मोगॅबो-८

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
14 Apr 2020 - 3:58 pm

मी पक्या गण्या आणि संध्या सकाळी जॉगिंग पार्क वर सरांना भेटतो. आणि तुम्हाला फोन करतो. चला आता उद्या सकाळी भेटूया."
सकाळी काय होणार आहे हे कोणालाच माहीत नव्हते. पण तरीही सगळेच एका ठामपणा ने उठले.
घरी जाऊन झोप येणार नव्हतीच .सकाळी मोगँबो सरांना भेटायचे होते. प्रश्नांला थेट भिडायचे होते.

मागील दुवा http://misalpav.com/node/46406

फाईव्ह गार्डन च्या सेंट्रल गार्डन पहाटे इतकी गर्दी असू शकते यावर विश्वास बसणे जरा कठीणच जाते. सकाळी सहा वाजता इतकी माणसे इथे काय काय करतात. कोणी सुलटे चालतात कोणी विरुद्ध दिशेने चालतात. कोणी हात वर करून चालतात. संथ , भराभर, काहीजण अगदी घाईची लागल्यासारखे पुढे झुकत धावताहेत. जॉगिंग ट्रॅकवर मधेच कुठेतरी एखादे पेन्शनर काका त्यांच्या मित्रांना उलटे चालत काहीतरी गोष्ट सांगताहेत . शळेतली पोरे रस्त्यातून चालताना अशीच चालतात ना. पार्कचा एक कोपरा हास्य क्लबच्या मेंबर्स नी पकडून ठेवलाय.
गोंधळ वाटला तरी प्रत्येकाचे काम शिस्तीत चाललेले आहे. सुलट बाजुने चालणार्‍या लोकांना उलट बाजूने येणार्‍या लोकांचा मधून मधून होणारा अडथळा सोडला तर सगळे कसे शिस्तबद्ध. मुंबईची तीच तर खासियत आहे. शिस्त नसेल तर काय होते हे प्रत्येकालाच माहीत असते. त्यामुळे इथे सगळेच शिस्तीत होते.
आता या सगळ्या गोंधळातून मोगँबो सरांना शोधायचे जरा कठीणच . पण गण्याची ट्रॅकवर उलट्या दिशेने चालायची आयडीया. त्याच्या मते सगळे ज्या दिशेने चालतात त्या दिशेत चालले तर फक्त पार्श्वभाग दिसतात. उलट्या दिशेने चालले तर चेहरे दिसतात. अगदी प्रॅक्टीकल. अर्धे सर्कल झाले असेल अचानक मोगँबो सर त्यांच्या त्या झपझप चालीत चालताना दिसले. आम्ही हात वर केला त्यांनीही ओळख दाखवण्यासाठी हात वर केला.
अरे काय हे. सर गेले ना पुढे. थांबवायचे ना त्याना.
पक्या सरांना गाठायसाठी सुलट दिशेने चालू लागला.
गण्याच्या उलट दिशेने चालले तर सर जास्त लवकर भेटतील. या वेळेला मात्र त्यांना थाम्बवायचेच.
गण्याचा अंदाज बरोबर निघाला. सरांना आम्ही थाम्बवले.
अरे तुम्ही इथे? काय तुम्हीपण जॉगिंग करताय?
नाही सर जरा बोलायचेय.
इतक्या सकाळी?
हो. जरा महत्वाचे आहे.
ठीक आहे. जरा थाम्बा. हे दोन राउंड पुर्ण करतो. मग भेटूया. त्या गेटजवळ.
सरांची ही एक खासियत. काहिही झाले तरी ठरवलेल्या कार्यक्रमात बदल करायचा नाही.
बोला काय म्हणताय. काय काम काढलंत इतक्या सकाळी सकाळी.
सर थोडे महत्वाचे आहे
असणारच ना त्या शिवाय इथे भेटायला आलाय!
सारंगने घडलेली सगळी कथा सांगितली.
बराच वेळ सर काहीच बोलले नाहीत. मग अचानक म्हणाले. कॉलेजच्या गेस्टहाऊस मधल्या मिटींग रूम मधे या. तुमच्या बाकी मित्रांनापण घेऊन या. साडे आठ वाजता. भेटूया तिथे.
पक्या गण्या मीना सारंग , जितू, संध्या आणि आशा सुद्धा. आठवाजता कॉलेजच्या गेस्ट हाउसवर कॉन्फरन्स रूम मधे.
सर आले तसे आम्ही उभे राहिलो.
