परवा प्रियदर्शनचा खट्टामीठा सुरु होता. नेमका तो रोड रोलर नेण्याचा प्रसंग बघण्यात आला. हा एक अफाट विनोदी सीन आहे.
प्रचंड नुकसानीत असलेला कंगाल कॉन्ट्रॅक्टर सचिन टिचकुले (अक्षय कुमार) नगरपालिकेविरोधात एक कोर्टकेस जिंकतो. आणि नुकसानभरपाई म्हणून त्याला पालिकेच्या मालकीचा रोड रोलर मिळतो. पण तो रोड रोलर नादुरुस्त आहे हे टिचकुलेला माहिती नसतं. रोलर चालवण्यासाठी स्पेशालिस्ट ड्रायव्हर जॉनी लिव्हरला बोलावण्यात येते. आणि रोडरोलर पुराण सुरु होते. जॉनी लिव्हरने टिपिकल ड्रायव्हरच्या भूमिकेचं बेयरिंग अचूक पकडलं आहे. रोलर सुरु होत नाही हे पाहून,"अभी मेरेको समझ में आया इसका प्रॉब्लेम क्या है" असं दर दोन मिनिटांनी जॉनी म्हणत असतो. शेवटी पूर्ण इंजिन,गियरबॉक्स उघडूनही रोलर चालू होत नाही हे पाहून तो हत्तीच्या साहाय्याने ओढण्यात येतो. मग एका चढाईच्या रस्त्यावर दोर तुटून रोलर खाली घसरायला लागतो. कोपऱ्यावर असलेल्या नीरज व्होराच्या घराची भिंत तोडून रोलर पार लिविंग रूमपर्यंत पोहोचतो. काहींच्या काही आहे हा सीन पण दरवेळी बघताना मी पोट धरून हसतो.
विनोदी पंच नसलेले असे सिचुएशनल कॉमेडी सिन लिहिणं आणि पडद्यावर साकारणं अवघडच असतं. इथं स्क्रीनप्ले, कॅमेरा अँगल आणि कलाकारांचे एक्प्रेशन्स फार महत्त्वाचे असतात. ह्या प्रसंगात फुकाचा ऍटिट्यूड असेलला ड्रायव्हर,सतत पैसे खर्च करून काहीच हाती न लागल्याने फस्ट्रेट झालेला कॉन्ट्रॅक्टर , कॉट्रॅक्टरला शांत करून काही ना काही उरफाट्या आयडीया देणारा नोकर आणि ह्या सगळ्याशी काहीच संबंध नसताना उगाचच ह्यात गुरफटला गेलेला कोपऱ्यावरचा घरमालक ह्या चारही भूमिका अनुक्रमे जॉनी लिव्हर, अक्षय कुमार,राजपाल यादव अन नीरज व्होरा ह्यांनी फारच अफलातून केल्या आहेत.
या सगळ्यावर कडी म्हणजे प्रसंगातली शेवटची फ्रेम,
रोलरवर बसून घराची भिंत तोडून लिविंग रूममध्ये टीव्हीजवळ पोहोचल्यावर जॉनी म्हणतो,
"जरा स्पीड से अगर और आते ना, हमलोग वो रोड पे पहुचते थे...आई शप्पथ !"
प्रियदर्शनच्या सिनेमात असे प्रसंग बरेचदा पाहायला मिळतात. ह्याच सिनेमात पुढे सचिन टिचकुले बहिणीच्या लग्नासाठी म्हणून उधार मागायला एका हार्डवेयर शॉपच्या मालकाकडे (असरानी) जातो. तिथं दुकानातलाच एक कर्मचारी अतुल परचुरेसुद्धा आईच्या इलाजासाठी मालकाकडे पैसे मागायला आला असतो. त्याचवेळी असरानीला बायकोचा आणि ग्राहकाचा फोन एकाच वेळी आला असतो. चौघांशी बोलताना त्याला कन्फ्युजन होते. हा थोडासा ब्लॅक कॉमेडी प्रकारात येणार प्रसंगही मस्त जमला आहे.
