गारवा कृपेचा..!

राघव's picture
राघव in जे न देखे रवी...
18 Nov 2008 - 5:16 pm

ज्ञानाचीया डोहा
जाऊ मी कशास,
चरणांची आस
मजलागी |

माऊलीचे प्रेम,
झरा करुणेचा,
गारवा कृपेचा,
पुरेसाहे |

नका घेवू आता
दासाची परीक्षा,
तीच गोड भिक्षा
मज द्यावी |

तुम्हा माझी आण,
पुरवा तहान,
दर्शनास प्राण
व्याकूळले |

मुमुक्षु

कविताप्रकटन

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

18 Nov 2008 - 8:39 pm | मदनबाण

नका घेवू आता
दासाची परीक्षा,
तीच गोड भिक्षा
मज द्यावी |

व्वा..सुंदर..

मदनबाण.....

हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर

लिखाळ's picture

18 Nov 2008 - 8:57 pm | लिखाळ

गारवा कृपेचा,
वा वा ...
छान कविता..

ज्ञानाचीया डोहा
येथे ज्ञानाचिये डोहा असे केले तर कसे वाटेल?

'पुरवा तहान' पेक्षा हट्ट पुरवा/ तहान भागवा असे बरे वाटते.

-- लिखाळ.

राघव's picture

20 Nov 2008 - 12:44 pm | राघव

"ज्ञानाचीये डोहा" जास्त योग्य वाटतंय!
तहान भागवायचीच असते. अगदी योग्य. मला खरे म्हटले तर यात हट्ट दाखवायचा होता. त्यामुळे तसे लिहिलेले आहे.
अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! :)

प्राजु's picture

18 Nov 2008 - 9:06 pm | प्राजु

अतिशय भक्तीपूर्ण रचना.
खूप आवडली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

राघव's picture

20 Nov 2008 - 12:45 pm | राघव

तुम्हा सगळ्यांचे मनःपुर्वक आभार!
मुमुक्षु

विसोबा खेचर's picture

20 Nov 2008 - 1:05 pm | विसोबा खेचर

नेहमीप्रमाणेच सुंदर प्रासादिक काव्य..!

आपला,
(मुमुक्षुरावांचा फ्यॅन) तात्या.