shinchan :एक उत्तम स्ट्रेस बस्टर

Prajakta२१'s picture
Prajakta२१ in जनातलं, मनातलं
8 May 2020 - 12:44 am

सध्या लॉकडाऊनमुळे टीव्ही बघण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे घरून काम करून आणि बाकीची कामे, फोनाफोनी करून झाल्यावर तेवढाच विरंगुळा उरतो टीव्ही सोडून करण्यासारखे खूप आहे हे कळते तरी वळत नाही असो

पण सारख्या न्यूज चॅनेलवरच्या करोनाच्या घाबरवणाऱ्या बातम्या,सासू सुनांच्या कौटुंबिक भांडणाच्या अमरत्व लाभलेल्या सिरिअल्स ,त्यातच पौराणिक देवादिकांच्या अमरचित्रकथा ,तेच ते चित्रपट (उदा. सोनी -सूर्यवंशम ,झी-हम आपके है कौन ,हम साथ साथ हे आणि राजश्री production चे सिनेमे ,कलर्स -कारण जोहर चे सिनेमे ) ते संपले कि दक्षिण भारतीय डब केलेले अतर्क्य आणि अचाट सिनेमे ह्यातून बघायला काहीच उरत नाही.

पाककृती चॅनेल्स बघून आपल्याकडे ते सामान नसल्यामुळे फॅन्सी रेसिपी करता न येण्याचे दुःख नको म्हणून त्या बंद आणि वेब सेरीजचे प्रोमोज बघूनच त्याला आपला पास देऊन टाकला होता नाही म्हणायला गाण्याची चॅनेल्स होतीच पण ती पण एका लिमिट नंतर कंटाळवाणी झाली जुन्या विनोदी सिरिअल्स -देख भाई देख,हम पांच इ.पण चालू केल्या आहेत पण त्या बघून हसू यायचे बंद झाले होते कपिल शर्मा आणि चला हवा येऊ द्या मधले ओढून ताणून केलेले आचरट विनोद आणि पंचेस ने हसणेच विसरले होते

अशातच सहजच shinchan बघितले आणि खूपच रिलीफ मिळाला घरचे लहान आहेस का म्हणून ओरडायला लागले तरी पण बघतच राहिले इतक्या वर्षांनी तोच ताजेपणा आणि हसायला मिळाले

एका ५ वर्षांच्या जपानी मुलाचे सहजसुंदर जीवन आणि रेखाटलेले भावविश्व,त्याला पडणारे प्रश्न आणि त्याची त्याने केलेली उकल त्यातून घडणाऱ्या गमतीजमती ह्या सगळ्यामुळे एक वेगळीच भट्टी जमून आलीये

shinchan ,त्याची बहीण हिमवारी,त्यांचे पालक,श्वान मित्र शिरो आणि शाळेचे सोबती ह्या पात्रांवर रेखाटलेली एक धम्माल कार्टून सिरीज म्हणजे shinchan

रोजच्याच जीवनातले साधे प्रसंग घेऊन त्यातून कशी धम्माल विनोद निर्मिती करता येते त्याचे मस्त ऍनिमेशन कम चित्रण आहे

जपानी संस्कृतीचे चित्रण आणि डबिंग voice ओव्हर आर्टिस्ट्स ची मेहनत पण उल्लेखनीय (८०% श्रेय व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट्स चेच आहे खरे तर )

कुतूहल वाटून गूगल केले तर वेगळीच माहिती आली एवढ्या धम्माल विनोदी पात्राची खरी माहिती करुण आहे

शिनोसुक नोहारा नावाच्या एका ५ वर्षीय मुलाने आपल्या बहिणीला वाचवायला प्राण दिले असे काहीसे लिहिले होते दुर्दैवाने दोघेही रोड accident मध्ये गेले त्या धक्क्याने निराश होऊन त्यांच्या आईने (मिस्सीने )त्यांची रेखाटने करायला सुरुवात केली आणि ते असते तर कसे प्रसंग घडले असते असे इमॅजिन करायला देखील ती रेखाटने

shinchan चे जनक Yoshito Usui ह्यांना मिळाली त्याने प्रेरित होऊन त्यांनी हि कार्टून सिरीज बनवली अशी वदंता आहे ह्याबद्दल बरीच मतमतांतरे आहेत (लिंक-https://www.quora.com/What-is-the-real-story-behind-the-character-Shin-chan)

https://en.wikipedia.org/wiki/Crayon_Shin-chan ह्या लिंकवर shinchan सिरीजची माहिती मिळते

