१
कोणा आटपाट शहराच्या
आटपाट गल्लीतील
आटपाट मिरवणूकीत
फेटा घालून ढोलचा ताल
साद दिली 'लय भारी'
रक्षकाने धक्का दिला
पतल्या गल्लीतून
तो सरळ रस्त्यावर परतला ;)
पण ती संध्याकाळ
तो फेटा तो ढोलचा ताल
ती साद तो धक्का
कुणा मनाच्या
कोणा कोपर्यातून
जाण्याचे नाव घेत नाही.:)
२
काय कराव? गणित सोडलं बॅलन्सशिट घेण्याचा प्रयत्न केला ना मेळ ना ताळ जमलेल्या संध्याकाळच्या infinite बडबडीत नक्कीच हरवून गेलो असतो पण इस गली उस गली मन भटकत राहीले तेव्हा कविता लिहू लागलो.
३
'नाही बुवा झेपत आपल्याला मग शहाण्यासारखं वागणं..'
किती सोपय ना कवियत्रींना हे म्हणायला
कविंना ही सोय नसते
त्यांनी म्हटले तर त्याचा मीट्टू होण्याची शक्यताच अधिक
४
स्कुटरवर बसल्यावर
राधेला आठवली अमृता
न मारलेल्या पाठीवरच्या रेघोट्या
कृष्णाला आठवले कॉफीचे बजेट
आणि कपाळावरील आठ्या
अंतर न मिटवू देणार्या
मानवाधिकार नाकारणार्या
बाबींची यादी
५
कृष्णाच्या बासरीच्या नावाने
कशाला ते
काल्पनिक प्लॅटॉनिक मिलन
कृष्ण राधेस माममावशी न बनता
जगून घेण्याच्या मानवाधिकाराच्या
अभावाची भळभळती
नुसत्या जखमेचे स्मरण
६
पाणि पाजून मेघ रितेच रहातात
आणि चातक त्यालाच मृगजळ
म्हणत तिथुनच वापस फिरतात
काय म्हणायच अशा चातकांना ?
७
तसं पहाता कोणता काटा
कोण कोणत्या घड्याळात
कोणत्या कोनात
फिरून आला तर काय फरक पडतो?
पण काट्यांना जराशी मोकळीक द्यावी
म्हटले तर घड्याळांचे ठेकेदार
असा अल्ला'राम वाजवतात जणू
पृथ्वीच फिरायची थांबणार आहे
भिंतींवरच्या दोन वेगवेगळ्या
घडाळ्यातले काट्यांनी
लाख ठरवलं
जमिनीवर परस्परांना भेटायचे
तरी ...
कधी ऐकणार घड्याळे
आणि घड्याळजी काट्यांच्या मनाचे
असे प्रश्न पडत होते
तर नव्या युगातली
घड्याळेच बदलली
आणि प्रेमाचे काटे
पोहोचले कल्पनेच्या
जगात जिथे आकडेच
फिरतात सतत
परस्परांशी समांतर
कोनच नसणारे
लिव्ह इन रिलेशनशिप
म्हणे
एकाच खोलीत राहून
एकमेकांशी मिलनपूर्व
प्रदीर्घ प्रणयाची उर्वरीत
शक्यता संपवणारी
आईस्क्रीमच्या कोन
चटकन फस्त
करण्याच्या घाईतली
कसले काट कसले कोन आणि
कसले काय ?
पण होय त्यांच्यातही
विशुद्ध मैत्री प्रणय आणि मिलन
असू शकतेच आणि वरुन
मानवाधिकारांसहीत
तेव्हा वेळ झालीए
घड्याळ्यांच्या ठेकेदारांना
धाब्यावर बसवून
काटकोन बाजूस ठेऊन
जगून बघण्याची
मग का त्या कृष्णाला
छळते राधा अजूनही
नुसतीच कवितेत रमून
प्रेर्ना अर्थातच
प्रतिक्रिया
4 Mar 2020 - 11:02 am | प्राची अश्विनी
येऊद्या अजून.
4 Mar 2020 - 12:46 pm | माहितगार
:) भावलेल्या काव्याचेच विडंबन करण्याचा मोह का होतो कोण जाणे पण तुमच्या लेटेस्ट 'वो शाम..' चा साधा सोपा फॉर्मॅट आवडला व्यक्त होण्यासाठी अजून एखाद दोनवेळा तरी वापरावा म्हणतो.
'वो शाम' वर माझे प्रतिसाद देणे अजून बाकी आहे कारण अनुषंगिक बाबींची चर्चा न करताच पुढे जाणे अस्मादिकांच्या स्वभावात नसावे म्हणून मागच्या दोन कवितांनाही अंशतः संदर्भ वो शाम च्या चर्चेचा आहे हे आपल्या लक्षात आले असेलच.
प्रतिसादासाठी अनेक आभार