समुद्र...

veebee009's picture
veebee009 in जे न देखे रवी...
14 Nov 2008 - 12:40 am

समुद्र... कसा ?
असा किंवा तसा...
समुद्र... कधी शांत, कधी रागीट...
कधी अस्ताव्यस्त, कधी नीट..
कधी धीरोदत्त, कधी उतावळा..
कधी निळा, कधी सावळा..
कधी उद्धट, कधी प्रेमळ..
कधी गहिरा, कधी नितळ..
कधी आनंदी, कधी रुसवा..
कधी सरळ, कधी फसवा..
कधी राजा, कधी वैरागी..
कधी भाग्यवंत, कधी अभागी..
कधी साधक, कधी बाधक..
कधी ओंगळ, कधी मादक..
कधी शहाणा, कधी वेडा..
कधी संपूर्णच, कधी थोडा..

----------- विनायक बेलोसे-----------

कविताअनुभव

प्रतिक्रिया

हि लिहुन झल्यावर मला.. खरोखरिच आनन्द झाला होता...

मला मराथितले इतके निराले शब्द एकत्र एका कवितेत वापरता येतील असे कधी च वाट्ले नव्हते ना म्हनुन..

चाणक्य's picture

21 Oct 2016 - 11:32 pm | चाणक्य

लिहीत रहा.

Bhagyashri satish vasane's picture

21 Oct 2016 - 3:28 pm | Bhagyashri sati...

चांगला प्रयत्न

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

21 Oct 2016 - 4:07 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

हे वाचून मला माझी हि कविता आठवली.