या हॉटेलात आमचे हे तिसरे पुष्प. पुष्प ते पण हॉटेलात, sounds weird, म्हणून आपण ह्याला तिसरा गार-बकवास-बेचव-वडा म्हणूया. आता या हॉटेलामध्ये जी बरीच गर्दी असते, आणि ती दर्दी पण असते, अस म्हणतात.

आम्ही पहिल्यापासूनच बरेच उपदव्यापी. एकदा फिरता फिरता एका “उद्योगी मराठी माणसांच्या उत्थानासाठी आयोजित” होऊ घातलेल्या खाद्य-महोत्सवात गेलो होतो. तिथे आयोजक दादांपैकी एक दादा आमचा मित्र निघाला. त्याने विचारले तुम्ही घेणार का एखादा Food Stall चालवायला? तिथे आमच्या Madam नी आम्हाला लगेच spot-approval दिल. तसही Food Stall वर जे काय बनवायचं ते आमच्या Madam बनवणार होत्या, त्यामुळे लगेच पूर्ण भाडं भरून Food Stall book करून घेतला.

आता अडचण फक्त अशी होती कि आम्ही राहतो Central Line ला आणि खाद्य-महोत्सव होता Western Line ला, त्यात परत तिथली वेळ होती संध्याकाळची. आधी आम्हाला वाटलं होत कि संध्याकाळी JVLR मार्गे अंधेरीकडे जाणारा रस्ता एकदम रिकामाच मिळेल. पण यात आमच्याकडून सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट दुर्लक्षिली गेली ती म्हणजे आपण ज्या मुंबईत राहतो, तिथे हल्ली अनेक प्रेमी जीवांना आपलं प्रेम उधळायला हवा तसा एकांतच मिळत नाही. याचा बराच गाढा अभ्यास JV लिंकरोडवरच्या सगळ्या लोकप्रिय नगर-सेवकांनी केला असावा, आणि मग आपल्या प्रभागातील तमाम प्रेमळ लोकांना आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी हक्काचा एकांत मिळावा आणि तो त्यांच्या घराजवळच असावा, या उदात्त हेतूने त्यांनी आधी जिथे-जिथे रस्ता दुभाजक दिसले तिथे–तिथे Sky–walk बांधले असावेत. अर्थात हे करताना त्यांनी जवळच असणाऱ्या पवई तलावावर प्रेमळ लोकांचा दिवसभर पडणारा ताण पण लक्षात घेतला असणारच. आणि नंतर जेव्हा त्यांना अस आढळलं असेल कि इतर (म्हातारी) जनता Sky–walk चे जिने चढून या प्रेमी युगुलांच्या एकांतात खंड पाडते आहे, तेव्हा पुन्हा एकदा याच प्रेमी जीवांच्या कल्याणासाठी, आणि इतर (म्हातार्‍या) जनतेची Sky–walk चे जिने चढून होणार्‍या गुडघेदुखीच्या त्रासापासून सुटका करण्यासाठी त्यांनी थेट Sky – walk खाली zebra-crossing बनवून त्यावर Signals लावले असावेत. याचा परिणाम मात्र असा होता कि आम्ही कधीच सूर्याला बरोबर घेऊन महोत्सवात पोहचू शकलो नाही. त्यात संध्याकाळी आपल्या प्रेमपात्राला घेऊन निघलेले Bikers आणि Signals म्हणजे सुज्ञास सांगणे न लगे.

असो, आता मूळ विषयाकडे, तर एकदा खाद्य महोत्सवात भाग घ्यायचे ठरवल्यावर खाद्य महोत्सवाचा Menu ठरवणे आले. Veg. मध्ये मिसळ-पाव, पाणी-पुरी आणि Non-Veg. मध्ये कोलमी-लोणच, सागोती-पाव ठेवायचा अस ठरवलं. रंगीत-तालीम करण्यासाठी सगळे पदार्थ चांगले चार चारदा चाखून पाहीले (बनविले मात्र तिनेच). मजाक मजाकमध्ये एक Data-Analysis साठी App. पण बनवलं. शेवटी एक Cash – Drawer घेतला. (येणारे प्रचंड पैसे ठेवायला)

आणि मग तो दिवस आला, खाद्य महोत्सव सुरू झाला आणि बघतो तो काय पहिल्याच दिवशी ही तोबा गर्दी, पण शेजारच्या Stall वर.