प्रियदर्शनच्याच 'हंगामा' सिनेमात आणखी एक अफलातून प्रसंग आहे. वेडा समजून राजपाल यादवला पकडायला पोलीस इन्स्पेकटर (मनोज जोशी) एका लॉजमध्ये येतात आणि आरडाओरडा चालू करतात. आणि ह्या सगळ्या प्रकारावर चिडलेला राजपाल पोलीस, लॉजचा नोकर, लॉजचा मालक अश्या सगळयांना धोपटून काढतो.
दुल्हेराजा सिनेमाचा शेवटचा प्लॉट, हा शाब्दिक आणि सिच्युएशनल अश्या दोन्ही विनोदी प्रकारात मोडणारा एक आयकॉनिक सीन आहे. गोविंदा काय प्रतीचा कलाकार आहे ते ह्या प्रसंगात दिसते.
संजीव कुमारजी आणि देवेन वर्मा सर ह्यांचा अंगुर सिनेमा म्हणजे तर विनोदी लेखनाची कार्यशाळा आहे. खूप वैतागलेला संजीव कुमार पोलीस स्टेशनला जाण्यासाठी एका ऑटोवाल्याला पत्ता विचारतो,
"अरे ये पुलीस स्टेशन कहा है?"
"साहब, पुलीस स्टेशन...छोटा या बडा?"
ह्यावर आणखी वैतागून संजीव कुमार म्हणतो,
"मुझे खरीदना नही है! कंपलेंट लिखानी है भाई!"
ही विनोदाची सर्वोच्च पातळी आहे! इथला रस्ता सापडला पाहिजे!
विनोदात लेयर्ड विनोद नावाचा एक प्रकार आहे. म्हणजे वेगवेगळे थर (लेयर) असलेला विनोद. तो ह्या प्रसंगात आहे. म्हणजे बघा, कोणीतरी पत्ता विचारल्यावर सरळ न सांगता आगाऊपणे प्रतिप्रश्न करणं (छोटा या बडा?) हा पहिला थर. नंतर संजीव कुमारच हे पात्र आधीच्या घटनांमुळे खूप वैतागलेलं असतं. त्यात हा प्रतिप्रश्न ऐकून तो आणखी चिडतो. संजीवजी ज्या पद्धतीने,"मुझे खरीदना नही है" हे वाक्य डिलिव्हर करतात त्यात त्या पात्राचं अक्ख्या कथेतलं फस्ट्रेशन विनोदी पद्धतीनं बाहेर येते. हा विनोदाचा दुसरा थर. अर्थात हे करायला त्या तोडीचा अभिनेता असावा लागतो. आणि शेवटचा थर म्हणजे, नेमकं पोलिसांच्याच संदर्भात वापरलेलं,"मुझे खरीदना नही है" हे रूपक !!
विनोदी प्रसंग हा माझा आवडीचा विषय आहे. रडवण्यापेक्षा हसवणं हे फार कठीण असतं.
तुम्हाला आवडणारे विनोदी प्रसंग जरूर लिहा.
प्रतिक्रिया
28 Apr 2020 - 3:24 pm | सौंदाळा
नेहमीप्रमाणे खुसखुशीत लेख
मला दिवाना मस्तना मधला एक सीन आवडतो, अनिल कपूर आणि जॉनी लिव्हर गोविंदाचे एका मुलीबरोबर शूटिंग रेकॉर्ड करतात आणि गोविंदाचे आई वडील त्याच्या लग्नाची बोलणी करायला जातात तेव्हा तिकडे हे दोघे टपकतात,पुढचा सीन मस्तच
28 Apr 2020 - 4:30 pm | चांदणे संदीप
अंदाज अपना अपना काढून बघायचा.
पहिला सीन:
"बाबूलाल, नमकहराम? मेरी दुकानके सामने अपनाही धंदा शुरू कर दिया."
"अरे अपना धंदा नही मालिक, मैं तो आपहीका धंदा कर रहा हू!"
दुसरा सीनः
"बाबूलाल, शाब्बास वफादार! मेरी दुकान खुलने तक तू बाहर मेरा धंदा कर रहा है."
"आपका धंदा नही मालिक, इस बार मैं अपनाही धंदा कर रहा हू. आपका धंदा बंद हो चुका!"
