घरात एखादा पाळीव प्राणी असणे म्हणजे मोठी गम्मत असते. मांजरी तश्या स्वावलंबी असतात पण कुत्र्यांचे मात्र बरच करावे लागते. त्यातून कुत्रे जर अती एनर्जी असणारे असेल तर त्याला खेळवावे लागते. नाहीतर घरातल्या फर्निचरची वाट लागलीच म्हणून समाजा.
बायकोला अनेक वर्षे विनवण्या वैगेरे करून शेवटी आम्ही एक लॅब्रॅडुडल कुत्रे घरी आणले. फार एनर्जी असते बाबा या कुत्र्यांच्यात, घरात खेळून काही दमेना.
मग थोडी शोधाशोध केल्यावर घरापासून २-४ मैलांवर एक डॉग पार्क सापडले. अगदी मस्त आहे, लहान आणि मोठ्या कुत्र्यांसाठी वेगवेगळे भाग आहेत. आमच्या "कुकीला" सुद्धा हे डॉग पार्क फार आवडले. तिच्या आकाराची बरीच कुत्री तिथे खेळायला आलेली असतात.
मग काय दार आठवड्याला कुकीला डॉग पार्कमध्ये घेऊन जायचे हा नियमच झाला.
थोडी विचित्र गोष्ट घडली ती काही आठवड्यांपूर्वी. मी कुकीला खेळायला सोडून गम्मत बघत उभा होतो. एक मध्यमवयीन "गोऱ्या" बाई माझ्याशी गप्पा मारायला आल्या.
आम्ही गप्पा मारत असताना कुकी मधूनअधून माझ्याजवळ येऊन परत पळून जाणे हा खेळ खेळात होती.
गोऱ्या बाईं: "हे तुमचे पपी का? फार गोड आहे हो. काय नाव आहे?"
मी: "कुकी"
गोऱ्या बाईं: "अगदी माझ्यासारखी आहे कुकी, गुटगुटीत (चबी)."
आणि काय झाले कोणास ठाऊक पण त्या चपापल्यासारख्या एकदम गप्प बसल्या.
गोऱ्या बाईं खजील स्वरात: "सॉरी, मी तुमच्या पपीला चबी म्हणाले. माझा उद्देश तिला जाड वैगेरे म्हणण्याचा अजिबात नव्हता."
मी: "अहो त्यात काय झाले, तुम्ही काही चुकीचे बोललात असे मला अजिबात वाटत नाही. सॉरी वैगेरे म्हणण्याची अजिबात गरज नाही, कुकी आहेच तशी चबी."
पण या संवादाने मी थोडासा अंतर्मुख झालो. त्या बाईंना एका शब्दामुळे माझी माफी मागावी असे का बरं वाटावे? सामाजिक परिस्थिती अशी झाले आहे की आपल्याला बोलताना प्रत्येक शब्दाचा विचार करावा लागावा?
हे असेच राहणार असेल तर माणसांमधला निखळ संवाद कुठेतरी हरवरूनच नाही का जाणार?
प्रतिक्रिया
9 May 2020 - 6:10 am | तुषार काळभोर
तिथं समाजातील मोकळे ढाकळे पणा अगदी संपून गेल्यासारखं झालाय.
लोकं अती संवेदन शील झालेत.
आपल्याकडेही सुरुवात झालीच आहे हळूहळू.
काही वर्षांपासून पेपर मध्ये पोलिसांचा कुत्रा, मोकाट कुत्री अन् डुकरे असे उल्लेख असायचे. आता कुत्रा आणि डुक्कर हे शब्द पेपर मध्ये सापडत नाहीत. श्वान आणि वराह लिहावं लागतं.
स्पेशल ops वेब सिरीज पाहिली आहे का?
त्यात रॉ चे एजंट दोन महिला, इतर पुरुष, पुरुषांमध्ये एक मुस्लिम, महिलांमध्ये एक मुस्लिम असं दाखवलंय. यात वास्तव दाखवण्याचा प्रयत्न कमी आणि पॉलिटिकल करेक्टनेस जास्त आहे.
9 May 2020 - 10:49 am | सर टोबी
जसे कि:
9 May 2020 - 7:29 pm | शेखरमोघे
वरील छटा "धवल" प्रकारात येतील - पण तसाच "कृष्ण" प्रकारही आहे, जसे- आपल्या बोलण्यावरून भडका तर उडेल पण त्याचा दोष आपल्यावर येणार नाही अशा तर्हेचे बोलणे.
असा प्रकार कृतीतूनही होऊ शकतो. काही काळापूर्वी पुण्यात बहुमान म्हणून सर्वमान्य असलेली पुणेरी पगडी एका समारम्भात परत दिली जाऊन तिच्या जागी पागोटे दिले गेले पाहिजे असा आग्रह होऊन तसे दिले ही गेले होते.
9 May 2020 - 7:21 pm | शेखरमोघे
हल्ली सगळीचकडे "कुठल्या शब्दात, कोण कुणाला काय म्हणाले" याबद्दल लगेच चर्चा सुरू होते आणि त्यात काय म्हटले गेले आणि ते का म्हटले गेले हा मुद्दा बाजूलाच राहून जातो.
अमेरिकेतच कृष्ण वर्णी लोकाना नक्की कुठल्या शब्दात सम्बोधावे याबद्दल अनेक दशके चर्चा चालल्यावर आता "अफ्रिकन अमेरिकन" म्हणणे हा सर्वमान्य पर्याय निघाला आहे. अशी सर्वमान्य ओळख दिल्यावर, जे काही म्हटले जाते, ते जर "कट्टर" गोरा मनुष्य म्हणत असेल तर कदाचित ते अजूनही अमेरिकन यादवी युद्धाच्या काळातल्या प्रमाणेच असू शकेल. असेच काहीसे चिनी, मुस्लिम अशा काही लोकान्च्या बद्दलही म्हणता येईल.
9 May 2020 - 7:30 pm | मराठी कथालेखक
संस्थळावर संपादकांनी काही धागे उखडण्यातही पॉलिटिकल करेक्टनेससाठीची धडपड दिसून येते
10 May 2020 - 1:04 am | हुप्प्या
अमेरिकेत अलीकडे जेव्हा जाहिराती, सिनेमे पहातो तेव्हा वैज्ञानिक, गणिती, डॉक्टर, संशोधक, प्रचंड ज्ञानी, यशस्वी उद्योजक असे पात्र दाखवायचे असेल तेव्हा हमखास काळे लोक दाखवतात. खरे तर वस्तुस्थिती ह्याच्या विपरित आहे. ह्या क्षेत्रात काळ्या लोकांचे प्रमाण नगण्य आहे. पण तरी हे सिनेमे आणि जाहिराती पाहून असा गैरसमज होईल की हे क्षेत्र बहुतांश काळ्या लोकांनी व्यापलेले आहे.
वस्तुस्थिती अशी आहे की काही क्रीडा क्षेत्रे, संगीत, अभिनय, नाच ह्या क्षेत्रात काळे लोक खूप जास्त दिसतात. (मायकेल जॅक्सन, मायकेल जॉर्डन, कार्ल लुईस, गॅबी डग्लस, एडी मर्फी, डेन्जेल वॉशिंग्टन, मॉर्गन फ्रींमन आणि असे अनेक)