पण थोड्या वेळाने थोडी सुरुवात झाली खरी पण त्या दिवसाचा शेवट मात्र आम्ही कोलमी-लोणच आणि सागोती; यांची पावाबरोबर पोटात मिसळ करून केला. नंतर अस लक्षात आल कि बऱ्याच Food Stall वरची गर्दी त्यांच्या Local Friend Circle ची होती. मग दुसर्‍या दिवशी आम्हीपण लगेच आमच्या Friend Circle ला आवतान धाडल, यात एक गोष्ट मात्र चांगली झाली कि आमचे सगळे पदार्थ त्या दिवशी संपले. (तेव्हढाच आमच्या पोटाला आराम). नंतर जेव्हा प्रत्यक्ष खाद्य-महोत्सवात फिरून अंदाज घेतला कि बाबा आपलं नक्की चुकतंय तरी काय, तेव्हा अस आढळले कि खाद्य-महोत्सवात चायनीजला खूप मागणी होती मग ती चायनीजला भेळ असो कि चायनीज लाल पकोडे, कारण ते स्वस्त आणि भरपूर मिळत होते. मग मात्र आम्ही आमचा Menu परत Re – define करायचा ठरवलं. ह्या वेळेस Veg. team मध्ये वडा-पाव, भजी-पाव आणि उकडीचे मोदक उतरवले. आणि Non-Veg. team मध्ये एकटा तंदूर चिकन लोलीपोप उतरला. परत Veg. आणि Non-Veg. लोकांचा गैरसमज होऊ नये म्हणून सगळ्यांना दिसावे अशा पद्धतीने दर्शनी भागात आम्ही Veg. आणि Non-Veg. साठी स्वतंत्र चुली मांडल्या.

पण त्यातही काही लोकांनी तुम्ही एकाच तेलात वडे आणि भजी तळता म्हणून आम्हाला नको अस म्हणत नाक मुरडून घेतली. उकडीच्या मोदकाला Sweet Indian Momo पण म्हणतात अस आम्हाला तिथे कळलं. या वेळी मात्र एकूण १५७ गरमा गरम उकडीचे मोदक उकडून आणि गरमा गरम १९९ भजी आणि वडे तळून आमच्या Re – defined मेनुने आमचा चांगलाच जीव काढला. (आकडेमोड आमच्या App ची बर का!!) विशेष म्हणजे Non-Veg. team, ने पण कधी नाही ते Sold out झळकवले. शेवटी त्या दिवशी आम्हाला मात्र रात्रीच्या जेवणासाठी दुसरे हॉटेल जवळ करावे लागले.

एकूण काय या वेळेस, अगदी Merit मध्ये नाही तरी First class मध्ये Pass झालो.

या अनुभवानंतर एक हॉटेल काढायचा आमचा मनसुबा आहे!! (मराठी गोलमाल मधला भरत जाधव) पण हॉटेल काढायला महानगरपालिकेच्या, राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या कुठल्या आणि किती परवान्यांची गरज आहे या बाबत बराच गोंधळ आहे. जाणकारांना मदतीचे जाहीर आवाहन करून आमची बेचव बकवास थांबवतो.

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

कानडाऊ योगेशु's picture

1 Jun 2020 - 11:45 pm | कानडाऊ योगेशु

बेचव बकवास लेख अगदी खुशखुशीत झाला आहे.

या अनुभवानंतर एक हॉटेल काढायचा आमचा मनसुबा आहे!!

अगदी दिल से शुभेच्छा! एक कट्टा तिकडेच करू मग!

वीणा३'s picture

2 Jun 2020 - 1:43 am | वीणा३

भरपूर शुभेच्छा !!!

