बघुनी तुझी ती रंगीत अम्ब्रेला
जीव माझ्झा कासावीस झाला
असलीस जरी तू तोंडाने फाटकी
तुझी अम्ब्रेला मात्र नीटनेटकी
रंगबिरंगी चांदण्या त्यावरी
झेलण्या ओघळण्या पाऊस सरी
कापड ऐसे तरल मुलायम
पिळवटते हे हृदय ते कायम
सडपातळ ती नाजूक दांडी
बघणार्यांच्या उडती झुंडी
बटनावरती नक्षीदार दांडा
देती सलामी बघणाऱ्या सोंडा
काय असे ते गुपित न कळले
त्या अम्ब्रेलातच सर्व अडकले
मीही नसे अपवाद त्याला
मलाही आवडली तिचीच अम्ब्रेला
===========================
सिद्धेश्वर विलास पाटणकर
प्रतिक्रिया
24 Feb 2020 - 3:11 pm | ज्ञानोबाचे पैजार
कधी अंब्रेला बंद करुन पावसात भिजून बघा
पैजारबुवा,
24 Feb 2020 - 3:32 pm | खिलजि
काका आपण म्हणता "" काय लिवलंय ""
पण इथं तर सर्वच बिघडलंय
चाळीशीत गेलो भिजायला
तर लगेच सर्दी पडसे होते
पोरंबाळं असूनही मजला
अम्ब्रेलाच का आवडते ?
शोधत होतो उत्तर याचे
मिळत नव्हते मजला
वय सरत चालले आता
पोरांनाही आवडते अम्ब्रेला