घे भरारी..
स्वप्नसुखांचे लेवुन पंख
घे भरारी गगनात
आभाळ आहे तुझेच परि
तु तुझिया मायेला विसरु नको
श्वासात घे भरुन तु
ती अविरत ऊर्जा त्या भानुची
घे भरारी गरुडापरि तु
असुदेत एक नजर भूवरी
नंदादीप तो जळत राहो
तुझ्या इच्छा-आकांक्षाचा
निसर्गाचे ते अनमोल देणे
तु परतवत रहा त्याला
- Dipti Bhagat
प्रतिक्रिया
13 May 2020 - 10:06 am | गणेशा
प्रत्येक वेळेस वाह.. भारी.. असा मिठास रिप्लाय देणे खुप boar होते..
त्या पेक्षा कवितेला रिप्लाय कवितेतून लिहितो..
शीघ्र कवी मोड ऑन
पंख तुला हे माझे लागावे
रंग नभाचे त्यात मिसळावे
तू सूर्य उद्याच्या विश्वाचा
मी मेघ मायेचा..तुला स्मरावे..
शीघ्र कवी मोड ऑफ
- शब्दमेघ
13 May 2020 - 10:19 am | मन्या ऽ
थँक्स म्हणाव तर कमी पडेल. इतकी सुंदर चारोळी! आणि
दादा, अरे शब्द झाले मोती या तुझ्याच डायरीचा परिणाम आहे ही कविता.. प्रिती-राधा यांच्या मुलीसाठी सुचलेल्या ओळी..त्यात थोडेफार बदल करुन इकडे पोस्ट केली..