अजून, आमीरचा बापाला दोनवेळा स्वप्नात घेऊन जाण्याचा सीन. सलमानला सिनेमाचे स्वप्न दाखवणारे मेहमूदचे सीन्स. त्यावर जगदीपची कडी!
परेश रावलचे मुर्गीयोका फार्म खोलूंगा. मार्क इधर है, तेजा मैं हू हे सीन्स. आमीरने सलमानला जमालगोटा दिल्यानंतरचा सीन. कितीतरी आहेत. आजिबात कंटाळा येत नाही हा पिक्चर बघताना.
परेश रावलचेच हलचल, हंगामा आणि पहिल्या हेराफेरी मधले काही सीन्सही तुफान विनोदी आहेत.
सं - दी - प
29 Apr 2020 - 6:40 am | तुषार काळभोर
लेख वाचल्यावर याच चित्रपटांचे क्लायमॅक्स लक्षात आले.
प्रियदर्शन चा पहिला हेराफेरी आणि हंगामा
अंदाज अपना अपना
याशिवाय चाची ४२०, मराठीत धूमधडाका आणि बनवाबनवी.
मराठी नाटकात यदाकदाचित, पती सगळे उचापती.
28 Apr 2020 - 4:33 pm | प्रचेतस
मस्त धागा आणि प्रतिसाद
28 Apr 2020 - 5:08 pm | उन्मेष दिक्षीत
संजय दत्त आल्यानंतरचे सीन्स, त्यातनं गीता मे लिखा है वाला सीन !
चुपचुपके मधले , राजपाल यादव शाहीद कपुर आणि शक्ती कपुर चा 'इसको जिला घोषीत क्यु नही कर देते' वाला सीन. आणि येस, 'धमाल' मधला विमानाचा, तर कहरच आहे! धमाल मधे, जेव्हा संजय दत्त आणि रितेश गाडी चालवताना शेजारी येतात, तेव्हा रितेश त्याला लूक्स देत असतो, तर संजय दत्त म्हणतो, आगे देख के गाडी चला, तर चिडलेला रितेश देश्मुख (डिटेक्टीव रॉय) एकदम क्या कर लेगा ? मै देख लूंगा तुझे , देखता रहूंगा तुझे असं म्हणत म्हणत समोर्च्या झाडावर जीप धडकवतो तो सीन् इतका भारी आहे ! त्याच सीन मधे, संजय दत्त आणि आशिष चौधरी शेजारी येतात, आशिष चौधरी ट्रक चालवत असतो, संजय दत्त, आपल्या गाडीतला साप फेकतो ट्रक मधे, याला वाटतं नकली आहे, आणि त्यानंतर त्याला चिडवत नकली साप , नकली साप ? हाउ चाइल्डीश ! असं जे तो म्हणतो, आणि तो खरा निघल्यानंतरची त्याची रिअॅक्शन रोफ्ल !!
28 Apr 2020 - 5:17 pm | जव्हेरगंज
भारी. व्हिडीओ लिंका दिल्या तर मजा येईल..
28 Apr 2020 - 5:25 pm | विजुभाऊ
चुपकेचुपके सिनेमात धर्मेंद्र बायकोला भेटायला चोरुन येतो. त्याला कपाटात लपून बसावे लागते
त्याच वेळेस एक चोर येतो आणि त्याच कपाटात लपता
धर्मेंद्र चोराला रागवत त्याच वेळेस आरडाओरडा न करण्यासाठी विनवत असतो
28 Apr 2020 - 10:16 pm | Prajakta२१
कल हो ना हो मधले प्रीटी वूमन गाण्याआधीचा सीन,
बोटीतला शाहरुख खान,प्रीती झिंटा आणि डेलनाझ पॉल चा रामलाल चा सीन
प्रीती झिंटा आणि सैफ अली खान चा mba कॉलेज मधला सीन
कभी ख़ुशी कभी गम मधला शाहरुख काजोल चा मिठाईच्या दुकानातला सीन
हेराफेरी आणि अशी हि बनवाबनवी
28 Apr 2020 - 10:28 pm | विजुभाऊ
धनंजय माने इथेच रहातात का
28 Apr 2020 - 11:39 pm | शेर भाई
सिंग इज ब्लिंग मध्ये अक्षय कुमार कुत्र्याला सिंह बनवून मेयर समोर जातो. आणि नंतर खरोखरच्या सिंहाला मेयरच्या ऑफिसात घेऊन जातो.