बोला. काय करायचंय तुम्हाला.
सर हीला मदत करायचीय.
कल्पना आहे . पण काय मदत करायची ठरवलंय.
"जे शक्य असेल ते . अशक्य ते शक्य करिता सायास" एका श्लोकाची ओळ सारंगच्या तोंडातून अचानक निघाली.
तो श्लोक ऐकल्यावर सहसा न हसणारे सर हसले. त्यांचे हसणे पाहून सगळ्यानाच जरा बरे वाटले. काहितरी मार्ग निघतोय बहुतेक.
" जे शक्य असेल ते . अशक्य ते शक्य करिता सायास " हे बरोबर आहे रे. पण नक्की काय मदत करायचीय हे अगोदर ठरवा. आपण हीलाच विचारू ना.
काय ग आशा नाव म्हणालीस ना. नक्की काय मदत हवी आहे.
"सर … सर.. " आशाला कुणीतरी इतक्या मोठ्या व्यक्तीने असे काही प्रेमाने विचारल्याचा अनुभव प्रथमच येत होता. ती भांबावून गेली.
"घाबरू नकोस बेटा. बोल. तुझा वडिलांच्या सारखाच समज मला. सरांनी आशाला धीर दिला.
सर.. मला … मला लालाला बरे करायचे आहे. येत्या सहा महिन्यात त्याचे ऑपरेशन झाले नाही तर त्याची तब्येत आणखीन बिघडेल ." दडपण कमी झाले तरी आशा तुटक तुटक शब्दात बोलत होती
" त्या साठी काय करायचंय "
" डॉक्टर म्हणतात. खूप खर्च आहे सर "
" किती."
" साडे सहा लाख. …"
" साडे सहा लाख….." खर्चाचा आकडा ऐकून गार पडायची पाळी . सारंग आणि मीना सोडता गण्या पक्या जितू संध्या कोणालाच खर्चाचा आकडा इतका असेल याची कल्पनाच नव्हती.
" हम…….." सरांनी मनातल्या मनात काहीतरी आकडेमोड केली. " साडे सहा लाख…… कॉलेजने काय करावे असे वाटतेय तुम्हाला यात"
कोणाकडेच याचे काही उत्तर नव्हते.
" आणि कॉलेजने यासाठी काय करावे या पेक्षा तुम्ही काय करणार आहात हे सांगा " याही प्रश्नाचे उत्तर कोणाकडे नव्हते.
हे पहा तुम्हाला वाइट वाटेल पण एक लक्षात घ्या. मदत करायची भावना असायला हरकत नाही. पण कोणालाही मदत करताना स्वतःला किती झेपतय हे पाहून करावी.
तुकारामानी म्हंटलय दारी नाही आड हाती नाही बळ त्याने फुलझाड लावू नये"
सर हे असले काही बोलतील याची एक टक्का जरी कल्पना असती तर या भानगडीत पडलोच नसतो.
बराच वेळ कोणीच काही बोलत नाही.
ठीक आहे. माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यायला तुम्हाला दीड तास देतो. साडे सहा लाख . कसे जमवणार आहात ते सांगा.
प्ण सर.. पक्याने काहीतरी बोलायचा प्रयत्न केला.
दीड तास आहे तुमच्या कडे. साडे सहा लाख. याचे काही उत्तर असेल , काही प्लॅन असेल तरच मी पुढचे बोलेन.
सारंग कसल्याशा विचारात .मीना संध्या गण्या ला तर एकमेकांकडे ही पहात नव्हते.
मुलांच्या झुकलेल्या माना पाहून सरांना काहितरी वाटले.
" हे पहा मी कॉलेज मदत करणार नाही असे म्हणालेलो नाही. पण तुमचा प्लॅन सांगा. ते त्यावर ठरेल."
सरांच्या वाक्यातला अर्थ सारंगच्या कानापर्यंत पोहोचला असावा. त्याचे डोळे चमकले. त्याने सरांकडे पाहिले. पणतेथे कसलेच हावभाव नव्हते.
" तुम्ही जाऊ शकता . अजून दीड तासांनी मला येऊन भेटा. " सरांचे वाक्य पूर्न व्हायच्या आतच सहाही जण सरांच्या गेस्टहाऊसच्या कॉन्फरन्स रूम बाहेर जाऊन व्हरांड्यात उभे होते. कोणीच काही बोलत नव्हते. बोलणार तरी काय. साडेसहा लाख ही काही अशी तशी रक्कम नाही.
