टेस्ट

शेखरमोघे's picture
शेखरमोघे in जनातलं, मनातलं
6 May 2020 - 11:33 pm

अनेक दिवस काकांची भुणभुण चालू होती - आपण टेस्ट करून घ्यायला हवी. काकूनां वाटत होतं - काय जरूर आहे, सगळं व्यवस्थित तर आहे. 

सकाळी उठल्यावर काकूंच्या लक्षांत आले - काका कधीच जामानिमा करून बाहेर पडले आहेत.  काकूंनी फक्त खात्री करून घेतली, बाहेर पडण्याचे कारण म्हणून वापरायची ढाल - वाणसामानाची पिशवी - काकांनी न विसरता बरोबर घेतली आहे. 

कांही वेळाने लॅच उघडतानांचे काकांचे जोरजोरातले गुणगुणणे ऐकू आले, तेव्हा काकू स्वतःशीच पुटपुटल्या - खुषीत दिसताहेत म्हणजे टेस्ट निगेटिव्ह आली असावी, आता भुणभुण तरी कमी होईल.   
लॅच उघडून आंत आल्यावर काकांचे लक्ष काकूंकडे जाता क्षणी काका ओरडले - बघ, लौकर जाऊन लाईनीत उभा राहिलो म्हणून दोन तरी बाटल्या मिळाल्या, नाहीतर हात हलवत परत यावे लागले असते!!   

काकूंच्याही चेहेऱ्यावर खुषी उमटली.  

समाजविरंगुळा

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

6 May 2020 - 11:46 pm | जव्हेरगंज

=))
सही!

गामा पैलवान's picture

7 May 2020 - 12:12 am | गामा पैलवान

सटवाईला नव्हता नवरा अन म्हसोबाला नव्हती बायको! ;-)
-गा.पै.

वामन देशमुख's picture

7 May 2020 - 10:03 am | वामन देशमुख

या कथेने शशक स्पर्धेत महिला क्रमांक प्राप्त केला असता!

शेखरमोघे's picture

7 May 2020 - 6:40 pm | शेखरमोघे

फक्त त्यावेळी अजून लोक "बाटल्या" शोधत बाहेर नव्हते. :०))