जिवनात तानतनाव येवु देवु नका

कबिर's picture
कबिर in जनातलं, मनातलं
3 Apr 2020 - 5:12 pm

शाळेत जात असणारा लहान बालक असो कि कांलेजमध्यें जाणारा किशोर असो जीवनाच्या प्रत्येक अवस्थेत या तणावाचा प्रवेश झालेला आहेच. कोणतेही काम पूर्ण करण्याचा दबाव हळूहळू तणावाचे कारण बनते. कामाचा सराव असेल तर काम सहजपणे पूर्ण करता येउ शकते. तणावाची अनेक कारणे असतात. काम करूनहि परिणाम मिळणार कि नाही याबद्दल शंका असणे. यावर उपाय करण्यासाठी विचाराना सकारात्मक दिशा देउन सतत प्रयत्नरत राहून प्रामाणिकपणे कार्य पूर्ण करावे. जीवनात सतत व्यस्त राहावे म्हणजे निरर्थक विचार येणार नाहीत.
मनावर कोणताही ताण न घेताही काम पूर्ण करता येऊ शकते. त्यासाठी वेळच्या वेळी व व्यवस्थित काम पूर्ण करावे.
जीवनात नेहमी हास्य कायम ठेवावे.
प्रत्येक प्रसंगात खेळाडूवृत्ती जोपासावी.
आपण आपली जिवलशैली सुधारून घ्यावी.
सर्वप्रथम वेळेवर उठणे व वेळेवर झोपने. योग्य तेवढा शारीरिक व्यायाम करणे. आपल्या खायनापिण्यात जेवणात सुपौष्टिक तत्वांचा समावेश असायला हवा. सर्वात महत्वाचे आपल्या मानसिक शक्ती देखील विकसित करून घ्यायला हव्यात.

जीवनमानविचार

प्रतिक्रिया

पहिला प्रयत्न चाखायला

चौथा कोनाडा's picture

3 Apr 2020 - 5:32 pm | चौथा कोनाडा

त्यासाठी वेळच्या वेळी व व्यवस्थित काम पूर्ण करावे.

हे कसं काय करतात बुवा ? गेली कित्येक वर्षे प्रयत्न करतोय, जमत नाहीय.
(विपू: जिंनामिदो सिनेमावरून तुम्ही कबीर हे आयडीनांव घेतलेय का ?)

कबिर's picture

16 Apr 2020 - 1:16 pm | कबिर

२७९ वाचक द्यन्यवाद

तूम्ही ताण आणि तणाव हे दोन्ही शब्द लेखनात व्यवस्थित लिहीले आहेत.
मग शीर्षकात " तान तनाव " अस एका लिहीले आहे?

सतिश गावडे's picture

18 Apr 2020 - 12:17 pm | सतिश गावडे

अशुद्ध लेखन पाहून लोकांनी मजा घेण्याच्या हेतूने धागा उघडावा म्हणून असेल कदाचित. २७९ वाचक अर्थात २७९ पेज हीट ने ते खूश आहेत.

बालकांना येणारे ताणतणावाचे प्रसंग कोणते?
परीक्षेत कमी गुण मिळणे, हूडपणाने खोड्या काढल्यावर आता घरी कळल्यावर मार बसणार वगैरे.

धर्मराजमुटके's picture

16 Apr 2020 - 2:10 pm | धर्मराजमुटके

अशुद्ध लेखन वाचल्यामुळे माझ्या मनावरचा तणाव वाढतो. यावर मात करण्यासाठी काय करता येईल ?

राजेंद्र मेहेंदळे's picture

16 Apr 2020 - 3:44 pm | राजेंद्र मेहेंदळे

त्यात खड्यासारखे लागणारे शब्द वाचुन मनावर फारच ताण निर्माण झाला.

सुबोध खरे's picture

18 Apr 2020 - 11:58 am | सुबोध खरे

मणी वसे ते स्वपणी दिसे.

सार्वजणिक जीवणात तान हा येनारच

तुमच्या मणात खोट आहे म्हणून तुम्हाला असुद्ध लेखणाचा तान तनाव येतोय

शेवटी काही झालं तरी

माणव हा अपूर्नच

चौथा कोनाडा's picture

18 Apr 2020 - 12:32 pm | चौथा कोनाडा

मि मराठि शूध्धलेखन शीकावे का? : अनन्त्_यात्री

गाभा:
[लेखाचे शीर्षक आपणास खटकले असल्यास लेख आपल्यासाठी नाही :) ]

कायप्पा व मि.पा. वरचे मराठी लेख /चर्चा/ प्रवासवर्णने/ कविता / पा.कृ. / प्रतिसाद वगैरे वाचताना बर्‍याचदा अशुद्धलेखनाचा इतका सर्रास वापर झालेला दिसतो की एखादे शुद्धलेखनाच्या चुका न करता लिहिलेले लिखाण वाचताना चुकल्या-चुकल्या सारखे वाटू लागते.