चौकटराजा's picture

2 Jun 2020 - 9:11 am | चौकटराजा

खालील गोष्टी मला होटेलात खटकतात..
१. हल्ली एकदम पोटभर अनलिमिटेड जेवण ही भान्गड आली आहे. पोटभर ची व्याख्या देहाप्रमाणे बदलते. उदा मला ३० वाट्या आमरस खायला मिळाला व मला मधुमेह नाही अशी जरी स्थिती असेल तरी तो मी खाणार नाही. थोड्क्यात अटोमोबाईल क्षेत्रात ज्याप्रमाणे इन्कम वाईज सेगमेन्ट असतो तसा तो खाण्याच्या धन्द्यात देखील असतो. एकदम गरीब लोकान्ची काळजी घेणार्या टपर्या भरपूर आहेत तसे मी ३२ वाट्या असलेली राईस प्लेट खाल्ली असा ही एक प्रकार आहे.
आपण पदार्थात लवचिकता आणावी म्हणजे माझे अगदी " येडे " उदाहरण आहे ते इथे देतो तितकी लवचिकता नसले तरी चालेल. मी पन्जाबी समोसा आणला की त्यात मी आतली भाजी निम्मी फेकून देतो अगर दुसर्याला देतो. मला फक्त ते वरचे टरफल आवडते. आता एखादा म्हणाला मला फक्त टरफल द्या तर त्याला जमणार नाही असे खुशाल सांगा. पण मसाला डोसा ऐवजी साधा दोसा अशी निवड असलीच पाहिजे !

मी जर डायनिन्ग हॉल काढला असता तर कमीतकमी चार प्रकारची जेवणे ठेवून अधिकात अधिक " खादाडी" सेगमेन्ट टॅप केले असते .असा हॉल माझ्या तरी पहाण्यात नाही .

आंबट चिंच's picture

2 Jun 2020 - 9:53 am | आंबट चिंच

लखनशैली आवडली.

होटेलास शुभेच्छा!

आधी नाव काय ते ठरवा. एका पुणेकराने अशीच होटेल चालु करायचे आहे तेव्हा काय नाव हवे म्हणुन नावांची यादी मागवली आणि जो धुमकेतु प्रमाणे गायब झाला त्याला तोड नाही.

सगळे मिपाकर कुपन कधी मिळेल या आशेवर आहेत अजुन…..

शेर भाई's picture

2 Jun 2020 - 10:55 am | शेर भाई

@ कानडाऊ योगेशु: - कट्टा नक्कीच करू
@ वीणा३: - धन्यवाद
@ चौकटराजा: - आमची पण अशीच काहीतरी हटके करायची कल्पना आहे. Order साठी वेटरपेक्षा साखळीने बांधून प्रत्येक टेबलावर Tabs ठेवायचा विचार आहे. Menu साठी तुमचा सल्ला नक्कीच आवडेल.
@ आंबट चिंच: - हॉटेलचे नाव तयार आहे.
पण शेवटच्या परिच्छेदात म्हटल्याप्रमाणे खरच गोंधळ आहे. त्यासाठी जाणकारांनी योग्य दिशा दर्शन करावे.

चौकटराजा's picture

2 Jun 2020 - 12:56 pm | चौकटराजा

वरचा प्रतिसाद वाचून मला " आंबट चिंच" हेच होटेलचे नाव आहे असे वाटले, मी म्हणणार होतो शेजारी मी जेल्युसिल बार काढतो म्हणून !!

शेर भाई's picture

2 Jun 2020 - 6:36 pm | शेर भाई

नाव काहीही ठेवूया, पण जो कोणी दर्दी खवैये तिथून जात असतील त्यांची घ्राणेन्द्रिये त्यांना पुढे जाऊच देणार नाही, याची खात्री बाळगा.
पुन्हा एकदा लक्षात घ्या, अडचण परवान्यांची आहे. कोणी सांगत केंद्राकडे जा, कोणी सांगत राज्य शासनाकडे जा तर कोणी सांगत कोणाकडेच जाऊ नका, BMC ला सेट करून घ्या.
आम्हाला धोपटमार्ग दाखवलं का नाखवा

शीर्षक आणि मजकूर यान्चा काहीच सम्बन्ध नाही ! ना बकवास ना बेचव !! छान छान !!!

