ऋतुराज वसंताचे आगमन

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
3 Mar 2020 - 10:01 pm

ऋतुराज वसंताचे आगमन
चैत्राचं वर्णन करणारी आणि चैत्र महिन्यापासून सुरू होणा-या वसंत ऋतूचं गुणगान अनेक पदं आपल्या मराठीत आहेत. गाण्यांमधून आलेलं वसंत ऋतूचं वर्णनही तितकंच बहारदार आहे. मग ते गीतरामायणातलं गीत असो किंवा एखादं नाट्यपद असो.
भारतीय संगीताशी आपल्या महिने, ऋतु यांचं असलेलं जवळचं नातंच प्रत्येक गाण्यातून अधोरेखित होत जातं.

चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ही तिथी
गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती
दोन प्रहरी का गं शिरी सूर्य थांबला
राम जन्मला गं सखे, राम जन्मला
गदिमाचे अजरामर काव्य..
प्रती वाल्मीकी च ते अन बाबुजी चे स्वर्गीय संगीत..क्या बात है........
सोने पे सुहागा.
आहा ....आला वसंत देहि ..मज ठावुकेच नाहि
या गाण्यात निसर्गात होणाऱ्या बदलांचा, विशेषत: चैत्रात फुलणाऱ्या पालवीने स्त्रीमन कसं भारावून जातं आणि वसंत ऋतू तिच्या देहातही कसा फुलू लागलो याचं यथार्थ वर्णन या गाण्यात आलंय.
महिने आणि ऋतू यांचा भारतीय संगीताशी किती जवळचा संबंध आहे. याचंच आणखी एक उदाहरण म्हणजे बसंत बहार रागातील गाणी. 'राग बसंत' आणि 'राग बहार' यांच्या मिश्रणातून तयार झालेल्या बसंत बहार रागातील अनेक गाणी आजही श्रोत्यांच्या ओठांवर आहेत. मग ते, 'केतकी गुलाब जुही चंपक बन फूले' हे हिंदी गीत असो अथवा 'मंदारमाला' नाटकात पं. राम मराठे आणि प्रसाद सावकार या जोडगोळीच्या बहारदार गायकीने अजरामर केलेलं 'बसंत की बहार आयी' हे सदाबहार नाट्यपद असो. ही गाणी मनाला आजही सुखावतात.
व्हा तयार ..स्वागतास ऋतुराज वसंताच्या आगमनास

.

कलाप्रकटन