शुद्धलेखनाच्या अभावाला कारणे बरीच असतील (उदा. लेखक शुद्धलेखनाविषयी अनभिज्ञ असणे, शुद्धलेखनाविषयी तिरस्कार असणे, ट॑कनातील बारकावे माहित नसणे, मराठी स्पेल-चेकची सुविधा उपलब्ध नसणे वगैरे...

http://www.misalpav.com/node/40766

सतिश गावडे's picture

18 Apr 2020 - 12:53 pm | सतिश गावडे

माझं वैयक्तिक मत/अनुभव सांगतो, मी शाळेत असताना मराठी विषयात बर्‍यापैकी चांगले गुण मिळवत असे. अकरावी बारावी सायन्सला हुषार पोरांचा फोकस पीसीएमबीवर असल्याने मी मराठीत वर्गात पहीला येत असे. तेव्हा वाचनही अफाट होतं, अगदी वाळवीने लाकूड खावं तसं पुस्तके वाचायचो. मात्र आता मराठी लेखन जवळपास बंद झाल्याने लिहीताना मराठी टंकन करताना व्याकरणाच्या चूका वाढू लागल्या आहेत, इंग्रजी शब्दांचा वापर वाढू लागला आहे.

मात्र आता आवर्जून शुद्ध लिहीलं पाहीजे असं वाटत नाही. भाषा हे संवादाचे माध्यम आहे आणि संवाद होत असेल तर शुद्धलेखनावर अडून बसण्यात काही अर्थ नाही असे वाटते.

दुसरी गोष्ट अशी की जे देवनागरी लिपीत मराठी लिहीतात किंवा टंकतात त्यांना शुद्ध लिहा असे म्हणता येईल. जे रोमन लिपी वापरुन मराठी लिहीतात त्यांना कोणते नियम लावायचे?

आनि आजून येक गोष्ट जर मी परमान मराटीत लिवला तं मी सुद्दलेकन वापरीन पन मी जर माज्या बोली भाशेत लिवला तं तिजं सुद्दलेकनाचं नियम कुटना आनु मी? त्यापेक्शा टेंशन नुकॉ घ्येव. लोक मराटित लिवतात बोलतात ह्यात आनंद माना. मंग वाईच सुद्दलेकन हिकडं तिकडं झाला तं तिकडं लक्श नुकॉ द्येव.

गामा पैलवान's picture

18 Apr 2020 - 5:26 pm | गामा पैलवान

सतीशराव,

आता आसं बगा की भासा म्हंजी ईचार पर्तेक्षात उत्रावायचं साधनबी हाय. हाय का नाय? मंग ती सूद्द लीवायला नगं? आसं कसं चालंल !

माला म्हनायचंय की तूमास्नी सूद्द लीवायची न्हाई तर नगा लीवू. पन परमानभासेची गरज हाये ती हायेच. ईशेष्ता तूमी विचारवंत वैग्रे आसाल तर परमान भासेविना घडीघडी अडून ऱ्हावं लागंल ठीक्ठीकानी.

काय म्हंता?

आ.न.,
-गा.पै.

काही गोष्टींवर अडून बसण्यातच अर्थ आहे. शुद्धलेखनाचे अनन्यसाधारण महत्त्व आहेच. तसे नसेल तर लहानपणापासूनच मुलांना व्याकरण नाही शिकवले तर चालेल काय ? कॉर्पोरेट जगतात व्याकरणाच्या चुका असलेल्या लिखाणाला महत्व आहे काय ? हाच मुद्दा वैद्यकिय, न्यायिक, तांत्रिक लिखाणाला तितकाच लागू होतो. अर्थात आपण इथे लिहिणारे सगळेच हौशी आहोत. त्यामुळे छोट्या चुकांना तितके महत्त्व दिले जाऊ नये पण वारंवार अशुद्धलेखन होत असेल तर तिकडे लक्ष वेधलेच पाहिजे.

अवांतर : यानिमित्ताने 'मोकलाया दाही दिशा' ह्या अजरामर कवितेचा मराठी भाषेच्या १ ते १० पैकी एखाद्या वर्गाच्या पाठ्यपुस्तकात समावेश करता येईल काय त्याची चाचपणी करता येईल काय ?

अतिअवांतर : या कवितेच्या अजरामर यशानंतर कविमहाशय पुन्हा इथे लिहिताना दिसले नाहित. एवढी प्रसिद्धि मिळाल्यानंतर आता ते कोठे आहेत ? ते सध्या काय करतात यासंदर्भात कोणी मिपाकर त्यांची एखादी मुलाखत घेऊन इथे प्रसिद्ध करु शकता काय ?

विजुभाऊ's picture

20 Apr 2020 - 4:16 pm | विजुभाऊ

बोलीभाषा आनि शुद्ध लेखन या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
चालंतंय की आसं म्हनून ल्हिता आलं की चालतंय.
पन लिहीताना पान्याच्या णळात गाल आडकला आसं णको व्हायला

सुबोध खरे's picture

18 Apr 2020 - 7:11 pm | सुबोध खरे

शुद्ध लेखन का असावं याबद्दल एक अत्यंत अश्लील परंतु अत्यंत परिणामकारक किस्सा लिहितो आहे.
सर्व (विशेषतः स्त्री) वाचकांची अगोदरच माफी मागतो आहे आणि अश्लील वाटले तर संपादक मंडळाने हा प्रतिसाद काढून टाकावा.

मुलीला "मागणं" घालायला आलो आहे

ऐवजी

मुलीला मागनं घालायला आलो आहे

असे म्हटले तर किती अनर्थ होईल

क्षमस्व__/\__

चौथा कोनाडा's picture

20 Apr 2020 - 12:53 pm | चौथा कोनाडा

खतरनाक __/\__
तसा परिचित विनोद आहे !
शुद्धलेखन मॅटर्स !