जर काही या तर्‍हेचा उद्योग सुरू केलात तर शुभेच्छा आणि एक सावधगिरीचा सल्ला. पुण्यातल्या एका बर्‍यापैकी मोठ्या "हिरवळीवर टेबले" वगैरे थाटाच्या खाद्यगृहाला नेहेमीच वेटर्स अपुरे पडत असावेत कारण प्रत्येक वेळी तिथे नवीनच चेहेरे तर दिसतच पण बर्‍याच वेळा जो कोणी टेबलावर काही पदार्थ ठेवून जात असे त्याला काय ठेवलेले आहे (आपण मागवलेला पदार्थच आलेला आहे ना याची खात्री करण्यासाठी) हे विचारल्यावर त्याला धड उत्तर देखील देता यायचे नाही आणि मग कोणीतरी येऊन "तो नवीनच आहे" अशी सारवासारवी करत, टेबलावर काय आलेले आहे हे (झाकण उघडून पाहिल्यावर) जेमतेम उत्तर द्यायचा. असे होऊ नये या साठी पदार्थान्ची नावे सोपी ठेवा आणि शक्यतो प्रत्येक वेटरला किमान orientation देऊन मगच कामावर सुरू करा. अर्थात असे सगळे विचार तुम्ही करालच.

Order साठी वेटरपेक्षा साखळीने बांधून प्रत्येक टेबलावर Tabs ठेवायचा विचार आहे.
एक छोटीशी सुधारणा, सुरुवात पुणे नाही तर मुंबईत करायची आहे. मग मात्र PAN INDIA शाखा काढणार.

निनाद's picture

5 Jun 2020 - 5:35 am | निनाद

सुरुवात पुणे नाही तर मुंबईत करायची आहे. उत्तम कल्पना आहे.
मग मात्र PAN INDIA शाखा काढणार. हे पण छान.

म्हणजे शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म मध्ये काय करायचे ते पक्के आहे.

आता उरलेले:

  1. कागदावर प्रकल्प आराखडा बनवला आहे का? (तुम्ही कुणाला तरी पैसे देणार आहात आणि ते येण्याची तुम्हाला खात्री हवी आहे, असे समजून बनवावा)
  2. पैसे कसे येणार कसे जाणार याचा काही अंदाजीत ताळेबंद बनवला आहे का?
  3. हॉटेल उत्तम चालले तर खूप छान पण समजा काहीच चालले नाही तर किती दिवस सस्टेन करणार? प्लान बी काय?
  4. हॉटेल साठी लागणारे मनुष्यबळ ही फार तिढ्याची गोष्ट असते. जसे हॉटेल चालेल तसे त्याचा विचार करावा लागेल. म्हणजे ऑपरेशनल प्लान हाताशी हवा.
  5. मार्केट अ‍ॅनॅलिसिस रिपोर्ट तयार आहे का? हॉटेल हे 'कुठे आहे' म्हणजे लोकेशन काय आहे त्यावर किती आणि कसे चालेल याचा विचार केला जातो असे वाटते.

एखाद्या हॉटेल मध्ये काही दिवस अनुभव घेण्यासाठी काम केले तर?

नवीन हॉटेलसाठी खूप शुभेच्छा! भरपूर चालू देत आणि भारतभर काय जगभर शाखा निघू देत!!

राघव's picture

3 Jun 2020 - 3:21 pm | राघव

खुसखुशीत लेख. आवडला.

चवीनं बनवणार्‍यांसाठी भारतात व्यवसायाला कधीच मरण नाही. :-)
बाकी चवीचा पत्ता म्हणून ऐन तुळशीबागेत एक छोटं रेस्टॉरंट आहे. तुमचा लेख वाचून त्याची आठवण झाली.

लायसन्स वगैरेची मला स्वतःला विशेष माहिती नाही. पण १-२ जणांना विचारून काही माहिती मिळाली तर नक्की सांगेन.