29 Apr 2020 - 7:19 am | आनन्दा
आणि तुम्ही ३ इडियट ला कसे विसरून चालेल? त्यातला तो चमत्कार वाला सीन एपिक आहे. थोडासा अश्लील आहे, पण चालतय
29 Apr 2020 - 7:51 am | जेम्स वांड
विनोदी सीन्स आवडते म्हणजे
१. राजपाल यादव लॉज सीन (अरे ये बोला, इसके मु में जबान हैं ये गुंगा नही हैं)
२. अक्षयकुमारचं जबरी कॉमिक टायमिंग (गोटी, इतना सुसू लाते कहा से हो यार, हमें तो नही आता इतना सुसू, ये तालाब तुमने भरा हैं)
३. प्रियदर्शन टच (अरे बेटी पुष्पा कहा जा रही हो अपने गधे पर बैठ कर, ओहोहो छुनदन हलवाई शादी हो गयी तुम्हारी)
४. बेस्ट ऑफ द बेस्ट, कॉमिक टायमिंगचे बादशाह अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि सुधीर जोशी एकाच फ्रेममध्ये असलेला हा अमर सीन
29 Apr 2020 - 1:27 pm | टर्मीनेटर
झकास लेख! वर उल्लेखिलेले सर्वच सीन्स मलाही आवडतात.
खट्टा मीठा मधली जॉनी लिव्हरने सकारलेली 'अवॉर्ड अंशुमन' ही व्यक्तिरेखा त्याचा ऑल टाईम बेस्ट परफॉर्रमन्स ठरावी! रोड रोलरवाला सीन तर कळसच. त्या प्रसंगात घराची भिंत फोडून रोड रोलर आत घुसल्यावर टीव्ही वर मॅच बघत बसलेल्या नीरज व्होराला जेव्हा जॉनी लिव्हर टाळी वाजवत
"स्कोअर क्या हो गया है" असे विचारतो तेव्हा त्या दोघांच्या चेहऱ्या वरची एक्सप्रेशन्स तर लाजवाब आहेत.
'वेलकम' चित्रपटातलेही नाना पाटेकर आणि अनिल कपूरचे काही सीन्स अफलातून आहेत.
यॉट वर लग्नाची बोलणी चालू असताना तिथे टपकून नको त्या गोष्टी सांगितल्याने मुलाकडची मंडळी घाबरून पळाल्यावर एक पन्टर जेव्हा नाना पटेकरला विचारतो "यह लोग कौंन थे सर, जो चले गये? " तेव्हा "जा पुछके आ" म्हणत त्याला समुद्रात फेकणाऱ्या उदय भाईचा सीन असो की रस्त्यावर गाड्या अडवून लाईव्ह पेंटिंग बनवणाऱ्या मजनू भाईचा सीन! अशा अनेक विनोदी प्रसंगांमुळे हा चित्रपटही मला फार आवडतो. परेश रावल, अनिल कपूर, संजय मिश्रा, फिरोज खान आणि अनेक सहकलाकारांनी ह्या चित्रपटात धम्माल केली आहे.
असे विनोदी चित्रपट आणि त्यातील धमाल विनोदी प्रसंग ह्यांची यादी प्रचंड मोठी होईल त्यामुळे तूर्तास एवढेच!
29 Apr 2020 - 3:40 pm | Prajakta२१
वेलकम मधलाच नाना पाटेकर चा picture शूटिंग चा सीन आणि त्या लकी पात्राला अपघाती मारल्यावरून सुरु झालेला सगळा प्रसंग
चॅनेल surfing करताना वेलकम लागला असेल तर बघितलाच जातो
छोटीसी बात मधले काही काही प्रसंग अगदी विनोदी म्हणता नाही येणार पण हसवून जातात
4 May 2020 - 2:36 pm | अज्ञातवासी
वेलकम मधलाच, मजनू भाभी को सांभालना!!