ह्या लिंकवर वरील गोष्टीचा उल्लेख नसल्यामुळे ती वदंताच मानवी लागते

तसेच भारतीय पालकांनी shinchan बद्दल तक्रार केल्याची पण रंजक माहिती मिळाली shinchan chi उद्धटता आपल्या संस्कृतीशी मिळत नसल्याने आणि ते बघून मुले बिघडत असल्याने shinchan चे बरेच भारतीयीकरण करण्यात आले (जसे कि अल्कोहोल च्या जागी juice आणि काही सीन्स सेन्सॉर करण्यात आले )

मी पूर्वी बघितलेले shinchan आणि आत्ताचे shinchan ह्यात फरक जाणवतो तरी पण विनोद उणावत नाही

पण सौम्य केल्याने चांगले वाटते इतकेच

लॉकडाऊन चालू होण्याआधी पण जेव्हा ऑफिस मधून आल्यावर बघायचे तेव्हा एकदम ताणरहित फ्रेश झाल्यासारखे वाटायचे बाकी कार्टून्स कधीच बघितली नाहीत सध्या बघायचा प्रयत्न करते पण नाहीच आवडत shinchan शी जसे कनेक्ट होता येते तसे हल्लीचे कुठलेच कार्टून वाटत नाहीये (काही काहींची थिम चांगली असूनदेखील बघावीशी वाटत नाहीत)

पूर्वीची लहानपणीची आत्ता relate होत नाही फक्त shinchan च कालातीत वयातीत राहिलाय

अजून कोणी आहे का shinchan आवडणारे?

अवांतर - मस्ती चॅनेल वर अन्नू कपूरचा गोल्डन इरा विथ अन्नू कपूर हा कार्यक्रम पण चांगला असतो जुन्या गाण्यांसोबत गीतकार,संगीतकार आणि गायक ,नटांचे वेगवेगळे किस्से पण सांगतो

बालकथासमीक्षा

प्रतिक्रिया

वाचनाबद्दल सगळ्यांचे आभार

ब्रिटिश टिंग्या's picture

11 May 2020 - 12:52 am | ब्रिटिश टिंग्या

शिनचान मस्तच आहे.
कार्टुनमध्ये वैयक्तिकरित्या मला टॉम अ‍ॅन्ड जेरी सर्वात बेस्ट स्ट्रेसबस्टर वाटतं. इतके वर्ष बघतोय पण कधी कंटाळा नाही येत.

- टिंग्या

मन्या ऽ's picture

11 May 2020 - 1:18 am | मन्या ऽ

मी आजही कार्टुन्स बघणारी एन्जॉय कराणारी एकटीच नाहीये हे वाचुन किती किती छान वाटतंय.. :)
शिनचॅन, डोरेमॉन, मि.बीन बघते, पण टॉम& जेरी इव्हर ग्रीन आहे.कधीही बघु शकते. निव्वळ आनंद देणार कार्टुन!
आणखी एक कार्टुन लागायचं आधी. नाव लक्षात नाही. एक आजी बाई आणि तिने पाळलेल प्राणी. त्यातली ट्विटी प्रचंड आवडायची मला..(अवांतर होईल थांबते आता)

मन्या ऽ's picture

11 May 2020 - 8:32 am | मन्या ऽ

पुन्हा लहान व्हाव अस वाटायला लागलंय..

Prajakta२१'s picture

12 May 2020 - 9:44 pm | Prajakta२१

सर्वांचे आभार

राजाभाउ's picture

13 May 2020 - 11:21 am | राजाभाउ

मुलगा लहान असताना बर्‍याच वेळा त्याच्या बरोबर बघायचो, मस्त आहे शिनचान. पण मस्त आयडिया दिलीत, आता परत बघायला हरकत नाही