शेर भाई's picture

3 Jun 2020 - 7:02 pm | शेर भाई

परवान्यानाचा बागुलबुवा इतका करून ठेवला आहे, कि नक्की काहीच समजत नाही. लिंका दिल्यात तरी चालेल.
प्रतिसादासाठी धन्यवाद

चौथा कोनाडा's picture

4 Jun 2020 - 5:17 pm | चौथा कोनाडा

व्वा खुसखुशीत लेख ! काही पंचेस जबरी जमलेत !
आम्ही पण फुड स्टॉल लावला होता ते आठवले !
एकंदरीत फुड स्टॉल लावणे हा एक अनुभवच असतो !

उमेदवारी केली का असं विचारलं असतं पण तो स्टॉल लावला म्हणाल. पण तिथे लायसनच्या जबाबदाऱ्या महोत्सवाकडे होत्या.
घी देखा लेकिन बडगा नही देखा।

-------
अगदी थोडक्यात म्हणजे या व्यवसायात असणाऱ्या पंजाबी, शेट्टी, मंगळुरी यांचे अनुभव घ्या.
त्यांचे सल्लागार मंडळ असतं. फंडसुद्धा देतात पण त्यांचे अडाखे बरोबर असतात. कोणत्या ठिकाणी काय चालेल आणि ते चालवण्याची कुवत आहे का पाहतात.
परवाने ५७ लागतात.
सोसायटीत गाळा असेल तर डोकेदुखी वेगळी असते.

बाकी मिपासाठी लेख म्हणाल तर जबरी.

उपेक्षित's picture

4 Jun 2020 - 8:05 pm | उपेक्षित

मस्त मजा आला वाचताना...
----------------------------------

८/१० दिवसांपूर्वी मी आणि बायडीने आमच्याच सोसायटीतली ११० वडा पाव आणि ४० चहा + चटणी अशी ऑर्डर पूर्ण केली (सकाळी आयत्यावेळी सांगितली होती ऑर्डर. अगदी सर्व करण्यापासून सगळे आम्ही केले, लोक अक्षरशः तुटून पडले होते सर्वांना आवडले वडे आणि चटणी मी आयुष्यात इतके वाडे एकदम पहिल्यांदाच केले त्यामुळे भीती होती मनात कारण ४०/५० वाडे सहज करायचो मी पण हे जरा जास्त होते.

सांगायचा मुद्दा जमेल तिथून पैसे कमवायचा प्रयत्न करतोय लाज न बाळगता.

उपेक्षित's picture

4 Jun 2020 - 8:06 pm | उपेक्षित

च्यायला वरती वड्यांचा वाडा झालाय काही ठिकाणी :)

शेर भाई's picture

5 Jun 2020 - 12:05 am | शेर भाई

चौथा कोनाडाG, कंजूसG आणि उपेक्षितG प्रतिसादासाठी धन्यवाद

पंजाबी, शेट्टी, मंगळुरी मित्र आहेत आणि Clients पण तिथे मराठी मालवणीत जस म्हणतात कि “चिंगळ्या वाटेल तेव्हढ्या द्या पण चिंगळ्याची खोळ कोणाला दाखवू नका” तसा अनुभव आला.
मला एखादा कृष्ण हवा आहे. जो योग्य रस्ता दाखवेल. शेवटी चालून पोहचायचं कि वाटेतच बसायचं हे माझ मलाच ठरवायचं आहे.

गणेशा's picture

5 Jun 2020 - 12:35 am | गणेशा

लेखन भारी.. आवडले... मज्जा आली वाचताना..

मिसळपाव सारखे हॉटेल काढायचे आहे काय?

मला हॉटेल चालवायचा अनुभव नाही. पण तुमचा लेख वाचून असं वाटतंय कि तुम्ही एकदा स्टॉल लावून हॉटेल काढताय (असं नसेल तर क्षमस्व, आणि पुढच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करा ). मी घरात स्वयंपाक करते , आणि त्यात सुद्धा जरा दुर्लक्ष झालं कि नासाडी होते. आता हे खूप छोट्या प्रमाणात आहे, फार मोठी इन्व्हेस्टमेंट नाहीये त्यामुळे आर्थिक नुकसान किंवा शारीरिक कष्ट खूप होत नाही, मनात वाईट कि नासाडी झाली. त्या छोट्याश्या अनुभवातून खालच्या स्टेप्स सुचवत्ये.