" आय अ‍ॅम सॉरी दादा माझ्यामुळे उगीचच सर्वांना त्रास झाला ." आशाच्या या बोलणयवरही कोणाची काही प्रतिक्रीया आली नाही. सगळेच विचारत मग्न . प्रत्येकाच्या डोळ्यात अपराधीपणा स्पष्ट दिसत होता. हतबलता होती.
त्या हतबलतेची किम्मत साडे सहा लाखापेक्षा जास्त होती. आपण काही करू शकतो हा आत्मविश्वासच डगमणार होणार होता.
" माझ्याकडे आहे एक कल्पना." सारंगने बराच विचार करून बोललेले हे एक वाक्य बरेच काही करून गेले.
पक्या , गण्या तुम्ही जितूला घेऊन या. मीना तू आशाला घरी सोडून ये. संध्या आपल्याक्डे सगळ्यांकडे एकून किती पैसे आहेत ते सांगा.
"कशासाठी माझ्याकडे असतील काही एक साडेतीनशे " मीना तुझ्याकडे किती आहेत.
माझ्या कडे असतील चारशे तरी आणि गण्या तुझ्या कडे.
असतील की साडे चारशे जित्याकडे सकाळी सहाशे होते. आणखी लागले तर भावाकडून एक दोनएकशे मिळतील.
साडे तीनशे अन चारशे म्हणजे साडेसातशे आणि सहाशे झाले साडेतेराशे आणि दोनशे म्हणजे साडे पंधराशे अधीक साडेचारशे म्हणजे आपल्या सगळ्याकडे मिळून दोन एक हजार झाले.
त्याचे काय करणार.
आत्ता प्रश्न नकोत. सगल्म समजावतो. गण्या तू चल माझ्या बरोबर , पक्या जितूला घेऊन तू गेस्टहाऊसवरच्या कॉन्फरन्स रूम वर ये बरोब्बर एका तासाने. गण्या बाईक काढ. आपण जाउन येवूया.
बरोब्बर दीड तासाने साडे अकरा वाजता.सगळे गेस्टहाऊसवरच्या कॉन्फरन्स रूमवर. सर कसल्याशा मिटींग मधे होते.
मुले रिसेप्शन्मधे काही न बोलता बसली होती. एरव्हीचा चिवचिवाट बंद होता. मीनाने वरचा ओठ दाताखाली दाबल होता. चेहेर्‍यावर टेन्शन स्पष्ट दिसत होते.
तीच कशाला प्रत्येकजणच टेन्शन मधे होते. मिटींग आटॉपून ट्रस्टीना सर बाहेरपर्यंत सोडून परत आल्याचेही त्याना समजले नाही.
" सरांनी आत बोलावलय" शिपायाने खांद्यावर हात ठेवून सांगितले तेंव्हा कुठे भान आले.
" या बसा. काय ठरलं "
" सर आम्हाला संस्थेकडून आर्थीक मदत नकोय" सारंगने आपल्या बोलण्यावर आश्चर्य चकीत होण्यासठीही वेळ दिला नाही"
"काय"
" हो सर. मला जे काही म्हणायचे आहे ते मी या व्हाईट बोर्डवर मांडतो. "सरांच्या परवानगीची वाटही न बघता सारंगने मार्कर उचलला आणि तो बोर्डवर लिहू लागला. आकडेमोड करू लागला.
जवळपास अर्धातास अखंड बोलल्यावर तो थांबला तेंव्हा सगळे झाल्यावर
सारंग जे काही म्हणत होता ते किती प्रॅक्टीकल होते ते यावेळेस तरी त्याला माहीत नव्हते पण ते करायचे होते हा ठाम निर्धार त्याच्या बोलण्यातून सरांनाही जाणवला.
ज्योतीने ज्योत पेटवावी तसा तोच निर्धार प्रत्येकाच्या मनात आला होता.
आजचा आणि उद्याचा दिवस हे महत्वाचे आहेत प्रत्येकजण मनातल्या मनात स्वतःला सांगत होता. आयुष्याला कलाटणी देणारे दोन दिवस.
क्रमशः

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

14 Apr 2020 - 4:02 pm | विजुभाऊ

मागील दुवा http://misalpav.com/node/46406

विजुभाऊ's picture

16 Apr 2020 - 12:26 pm | विजुभाऊ

पुढील ( अंतीम भाग) http://misalpav.com/node/46463