4 May 2020 - 5:07 pm | बबन ताम्बे
वर वर्णन केलेले प्रसंग पोट धरुन हसवणारे आहेतच, पण मला मिस्टर इंडियातला अन्नू कपूर, श्रीदेवी आणि अनिल कपूरचा तो सिन खूप आवडतो ज्यात संपादक गायतोंडेला (अन्नू कपूर) श्रीदेवीवर अजिबात विश्वास नसतो की मि. इंडीया ऑफिसमधे येणार आहे आणि तो तिची खिल्लि उडवत असतो. पण प्रत्यक्षात जेव्हा अद्रुश्य मि. इंडिया येतो तेंव्हा त्याची उडणारी भंबेरी आणि तारांबळ अन्नू कपूरने अफलातून दाखवलीय. एकंदरीतच हा सीन अन्नू कपूर, श्रीदेवी यांनी अभिनय आणि एक्स्प्रेशन्स यातून एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलाय. आता ह्याचे श्रेय दिग्दर्शकाचे की अॅक्टर्सचे हे तज्ञच सांगतील.
चाची ४२०, हेराफेरी १ आणि २, वेल्कम, अशी ही बनवाबनवी , हंगामा , नारबाची वाडी हे तर फेवरेटच आहेत.
4 May 2020 - 7:31 pm | राघव
सुंदर धागा! :-)
वर उल्लेखलेले जवळपास सर्वच प्रसंग पाहिलेले आहेत आणि खूप आवडतात.
आपल्याकडे इन्सिडेंटल कॉमेडी हा प्रकार कमी हाताळल्या जातो. ईंग्रजी सिनेमांत हा प्रकार भरपूर आहे. त्यातही खास आवडलेले म्हणजे बस्टर कीटनचे काही अफलातून स्टंट्स. हा माणूस चार्ली चॅप्लीन चा समकालीन. पण मला वाटतं तो कॉमेडीयन पेक्षा स्टंट्समनच जास्त होता. त्याच्या मक्ख चेहेर्याकडेच बघून बरेचदा हसायला येतं. अर्थात् त्याचे त्याकाळी त्याने दिलेले अनेक स्टंट्स इतके कठीण आहेत की कसे केले असतील असं वाटत राहतं.
असंच "गॉड्स मस्ट बी क्रेझी" या सिनेमाचे आहे. आत्यंतिक आवडत्या चित्रपटांपैकी एक. दोन्ही भाग. कितीही वेळा बघू शकतो. :-)
पहिला जुमान्जी होता त्यातला एक आवडता विनोदी सीन आहे - एक पोलीस ऑफिसर या जुमान्जीच्या प्रसंगांमधे अकारण अडकतो. त्याच्या कारची आधीच वेगवेगळ्या प्रकारे वाट लागलेली असते. त्यात हा रस्त्यावर एके ठिकाणी थांबतो आणि त्याचवेळी जंगलातून एक जाडजूड वेल येऊन कार अक्षरशः मोडून तोडून खेचून घेऊन जाते. घाबरून बाहेर आलेल्या त्या पोलिसाच्या चेहेर्यावरचे आश्चर्यचकीत, उद्वीग्न, "काय सकाळपासून चाललंय काही कळेना" आणि हतबल असे भाव पाहून अक्षरशः पोट धरून हसायला येते. ती कार गुडुप झाल्यावरचे त्याचे शेवटचे वाक्य "fine! take it!" मणजे कहर आहे.
आणखीनही आहेत. जसे जमेल तसे टाकतो.
26 May 2020 - 10:00 am | चांदणे संदीप
या सिनेमाविषयी काय सांगावं! विनोद आणि बरेच काही आहे या सिनेमात. पण, इथे फक्त विनोदाबद्दल घेऊया. मीसुद्धा हा पिक्चर कितीही वेळा पाहू शकतो.
अगदी सर्व प्रकारची कॉमेडी यात आहे. विनोदी सीन्स वेचून काढायचे म्हटले तर एक स्वतंत्र मोठा लेखच व्हायचा.
ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी आवर्जून पहावा असा साऊथ आफ्रिकन सिनेमा आहे हा!
सं - दी - प