१. किमान १ -३ वर्ष तरी ऑर्डर घेऊन केटरिंग चा व्यवसाय करा, आणि शक्य तेव्हा स्टॉल लावत जा. तुम्हाला जागा शोधायला लागणार नाही, कुठलीही कागदपत्र बहुतेक करायला लागणार नाहीत. पैशांचा हिशोब चोख ठेवा. कुठलाही नुकसान नासाडी हॉटेल चालू केल्यावर कितीतरी जास्त प्रमाणात होणार आहे हे लक्षात ठेवा. आणि हे केल्यावर तुम्ही किती सातत्य दाखवू शकता, हा व्यवसाय पुर्णवेळ करू शकता का नाही हे तुमचं तुम्हाला कळेल. रेसिपी पक्क्या करा. मी एकदा माझ्या आवडीच्या हॉटेल मध्ये थोडं विचित्र वेगळ्या चवीचं (कुठलातरी मसाला जास्त झाला होता), त्यामुळे पुढे २-३ वर्ष गेले नव्हते. चव बदलली कि गिऱ्हाईक तुटेल हे लक्षात ठेवा.
२. केटरिंगचाच व्यवसाय थोडा मोठ्या प्रमाणावर करा. १०-१५ माणसावरून २५-३० वर, त्यावरून ५० आणि हळू हळू १०० वर जा.
३. हा अनुभव १-३ वर्ष घेतल्या नंतर हातगाडी किंवा छोटा स्टॉल घ्यायचा प्रयत्न करा. प्रत्येक व्यवसाय वेगळा असतो, त्यातली आव्हान वेगळी असतात. मागे इथेच कोणीतरी (बहुतेक पेठकर काका पण आठवत नाही ) यांनी हॉटेल पार्शवसंगीत म्हणून मध्ये लावायची गाणी कशी असावीत यात सुद्धा अभ्यास असतो हे सांगितलं होत.
बाकी शुभेच्छा आहेतच !!!

शेर भाई's picture

6 Jun 2020 - 12:38 am | शेर भाई

@ निनादG आणि वीणाG पहिल्या प्रथम तुमचे मनापासून आभार!!!!

@ निनादG
अभ्याG यांच्या readymade notes ने काही निसटलेले मुद्दे लक्षात आणून दिले.
प्रकल्प आराखडा तयार आहे. सध्या Analysis चालू आहे. जे करायचं ते पुर्ण अभ्यास करूनच या विषयी आम्हा उभयतांचे एकमत आहे.

@ वीणाG
तुमचे म्हणणे अगदी रास्त आहे. जस मोठी शर्यत पळण्याआधी छोट्या शर्यतीत स्वत:ला आजमावून बघायचे असते त्याप्रमाणे आधी १० मग २० अस करत करत सध्या ११० लोकांच्या ऑर्डर पर्यंत मजल मारली आहे.
“हॉटेल पार्शवसंगीत म्हणून मध्ये लावायची गाणी कशी असावीत” याची लिंक मिळेल का??

चर्चेतून बरेच नवीन मुद्दे मिळत आहेत त्यासाठी सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद

उपाहारगृहात गाणं कुठलं लावावं, या बद्दल बहुतेक पेठकरकाकांचा एक प्रतिसाद होता, लेख नव्हता. एकूणच उपाहारगृहात काय असावं काय नसावं याबद्दल ची माहिती होती. तो धागा सापडत नाहीये पण तो शोधताना खालचा सापडला. कदाचित उपयोगी पडेल
http://www.misalpav.com/node/44575

हा घ्या सापडला धागा. लेखाच्या शेवटचा पॅराग्राफ आहे गाण्याबद्दल
https://www.misalpav.com/node/32877

वीणाG
आमच्या प्रकल्पात या छोट्या छोट्या गोष्टींचा पण विचार करायला हवा हे आता प्रकर्षाने जाणवते आहे.
एकाच गोष्टीकडे पाहताना वेगवेगळ्या आयामांनी अभ्यास वाढायला मदत होते आहे.
पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद!!!